Photo Credit ; Social Media
पुणे: राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक होणार असून, सर्व जागांवर मराठा उमेदवार विजयी होतील. इतर राखीव जागांवर इतर जातीचे उमेदवार निवडले जातील. मी निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय २९ ऑगस्टला होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शांतता रॅली दरम्यान उपस्थितांना संबोधताना हा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनोज जरांगे म्हणाले, राजकारणातले डाव असे खुले करायचे नसतात. पण मी निवडणूक लढायची की नाही, याचा निर्णय २९ ऑगस्टला घेतला जाईल. माझ्यापेक्षा माझा समाज महत्त्वाचा आहे. समाजाला न्याय देणं गरजेचे आहे. सगळं आता सांगणार नाही. राजकारण हे टक्क्यावर नसते असे सांगत त्यांनी २९ ऑगस्टला फायनल निर्णय घेऊ. असे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेतर मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजात दोन गटात वाद कसा निर्माण करायचा हेच फडणवीसांचे स्वप्न आहे. यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे. पण मराठा समाजात कधीच फूट पडणार नाही. त्यामुळे फडणवीसांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मी आहे तोपर्यंत मराठा समाजात फूट पडू देणार नाही, असेही मनोद जरांगेंनी सांगितले.
हे देवेंद्र फडणवीस जसे शिकवतील तसे मनसे नेते राज ठाकरे बाेलत असतात. त्यांंचं विधान जातीय द्वेषाने भरलेले असल्यामी मी त्याकडे लक्ष्य देत नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही शांतता रॅली काढली आहे. सर्वसामान्य ओबीसी व मराठा समाज हा एकच आहे. पण मराठा आरक्षणासाठी जनता आता घरातून बाहेर पडली असून अंग झटकूम कामाला लागली आहे. पुण्यासह राज्यभरात हे चित्र आहे, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा व कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चारही केला. मराठा व कुणबी एकच आहेत. त्यांच्यात कोणताही वाद नाही. मराठा आरक्षणाविरोधात विधाने करणाऱ्यांना आम्ही भाव देत नाही. मराठा समाज जातीयवादी नाही. आ्ही देवेंद्र फडणीस यांनाही विचारत नाही.