Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Today’s Breaking News Live Blog- महाराष्ट्रासह देश आणि जगातील राजकारण, निवडणुका, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या ब्रेकिंग बातम्या इथे थेट लाईव्ह अपडेट्ससह वाचा.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 03, 2026 | 05:43 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News : 

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच

  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

The liveblog has ended.
  • 03 Jan 2026 05:16 PM (IST)

    03 Jan 2026 05:16 PM (IST)

    Dhurandhar नंतर रणवीर सिंह आणि अनुष्काची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा “धुरंधर” हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ८०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ५ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या “धुरंधर” चित्रपटाची क्रेझ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि त्यांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. खरं तर, अभिनेत्याचा एक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. चला जाणून घेऊया रणवीर सिंहचा कोणता चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

     

  • 03 Jan 2026 05:14 PM (IST)

    03 Jan 2026 05:14 PM (IST)

    सांगलीतून भाजपचा प्रचाराचा नारळ फुटला

    राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, भाजपचा राज्यातील प्रचाराची सुरुवात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली, यावेळी त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अश्वसन दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल भोसले, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, समित कदम, शेखर इनामदार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

  • 03 Jan 2026 04:50 PM (IST)

    03 Jan 2026 04:50 PM (IST)

    तळागाळातील माणसाबरोबर जाऊन काम करणाऱ्यालाच मतदान : नागरिकांच्या प्रतिक्रिया .

    सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील हासुरे नगर मध्ये अनेक सोयी सुविधांचा बोजवारा उडाला असून या ठिकाणचे नागरिक यामुळे त्रस्त झाल्याचे दिसत आहे. या ठिकाणी रस्ते पाणी ड्रेनेज गटार या मूलभूत सोयी सुविधा देण्यामध्ये नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला.दरम्यान आम्ही यावेळी मत वाया घालवणार नाही पण आमच्या मताचा योग्य वापर झाला पाहिजे रस्त्याचा आणि ट्रेनचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे पाणी एक वेळ येऊ दे परंतु ते पुरेसे असावे गटार बंदिस्त झाली पाहिजे निवडून दिलेला नगरसेवक काम करत नसेल तर दुसरा कसा करेल मत देताना विचार करून देणार तळागाळातील माणसाबरोबर जाऊन काम करणाऱ्यालाच मतदान करणारा असल्याच्या प्रतिक्रिया हासुरे नगर मधील त्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या.

  • 03 Jan 2026 04:40 PM (IST)

    03 Jan 2026 04:40 PM (IST)

    महापालिका निवडणूक रणधुमाळी, खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ

    नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते जुन्या गावातील प्रभाग क्रमांक 1 मधील मारुतीरायाच्या चरणी नारळ फोडून प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असून, प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी व्यक्त केला.

  • 03 Jan 2026 04:35 PM (IST)

    03 Jan 2026 04:35 PM (IST)

    सोलापुरात निवडणूक वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या? १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

    सोलापुरात निवडणूक वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • 03 Jan 2026 04:30 PM (IST)

    03 Jan 2026 04:30 PM (IST)

    भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे बालाजी कल्याणकरांनी केला दावा

    भाजपच्या वतीने काळ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलेली विकासकामे प्रत्यक्षात शिवसेनेने केली आहेत असा दावा नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्राचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

  • 03 Jan 2026 04:30 PM (IST)

    03 Jan 2026 04:30 PM (IST)

    वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

    अकोल्यात सध्याचे राजकारण चांगलच बदलले आहे. अमाप पैसा, ताकद आणि वंशातील लोकांचाच राजकारणात बोलबाला आहे.  मात्र याला अकोल्यातील एक उमेदवार अपवाद ठरला आहे. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब घरातील तरुणाला थेट नगरसेवकपदाची उमेदवारी दिली असून, ही बाब सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे. अकोल्यातील खडकी भागात एक भाड्याच्या घरात राहणारं हे कुटुंब आज अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचं काम करणाऱ्या मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवकपदाचा उमेदवार होऊ, याची कल्पनाही नव्हती. मात्र, भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. म़ंगेशला प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून संधी देण्यात आली आहे. मंगेश हा अकोल्यातील खडकी भागात महावितरणचं वीज बिल वाटप करणारा सामान्य तरुण आहे. मात्र, 30 डिसेंबरनंतर त्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि तो थेट महापालिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. मंगेश सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा, त्यामुळे अनेकांनी मंगेशला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.. मंगेशला पूर्ण साथ मिळणार आहे.. मंगेशच्या प्रचारासाठी लोकवर्गणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपने मंगेश झिने यांना उमेदवारी देताना पक्षातील चार वेळा नगरसेवक राहिलेले विजय इंगळे यांचं तिकीट कापलं. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

  • 03 Jan 2026 04:25 PM (IST)

    03 Jan 2026 04:25 PM (IST)

    नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेस - वंचित बहुजन आघाडीचा महापौर बसेल - खासदार रवींद्र चव्हाण

    प्रभाग क्रमांक १ मधील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीचा महापौर बसेल. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. त्यामुळे नांदेडची जनता सुज्ञ असून काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पार्टी उमेदवारांकडून पैसे घेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

  • 03 Jan 2026 04:20 PM (IST)

    03 Jan 2026 04:20 PM (IST)

    'सरनाईक झाले भाईजान' -भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

    शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करत भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेना बोलते एक आणि करते एक. निवडणूक जिंकण्यासाठी सोबत घेतात आणि काम झाले की विरोधात जातात,” असा आरोप मेहता यांनी केला. मेहता पुढे म्हणाले की, शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन काम करत असून केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा वापरत आहे. “मीरा-भाईंदर शहरात जनाआधार हा स्पष्टपणे भाजपच्या बाजूने आहे,” असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेने काँग्रेससोबत छुपी युती केली असल्याचा आरोप करत मेहता म्हणाले, “शिवसेनेला दिलेले मतदान म्हणजेच काँग्रेसला दिलेले मतदान आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेना केवळ स्वार्थासाठी पुढे करते.”

  • 03 Jan 2026 04:16 PM (IST)

    03 Jan 2026 04:16 PM (IST)

    मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. यामुळे महायुतीमधील वाद समोर येत आहे. भाजप आणि अजित पवार गटामध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. अजित पवारांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 03 Jan 2026 03:53 PM (IST)

    03 Jan 2026 03:53 PM (IST)

    BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

    BJP master plan for west Bengal:  येत्या काही महिन्याच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आतापासूनच सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee)  यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. यासाठी, तळागाळात संघटना मजबूत केली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर आणि कामावर भाजप निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १८ आणि १९ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये दोन सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालदा आणि हावडा येथे या सभा होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

    वाचा सविस्तर 

  • 03 Jan 2026 03:52 PM (IST)

    03 Jan 2026 03:52 PM (IST)

    नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर!

    विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यातून त्यांचा शैक्षणिक, वैचारिक आणि बौद्धिक विकास घडतो, असा विश्वास पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तक पेटी भेट’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच निऑन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते विविध शाळांना वाचनीय पुस्तकांच्या पेट्यांचे वितरण करण्यात आले.

    वाचा सविस्तर 

  • 03 Jan 2026 02:55 PM (IST)

    03 Jan 2026 02:55 PM (IST)

    शिवसेना 16 जागा तर भाजप 11 जागा…, चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकाची दमदार ‘एन्ट्री’

    नुकत्याच झालेल्या चिपळूणनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत मागील निवडणुकीपेक्षा दोन जागा वाढवत चिपळूण शहरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक शशिकांत मोदी, सौ. रसिका देवळेकर वगळता नवीन 5 चेहरे नगर परिषदेवर निवडून गेले आहेत. यामध्ये भाजप युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शुभम पिसे यांनी तब्बल तिघा दिग्गज उमेदवारांचा पराभव करत चिपळूण नगर परिषदेवर दणक्यात एन्ट्री केली आहे. एकंदरीत भाजपकडून ते ‘जायंट किलर’ ठरले असल्याचे बोलले जात आहे.

  • 03 Jan 2026 02:50 PM (IST)

    03 Jan 2026 02:50 PM (IST)

    चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील

    आजकालच्या या ऑनलाईन दुनियेत लोकांचा निष्काळजीपणा बराच वाढला आहे. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाली आहे ज्यात निष्काळजीपणाचा कहर पाहायला मिळाला. गुरुग्राममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यात एका आईने आपल्या लहान मुलाला ई-रिक्षा चालकाकडे सोडून जवळच्या बारमध्ये जाऊन दारु पिल्याची घटना समोर आली आहे. मुलाचे वय चार वर्षे असून जेव्हा पोलिसांना मुलगा सापडला तेव्हा त्यांनी मुलाला सुरक्षितपणे मुलाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. माहितीनुसार स्वत: ड्रायव्हरने मुलाच्या सुरक्षिततेबद्दल पोलिसांना सतर्क केले.

  • 03 Jan 2026 02:40 PM (IST)

    03 Jan 2026 02:40 PM (IST)

    डॅमेज कंट्रोलिंगसाठी भाजपचा पलटवार; शंकर जगतापांकडून अजित पवारांना धक्का

    डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले. दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे

  • 03 Jan 2026 02:35 PM (IST)

    03 Jan 2026 02:35 PM (IST)

    भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी

    फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट आता हॉलिवूडमधील दिग्गज कंपनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (इंटरनॅशनल)सोबत हातमिळवणी करणार आहे. एंटरटेनमेंट जगतातील या दोन मोठ्या शक्तींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. भारतीय फिल्म बाजारपेठेत आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याची इच्छा युनिव्हर्सलची बऱ्याच काळापासून होती आणि या डीलमुळे त्यांना भारतात प्रवेश करण्याचे मोठे दार खुले झाले आहे. ही भागीदारी एक्सेल एंटरटेनमेंटच्या त्या व्हिजनशीही पूर्णपणे सुसंगत आहे, ज्यांतर्गत ते आपल्या प्रॉडक्शन्सचा व्याप आणि स्तर आणखी वाढवू इच्छितात, आणि त्यासाठी अनेक मोठे आयडियाज आधीच पाइपलाइनमध्ये आहेत.

  • 03 Jan 2026 02:30 PM (IST)

    03 Jan 2026 02:30 PM (IST)

    तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली! ‘हा आमचा शेवटचा श्वास नाही’; अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलाची आर्त हाक

    शनिवार, ३ जानेवारी २०२६ ची पहाट व्हेनेझुएलासाठी एखाद्या दु:स्वप्नासारखी ठरली. पहाटे १:५० च्या सुमारास राजधानी कराकस (Caracas) मध्ये एकामागून एक अनेक शक्तिशाली स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर जागे झाले आणि दहशतीमुळे लोक घराबाहेर पळून आले. राष्ट्रपती राजवाड्याच्या परिसरात सायरनचा आवाज घुमू लागला असून रस्त्यावर रणगाडे (Tanks) गस्त घालताना दिसत आहेत. या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांनी तातडीने देशाला संबोधित करत राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे.

  • 03 Jan 2026 02:25 PM (IST)

    03 Jan 2026 02:25 PM (IST)

    Chiplun पोलिसांचा मद्यपींना दणका; थर्टी फर्स्ट पडली महागात, उगारला कारवाईचा बडगा

    नववर्षांच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. बहादुरशेख नाका परिसरात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चार दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ ते ०५/२०२६ नोंदविण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, रात्री ९.१५ वाजता बहादुरशेख नाका येथे नाकाबंदी दरम्यान शैलेश सुरेश हिवाळकर (वय ३६, रा. खेर्डी, चिपळूण) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.०१ डीयू ७३९४) मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत चालविताना आढळून आला.

  • 03 Jan 2026 02:20 PM (IST)

    03 Jan 2026 02:20 PM (IST)

    मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

    ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.  काळा बुक्का त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर फेकत हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

  • 03 Jan 2026 02:10 PM (IST)

    03 Jan 2026 02:10 PM (IST)

    इच्छुकांना राहुल नार्वेकरांनी दिली धमकी? व्हायरल व्हिडिओवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये टीका-टिप्पणी जोरदार सुरु आहे. कुलाबा मतदारसंघामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबियांनाा उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे राहुल नार्वेकरांनी इतर इच्छुकांना धमकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने पाऊले उचलण्यात सुरुवात केली आहे. या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 03 Jan 2026 02:03 PM (IST)

    03 Jan 2026 02:03 PM (IST)

    मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

    ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.  काळा बुक्का त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर फेकत हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

  • 03 Jan 2026 02:03 PM (IST)

    03 Jan 2026 02:03 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग २५ मधून भाजपकडून श्रुती वाकडकर रिंगणात

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाकड, तथवडे, पुनावळे आणि परिसरात गेली 15 वर्षांपासून समाज कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पत्नी श्रुती वाकडकर यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातून नागरिकांपर्यंत पोहचणाऱ्या श्रुती वाकडकर या प्रभाग २५ : वाकड, ताथवडे, पुनावळे येथून लढत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी गाठीभेटीवर लक्ष दिले असून मोठा उत्सहात स्वागत केले जात आहे.

  • 03 Jan 2026 01:55 PM (IST)

    03 Jan 2026 01:55 PM (IST)

    युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं

    दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध देश व्हेनेझुएला (Venezuela) सध्या भीषण संकटाच्या छायेखाली आहे. राजधानी कराकस (Caracas) सह देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकामागून एक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी आणि स्फोटांनी संपूर्ण जग हादरले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट इतके भीषण होते की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला सरकारने तातडीने आणीबाणी जाहीर केली असून संपूर्ण देशाचे हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्यात आले आहे.

  • 03 Jan 2026 01:45 PM (IST)

    03 Jan 2026 01:45 PM (IST)

    एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी

    टी20 विश्वचषक 2026 आधी भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा संघ जो टी20 विश्वचषक 2026 साठी खेळणार आहे. तोच संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेमध्ये देखील खेळताना दिसणार आहे. भारताच्या संघाची बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही. आता भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 8 दिवस शिल्लक असताना मोठी अपडेट समोर आली आहे.

  • 03 Jan 2026 01:35 PM (IST)

    03 Jan 2026 01:35 PM (IST)

    अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

    राज्यातील महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगवेगळ्या लढताना दिसत आहेत. पु्ण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असल्याचे दिसत आहे. असे असतानाच पुण्यात अजित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत थेट भाजपवरच निशाणा साधला आहे.

  • 03 Jan 2026 01:25 PM (IST)

    03 Jan 2026 01:25 PM (IST)

    भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी

    फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट आता हॉलिवूडमधील दिग्गज कंपनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (इंटरनॅशनल)सोबत हातमिळवणी करणार आहे. एंटरटेनमेंट जगतातील या दोन मोठ्या शक्तींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. भारतीय फिल्म बाजारपेठेत आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याची इच्छा युनिव्हर्सलची बऱ्याच काळापासून होती आणि या डीलमुळे त्यांना भारतात प्रवेश करण्याचे मोठे दार खुले झाले आहे. ही भागीदारी एक्सेल एंटरटेनमेंटच्या त्या व्हिजनशीही पूर्णपणे सुसंगत आहे, ज्यांतर्गत ते आपल्या प्रॉडक्शन्सचा व्याप आणि स्तर आणखी वाढवू इच्छितात, आणि त्यासाठी अनेक मोठे आयडियाज आधीच पाइपलाइनमध्ये आहेत.

  • 03 Jan 2026 01:15 PM (IST)

    03 Jan 2026 01:15 PM (IST)

    महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे (Local Body Elections) राजकीय वातावरण तापले आहे. महापालिका निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. यामुळे जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती झाली आहे. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येत आहेत. प्रचारामध्ये अजित पवार गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले.

  • 03 Jan 2026 01:07 PM (IST)

    03 Jan 2026 01:07 PM (IST)

    आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो

    नव्या वर्षाचे स्वागत आनंदाने करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांवर काळाने झडप घातली. स्वित्झर्लंडच्या अतिशय प्रसिद्ध अशा ‘क्रॅन्स-मोंटाना’ स्की रिसॉर्टमधील ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) या लक्झरी बारमध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण जगाला सुन्न केले आहे. या दुर्घटनेत ४० निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला, तर ११९ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या थरारानंतर अनेक दिवसांपासून गायब असलेले बार मालक जॅक मोरेट्टी (Jacques Moretti) यांनी अखेर समोर येत आपले मौन तोडले आहे.

  • 03 Jan 2026 01:00 PM (IST)

    03 Jan 2026 01:00 PM (IST)

    नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात…

    महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेनंतर आता चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२९४ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते.नियमांनुसार २ जानेवारीला दुपारी २.३० वाजेपर्यंत नामांकन वापसीची मुदत दिली होती. या कालावधीत ३०२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काही प्रभागांमध्ये चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे, तर काही प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुकीची धग वाढली आहे.

  • 03 Jan 2026 12:50 PM (IST)

    03 Jan 2026 12:50 PM (IST)

    ‘आता परत कसं जाणार?’ 10 लाख भारतीयांसमोर अस्तित्वाचं संकट

    ‘मिनी पंजाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनडामध्ये (Canada )सध्या भारतीय समुदायावर ऐतिहासिक संकट ओढवले आहे. एकेकाळी स्थलांतरितांचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या या देशात आता १० लाखांहून अधिक भारतीयांना आपला कायदेशीर दर्जा (Legal Status) गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांत तब्बल २० लाख वर्क परमिट्सची मुदत संपणार असून, त्यापैकी अर्धी लोकसंख्या ही भारतीयांची आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कॅनडाच्या रस्त्यांवर आणि जंगलांमध्ये बेकायदेशीर भारतीयांचे तांडे दिसू लागले आहेत.

  • 03 Jan 2026 12:40 PM (IST)

    03 Jan 2026 12:40 PM (IST)

    “प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

    महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.

  • 03 Jan 2026 12:30 PM (IST)

    03 Jan 2026 12:30 PM (IST)

    महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

    अकोला–खामगाव महामार्गावर तरुणीचा पाठलाग करून अश्लील शब्दांत बोलत हातवारे केल्याचा आरोप पोलिस उपनिरीक्षकावर झाला आहे. डायल 112 मुळे तरुणीची सुटका झाली असून आरोपी PSI ला अटक करण्यात आली आहे.

  • 03 Jan 2026 12:20 PM (IST)

    03 Jan 2026 12:20 PM (IST)

    अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या

    सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची धारदार शस्त्राने हत्या झाली. उमेदवारी अर्ज माघारीवरून वाद उफाळला. भाजप उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 03 Jan 2026 12:10 PM (IST)

    03 Jan 2026 12:10 PM (IST)

    अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण

    मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती महिला पोलीस शिपायावर अंधेरी पोलीस ठाण्यातच पतीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पतीसह सासरच्या पाच जणांवर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप आहेत.

  • 03 Jan 2026 12:05 PM (IST)

    03 Jan 2026 12:05 PM (IST)

    12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

    दक्षिण नागपूरमध्ये आई-वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळी–कुलूप लावून घरात कोंडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चाईल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीनंतर बाल संरक्षण कक्षाने हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली.

  • 03 Jan 2026 11:53 AM (IST)

    03 Jan 2026 11:53 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग

    महापलिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचे रणशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत सांगलीत शनिवारी (दि.3) फुंकले जाणार आहे. येथील स्टेशन चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीरसभा होणार असून, त्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्री नेमके काय बोलणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 03 Jan 2026 11:43 AM (IST)

    03 Jan 2026 11:43 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग २५ मधून भाजपकडून श्रुती वाकडकर रिंगणात

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाकड, तथवडे, पुनावळे आणि परिसरात गेली 15 वर्षांपासून समाज कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पत्नी श्रुती वाकडकर यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातून नागरिकांपर्यंत पोहचणाऱ्या श्रुती वाकडकर या प्रभाग २५ : वाकड, ताथवडे, पुनावळे येथून लढत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी गाठीभेटीवर लक्ष दिले असून मोठा उत्सहात स्वागत केले जात आहे.

  • 03 Jan 2026 11:33 AM (IST)

    03 Jan 2026 11:33 AM (IST)

    कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला

    मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर समोर आली आहे. ३७ वर्षीय गर्भवती महिला पोलीस शिपायाच्या पतीने पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना अंधेरी पोलीस ठाण्यात घडल्याचे समोर आले आहे. महिला पोलीस शिपायाने याप्रकरणी पती, पतीची आई आणि त्याच्या तीन बहिणींवरही गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे.

  • 03 Jan 2026 11:23 AM (IST)

    03 Jan 2026 11:23 AM (IST)

    भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

    महानगरपालिका निवडणुकीत यंदा तिकीट वाटपानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना कार्यकर्त्यांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भाजपमध्ये असंतोष अधिक ठळकपणे समोर आला. ही नाराजी थेट निवडणूक निकालांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.

  • 03 Jan 2026 11:13 AM (IST)

    03 Jan 2026 11:13 AM (IST)

    Save Indian football : सुनील छेत्रीसह या तीन खेळाडूंनी केली

    प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग संधू, सुनील छेत्री आणि संदेश झिंगण यांनी भारतीय फुटबॉलमधील सध्याच्या संकटाबाबत एक खास व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या व्हिडिओ संदेशात तिघांनीही फिफाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. २ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये, या खेळाडूंनी, इतर अनेक आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्टार्ससह, अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशन (एआयएफएफ) च्या अपयशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.

  • 03 Jan 2026 11:03 AM (IST)

    03 Jan 2026 11:03 AM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकांपूर्वी ६७ नगरसेवक बिनविरोध

    महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असतानाच राज्यभरात ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या बिनविरोध निवडींची विजय घोषणा होणार नसल्याची माहिती आयोगाने दिली आहे. केडीएमसीमध्ये भाजपचे १४ आणि शिवसेना (शिंदे गट)चे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

  • 03 Jan 2026 10:59 AM (IST)

    03 Jan 2026 10:59 AM (IST)

    सुनील छेत्रीसह या तीन खेळाडूंनी केली भारतीय फुटबॉल वाचवण्यासाठी मागणी!

    प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग संधू, सुनील छेत्री आणि संदेश झिंगण यांनी भारतीय फुटबॉलमधील सध्याच्या संकटाबाबत एक खास व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या व्हिडिओ संदेशात तिघांनीही फिफाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. २ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये, या खेळाडूंनी, इतर अनेक आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्टार्ससह, अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशन (एआयएफएफ) च्या अपयशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.

  • 03 Jan 2026 10:53 AM (IST)

    03 Jan 2026 10:53 AM (IST)

    Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ!

    xAI चे AI चॅटबॉट Grok सध्या बरेच चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे Grok वर सुरु असलेला अजब ट्रेंड. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि Grok वर सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु झाला आहे. यूजर्सनी या ट्रेंडला पूट हर इन अ बिकीनी (Put her in a bikini) असं नाव दिलं आहे. ज्यामध्ये Grok च्या मदतीने लोकं इतरांचे बिकिनी फोटो तयार करत आहेत. यामुळे काही लोकं हा ट्रेंड मजा मस्ती करण्यासाठी वापरत आहेत. तर काहीजण या ट्रेंडमुळे हैराण झाले आहेत. Grok चे मालक एलन मस्क देखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.

  • 03 Jan 2026 10:47 AM (IST)

    03 Jan 2026 10:47 AM (IST)

    भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी

    मध्य प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये साई सुदर्शन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बरगडीला दुखापत झाल्याने युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शन एक महिन्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने शुक्रवारी सांगितले. सुदर्शन भारताच्या व्हाईट-बॉल संघाचा भाग नाही.

  • 03 Jan 2026 10:39 AM (IST)

    03 Jan 2026 10:39 AM (IST)

    येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर

    दशकभरापासून गृहयुद्धाच्या आगीत होरपळणारा येमेन आता कायमचा दोन तुकड्यांत विभागला जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण येमेनमधील (Yemen) शक्तिशाली फुटीरतावादी गट सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) ने एक ऐतिहासिक आणि तितकाच वादग्रस्त निर्णय घेत स्वतंत्र ‘संविधान’ जारी केले आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाचा पारा चढला असून, त्यांनी दक्षिण येमेनमधील फुटीरतावाद्यांच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले (Air Strikes) सुरू केले आहेत. यामुळे येमेनमध्ये आता केवळ अंतर्गत बंडखोरी राहिली नसून, सौदी आणि युएई मधील ‘प्रॉक्सी वॉर’ उघडपणे समोर आले आहे.

  • 03 Jan 2026 10:31 AM (IST)

    03 Jan 2026 10:31 AM (IST)

    विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा

    फलंदाजी दिग्गज विराट कोहलीने त्यांचे विजय हजारे ट्रॉफी (VHT) चे दोन्ही सामने सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे प्रेक्षकांशिवाय खेळले, त्याचप्रमाणे शनिवारी जयपूरमधील जयपुरिया कॉलेज मैदानावर पंजाब विरुद्ध सिक्कीम संघाच्या सामन्यादरम्यान भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निर्देशानुसार, भारतीय कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ३ आणि ६ जानेवारी रोजी सिक्कीम आणि गोवा विरुद्ध पंजाबचे पुढील दोन विजय हजारे ट्रॉफी सामने खेळणार आहे.

  • 03 Jan 2026 10:22 AM (IST)

    03 Jan 2026 10:22 AM (IST)

    अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या

    सोलापुरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहबे सरवदे यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे. अमित साहेबांचा राईट हॅन्ड आहे. तआधी त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्यात आली नंतर त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. यावर मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.

  • 03 Jan 2026 10:17 AM (IST)

    03 Jan 2026 10:17 AM (IST)

    BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू

    नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांना एक खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने देशभरातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये वायफाय कॉलिंग म्हणजेच Voice over WiFi (VoWiFi) सेवा अखेर लाँच केली आहे. त्यामुळे आता कंपनीच्या यूजर्सना कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. यूजर्स थेट वायफायद्वारे कॉल करू शकणार आहेत आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. कंपनीने सुरु केलेली ही नवीन सर्विस यूजर्ससाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे.

  • 03 Jan 2026 10:09 AM (IST)

    03 Jan 2026 10:09 AM (IST)

    राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

  • 03 Jan 2026 10:05 AM (IST)

    03 Jan 2026 10:05 AM (IST)

    America BombBlast Planning: अमेरिकेत  दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIS-प्रेरित १८ वर्षीय तरुण अटकेत

    अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. ISIS कडून प्रेरित होऊन हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली १८ वर्षीय ख्रिश्चन स्टर्डिव्हंट याला अटक करण्यात आली आहे. एफबीआयनुसार, आरोपीवर दहशतवादी संघटना ISIS ला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, तो एका किराणा दुकानावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title: Maharashtra naional international breaking news in marathi live updates politics sports stock market business society politics sports business global updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Maharashtra Breakig News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.