मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case Update) आणखी एक साक्षीदार (Witness) फितूर (Fitur) झाल्याचे एनआयएकडून घोषित करण्यात आले (Declared By NIA). या खटल्यातील साक्षीदार असलेल्या एका माजी लष्कारी अधिकाऱ्याने मालेगाव ब्लास्ट प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्यांवर खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला. त्यामुळे हा साक्षीदार फितूर झाल्याचे एनआयएने जाहीर केले. त्यामुळे साक्षीदार फितूर झाल्याची संख्या ३४ वर गेली असून या खटल्यात अजुनही २० साक्षीदार तपासायचे बाकी आहेत.
या साक्षीदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की राज्य एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला दंडाधिकार्यांसमोर जबाब देण्याची धमकी दिली होती. या साक्षीदाराने यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) निवेदन दिले होते की, जेव्हा तो कर्नल प्रसाद पुरोहित यांनी २००६ मध्ये लेफ्टनंटला पहिल्यांदा भेटला होता. तेव्हा, पुरोहितने त्याला अभिनव भारत संस्थेत त्याच्यासोबत काम करण्यास सांगितले होते.
[read_also content=”आमदार निधीत तफावत प्रकरण : घाईघाईने केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाची नाराजी, राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र मागे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-fund-discrepancy-case-court-displeased-with-hasty-affidavit-state-govt-withdraw-nrvb-381442.html”]
त्या वर्षाच्या शेवटी पुण्यात पुरोहित यांच्या घरी बैठकीसाठी त्याला बोलावण्यात आले. पुरोहित आणि एक अज्ञात व्यक्ती या बैठकीला उपस्थित होते, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यावर चर्चा झाली होती. आरएसएसने “आक्रमक आणि राष्ट्रवादी कार्य” करावे अशी या बैठकीत चर्चा झाली. असेही साक्षीदाराने तपास यंत्रणेला सांगितले होते. तसेच २००८ मधील मध्य प्रदेशातील पचमढी येथे पुरोहित यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रातही त्यांने सहभाग घेतला होता. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे २० युवक शिबिरात सहभागी झाले होते. इतर आरोपी समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हे देखील तेथे उपस्थित असल्याचेही साक्षीदाराने तपास संस्थेला सांगितले होते.
[read_also content=”ऐन गर्दीच्या वेळी केली चूक, लोकलचं दार अडवणं आलं अंगलट, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडव-तुडव तुडवला; दिवा स्टेशनवरची घटना झाली VIRAL https://www.navarashtra.com/viral/horrible-crime-news-mumbai-local-man-beaten-by-mob-on-diva-station-video-viral-on-social-media-381361.html”]
२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती सध्या सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू आहे.