Maharashtra Municipal Election 2026: मुंबई उच्च न्यायालयाचा मनसेला दणका; मतदानाच्या २४ तास आधी फेटाळली 'ती' याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत अनेक उमेदवारांनी पैसा आणि सत्तेच्या प्रभावामुळे निवडणूक न लढवता ती बिनविरोध जिंकल्याचा आरोप करण्यात आला होता. पण उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे सांगत फेटाळून लावली. (Municipal Election Result 2026)
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…
मनसेने दाखल केलेल्या याचिकेत, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत सुमारे ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यापैकी बहुतेक उमेदवार सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उच्च न्यायालयाला या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची किंवा संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करण्याची विनंती केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत या उमेदवारांना विजयी घोषित करू नये अशी विनंतीही त्यांनी केली. निवडणुकीच्या अगदी आधी मनसेला कायदेशीर दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
दरम्यान, आज सकाळी या याचिकांचा उल्लेख करण्यात आला तेव्हा ही याचिका आधीपासून प्रलंबिल असलेल्या याचिकांसाखीच असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले होते. पण सुनावणी सुरू झाल्यावर ऑनलाईन उपस्थित ज्येषठ वकील असी समरोदे यांनी ही याचिका इतर प्रलंबित प्रकरणांसारखी नसून थेट निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले याचिका कर्त्यांच्या या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे मुख्य न्यायाधीश एस. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड चांगलेच संपातपल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Municipal Election 2026)
खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना जाब विचारत, सकाळी इतर याचिकांसारखीच असल्याचे चुकीचे विधान का केले, असा सवाल उपस्थित केला. दोन्ही याचिकांमध्ये कोणतेही साधर्म्य नसताना अशी चुकीची माहिती देण्यामागे कोणती घाई किंवा भीती होती, असा थेट प्रश्न न्यायालयाने केला. चुकीची माहिती दिल्याबद्दल सुरुवातीला दंड ठोठावण्याचे संकेतही देण्यात आले. मात्र, दीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयाने दंड न आकारण्याचा निर्णय घेतला. तरीही बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावली.
राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४४, तर शिंदेंच्या शिवसेनेचे १९ उमेदवार निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. या प्रक्रियेवर मनसेने कायदेशीर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आल्याने बिनविरोध निवड झालेल्या जागांचा मार्ग मोकळा झाला असून मनसेसाठी हा मोठा कायदेशीर पराभव मानला जात आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका: मुंबई उच्च न्यायालयाने ६७ बिनविरोध उमेदवारांविरुद्ध मनसेची याचिका फेटाळली. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.






