Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत पुन्हा हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची गोळ्या झाडून हत्या; विमानही दिले पेटवून (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना पापुआ हायलँड्स प्रांतात याहुकरिमोतील बालिंगगामा परिसरात घडली. अमेरिकेचे वैमानिक निकोलस एफ. गोसेलिन इंडोनेशियाच्या असोसिएटेड मिशन अॅव्हिएशन या विमानसेवा कंपनीसाठी काम करत होते.
त्यांच्या विमानाने वामेना येथून उड्डाण केल्यानंतर बालिंगगाम येथील धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले. याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. परंतु लँडिंगनंतर काही वेळाने विमानाशी संपर्क तुटला. यानंतर विमान जळालेल्या अवस्थेत आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी वेस्ट पापुआ नॅशनल लिबरेशन आर्मी (TPNPB) या सशस्त्र बंडखोर गटाने घेतली आहे. गटाचे प्रवक्ते सेबी साम्बोम आरोप केला की, वारंवार इशारा देऊनही त्यांच्या गटाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात उड्डाणे सुरु होती. यामुळेच ही कारवाई करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच त्यांनी इंडोनेशियन लष्कराच्या हालचालींसाठी नागरी विमानांचा वापर होते असल्याचा आरोपही केला. सांबोम यांनी असाही इशारा दिला की, त्यांच्या रेड झोनमध्ये नागरी विमानांची उड्डाणे सुरुच राहिली तर हल्ले होत राहतील. परंतु इंडोनेशियन लष्कराने हा आरोप फेटाळला असून संबंधित विमान नागरी विमान वस्तू आणि प्रवाशांच्या वाहतूकीसाठी कार्यरत होते असे म्हटले.
इंडोनेशिया सरकारने विमान जाळल्याच्या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या विमानात अमेरिकन वैमानिकासह आणखी सात स्थानिक पापुआ प्रवासी प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सातही प्रवासही सुरक्षित आहेत.
घटनास्थळ अत्यंत दुर्गम भागात असल्याचे बचाव आणि तपास कारण्यात अडचणी आल्या. इंडोनेशिया सुरक्षा दलाला दुसऱ्या दिवशी वैमानिकाचा मृतदेह मिळाला.
पापुआमध्ये १९६९ पासून हिंसक आणि सशस्त्र फुटीरतावादी चळवळ सुरु आहे. ही चळवळ अधिक तीव्र होत आहे. यापूर्वी देखील परदेशी वैमानिकांना लक्ष्य केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
२०२३ मध्ये न्यूझीलंडच्या वैमानिकाला लक्ष्य करुन त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याला जवळपास ९ महिने ओलिस ठेवण्यात आले आणि वाटाघाटी चर्चेनंचर २०२४ मध्ये त्यांची सुटका झाली.






