राज्य मंत्रीमंडळ बैठक (फोटो- सोशल मीडिया)
आज पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक
निवडणूक अधिनियम १९६१ च्या कायद्यात बदल होणार
महापालिका निवडणुकांचा निकाल १६ तारखेला येणार
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका जाहीर केल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणूक अधिनियम १९६१ या कायद्यात सुधारणा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक अधिनियम १९६१ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यात केलेल्या सुधारणेचा अध्यादेश काढला जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम समजला जाणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/lDbQIWNJAo — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 17, 2025
तसेच राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत गड किल्ले परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाणार आहे.






