अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना; मुंबईत घडामोडींना वेग
बारामती : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे अजित पवार यांनी हाती घेतली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी संचालक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कधीही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत माळेगावकरांनो तुम्ही दिलेल्या विश्वासाला कदापिही तडा लागू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
माळेगाव कारखान्याची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संचालक व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीनंतर कारखाना कार्यालयाबाहेर थांबलेल्या सभासद व कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आपण निवड झाल्यानंतर अधिकारी व संचालकांची बैठक घेऊन कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये अनेक सभासदांनी चांगल्या सूचना मांडल्या. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या उपयोजना करता येतील, त्या केल्या जातील. आपण निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याच्या कोणत्याही संचालकाला कारखान्याची गाडी वापरता येणार नाही. भाड्याची गाडी न वापरण्याच्या सूचना देखील आपण कार्यकारी संचालकांना दिल्या आहेत. कोणताही कामगार कामचुकार करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची ऊसतोड करताना नियमानुसारच केली जाईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा दूजाभाव होऊ दिला जाणार नाही. कारखान्याच्या हितासाठी जे काही करता येईल, ते पारदर्शी पद्धतीने केले जाईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवनगर प्रसारक म्हणून तीन जणांची शिफारस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या कारखान्याच्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असल्याने या संस्थेमध्ये सहा विश्वस्त नेमण्याचे अधिकार त्यांना आहेत, मात्र त्यांनी ॲड एस. जगताप, ॲड राजेंद्र काटे व व रोहन देवकाते या तिघांची विश्वस्त म्हणून शिफारस केली आहे, उर्वरित एका जणांची नावे देण्याचे अधिकार मला दिले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या तिघा विश्वस्तांची नियुक्ती आपण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार
माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतल्याचे सांगत अजित पवार यांनी सहकार कायद्याच्या तरतुदीनुसारच ही निवड करण्यात आली आहे. या संदर्भात आपण सहकार खात्यातील तज्ञांशी तसेच वकिलांशी चर्चा करूनच आपण अध्यक्ष होण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार दिला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.






