Photo Credit- Social Media
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) लागणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी ज्यांचे सरकार स्थापन होईल, त्यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्या सोबत राहणार, असं सूचक विधान प्रकास आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे की, ” महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणालाही बहुमत मिळाल्यास जे सत्ता स्थापन करतील त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल.
वास्तविक, यावेळी दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा असली तरी यावेळी अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. अशा स्थितीत आता हे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीबद्दल र हा पक्ष दलित आणि मागासवर्गीयांच्या हिताची चर्चा करतो. विशेषत: मुंबई, नाशिक आणि मराठवाडा भागात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून येते. आपला पक्ष राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आवाज बनेल, असा दावा या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर करतात.
कमळ खुलणार की, तुतारी वाजणार? ‘या’ मतदारसंघात लागल्या लाखो रुपयांच्या पैजा
महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य आता २३ नोव्हेंबरला ठरणार आहे. आजच्या मतमोजणीनंतर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) अंदाजित जागा 129-159, महाविकास आघाडी (काँग्रेस-शिवसेना (UBT)-NCP (SP)), अंदाजित जागा 124-154 मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती निर्माण झाल्यास छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे भवितव्य ठरवणार नाही. पण राज्याची राजकीय दिशा आणि मतदारांचा कल कुणाकडे होता, हेही दिसणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी आणि कारभारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
यशस्वी जयस्वाल शून्यावर; पुजारापासून मांजरेकरपर्यंत सर्वांनी काढल्या उणिवा
व्हीबीएने विधानसभा निवडणुकीत 200 उमेदवार उभे केले होते. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने 236 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, त्या जागांवर पक्षाचे मताधिक्य ५.५ टक्के होते. राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. उद्या निकाल जाहीर होतील.