Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
Marathi Breaking News Updates : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कोकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ट्विटर ‘एक्स वर पोस्ट करत हा आरोप केला आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप दिल्ली पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी रात्री ‘एक्स’वर पोस्टमध्ये लिहीले आहे की, जंतर-मंतर येथे काही व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्यावर एक वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्याचे बोलले जात आहे.
सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरगंड रुग्णालयात दाखल करण्यात आले असू यांची प्रकृती स्थिर आहे. पण दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच, जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलक आणि समर्थकांना पोलिसांनी तेथून हटवण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात येत आहे.
जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
18 Jul 2026 06:49 PM (IST)
Virat Kohli Break Sachin Tendulkar Record: उद्या भारत अन् इंग्लंडच्या संघात शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर हा सामना होणार आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. विराट कोहली उद्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
18 Jul 2026 06:44 PM (IST)
Virat Kohli Break Sachin Tendulkar Record: उद्या भारत अन् इंग्लंडच्या संघात शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर हा सामना होणार आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. विराट कोहली उद्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
18 Jul 2026 06:33 PM (IST)
पश्चिम आशिया म्हणजेच मध्य पूर्व (Middle East) सध्या एका अत्यंत गंभीर लष्करी आणि सामरिक तणावातून जात आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे या संपूर्ण प्रदेशात युद्धाचा भडका उडालेला असतानाच, अमेरिकेने एक अत्यंत मोठी आणि दूरगामी खेळी खेळली आहे. अमेरिकेने आखाती प्रदेशातील आपल्या मित्र राष्ट्रांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा वेग प्रचंड वाढवला आहे. याच मालिकेतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सौदी अरेबियाला सुमारे २ अब्ज डॉलर्स किमतीची अत्याधुनिक शस्त्रे आणि लष्करी उपकरणे विकण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
18 Jul 2026 06:29 PM (IST)
पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटस गाव तलावाच्या क्षेत्राची सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय मोजणी होणार आहे. तलावातील अतिक्रमण आणि क्षेत्रफळाबाबतची तफावत दूर करण्यासाठी दौंड भूमी अभिलेख विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. मागील कित्येक वर्षांपासून पाटस गाव तलावातील अतिक्रमण आणि तलावाचे नेमके क्षेत्रफळ किती ? याबत वाद होता.
18 Jul 2026 06:19 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. घशात सूज आल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्णपणे आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या काही काळ सार्वजनिक भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत.
18 Jul 2026 06:08 PM (IST)
Blast In Ahmedabad Firecrackers Factory: गुजरातच्या अहमदाबाद येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबादच्या महमूदपुरा येथे असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महापौर आणि आयुक्त त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. ही घटना दुपारच्या वेळेस घडल्याचे समोर येत आहे.
18 Jul 2026 06:03 PM (IST)
Bombay High Court On Ramesh Mhatre Case : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने शनिवारी विशेष सुनावणी घेऊन रमेश म्हात्रे आणि त्यांच्या चार साथीदारांचा जामीन रद्द केला. हे प्रकरण कल्याण येथील सरकारी रुग्णालयात तीन डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. या घटनेनंतर कल्याण दंडाधिकारी न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता आणि उच्च न्यायालयाने या निर्णयाची दखल घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केले. हे प्रकरण खूपच हलक्यात घेतले गेले, असे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. रमेश म्हात्रे यांना आता १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर ते डोंबिवली पोलीस ठाण्यात हजर झाले नाहीत, तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.
18 Jul 2026 05:30 PM (IST)
स्वतःच्या हक्काचं घर मिळणं हे प्रत्येक कुटुंबाचं मोठं स्वप्न असतं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण झालं की त्या आनंद शब्दात सांगता येत नाही. मुंबईत असाच एक भावनिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा अनेक पात्र झोपडपट्टी पुनर्वसन लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या विशेष कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याने वातावरण आणखी उत्साहपूर्ण झाले.
18 Jul 2026 05:20 PM (IST)
महायुती सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, या पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला असून, कोणताही निर्णय स्वीकारण्याची तयारी आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली तरी त्यांना मनापासून शुभेच्छा असतील. जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही मंत्री मिळून काम करणे अधिक महत्त्वाचे असून पदापेक्षा विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
18 Jul 2026 05:11 PM (IST)
Mutual Fund Claim: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित असल्याबाबत बोललं जातं त्यामुळे यामध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे बरेच जण भविष्यासाठी सेव्हिंग म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहता. आजकाल बहुतेक लोक त्यात गुंतवणूक करत आहेत. पण गुंतवणूकदारांना रक्कम मिळवण्याची मोठी कसरत करावी लागते? अनेकदा, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, कुटुंबाला दावा करताना बरेच अडचणी येतात. आता, म्युच्युअल फंडचे संस्था AMFI असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर म्युच्युअल फंड युनिट्स किंवा त्यांच्या रकमेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जुने नियम बदलून नवे नियम आणले आहेत. त्यामुळे आता प्रक्रिया सुलभ होणार आहे.
18 Jul 2026 05:11 PM (IST)
सध्या सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि सई ताम्हणकर यांचा बोल बोल राणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिघांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, सनई चौघडे चित्रपटाच्या काळातील एक प्रसंग सुबोधने पहिल्यांदा इतक्या सविस्तरपणे सांगितला.
सुबोधच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी तो अगदी साध्या आणि सैलसर कपड्यांमध्ये गेला होता. त्यावेळी त्याला आपल्या दिसण्याचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा फारसा विचार करण्याची सवय नव्हती. कार्यक्रम आटोपल्यानंतर तो दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेला आणि दिवस संपला.
18 Jul 2026 04:57 PM (IST)
NEET Result Controversy: देशभरात नीट परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीवरून सुरू असलेला गोंधळ अद्यापही शमलेला नाही. एकीकडे राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक यांचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे नीटच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना निकालानंतर मोठा मानसिक धक्का बसला असून, पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:47 PM (IST)
सोनम वांगचूक आणि अन्य आंदोलकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आता थेट सुपीरम कोर्टात दाद मागण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून ताब्यात घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच अन्य आंदोलकांना देखील तेथून हटविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते आहे. यानंतर काही तासांच्या आतच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:37 PM (IST)
काही कालावधी आधी 12 युवा खेळाडूंनी बीसीसीआयविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया या विषयाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. त्यामध्ये बीसीसीआयने हायकोर्टात आपले उत्तर दिले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आणि हायकोर्टात काय घडले त्याबाबत जाऊन घेऊयात. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:27 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्या रविवारी १९ जुलै रोजी तिसरा आणि अंतिम वनडे सामना खेळला जाणार आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रंगणार आहे. वृत्तानुसार, भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो. रोहितने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी- २० क्रिकेटमधून आधीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे रोहित शर्मा खरंच रविवारी शेवटचा सामना खेळणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. परंतु, त्याआधी रोहितने निवृत्तीबाबत केलेले एक विधान पुन्हा चर्चेत आहे. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:17 PM (IST)
Sonam Wangchuk hunger Strike: शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर-मंतर मैदानातून उचलून नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली डी. आंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली आहे. रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रत देण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर वांगचुक यांच्यावर देखरेख करणाऱ्या नियमित डॉक्टरांनाही त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही, असा आरोपही गितांजली आंगमो यांनी केला आहे. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:09 PM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या काही काळापासून धुमसत असलेल्या जनआक्रोशाने आणि हिंसाचाराने आता थेट संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) लक्ष वेधून घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेने (OHCHR) या प्रदेशातील मानवी हक्कांच्या दडपशाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पाकिस्तान सरकारला तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि नागरिकांवर सुरू असलेल्या कारवाया थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान पुन्हा एकदा एकाकी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 04:08 PM (IST)
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हटवून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...
18 Jul 2026 03:59 PM (IST)
दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने आता हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही उल्लेखनीय झेप घेतली आहे. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या नैसर्गिक संपत्तीचा प्रभावी वापर करत जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. सध्या जिल्ह्यात १,४२०.९९ मेगावॅट इतकी हरित ऊर्जा निर्मिती क्षमता कार्यान्वित असून, आणखी ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे आगामी काळात धाराशिव हा मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील महत्त्वाच्या हरित ऊर्जा केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.
18 Jul 2026 03:50 PM (IST)
शिवाजीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता या दरम्यान उड्डाणपूल (ग्रेड सेपरेटर) उभारण्याच्या सुमारे ७३.५२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पुढील प्रशासकीय टप्प्यात नेण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ७२ (ब) अंतर्गत या कामासाठी ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास मुख्य सभेची मान्यता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीमार्फत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
18 Jul 2026 03:38 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेचा ( FIFA World Cup 2026 )अंतिम सामना २० जुलै रोजी खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात गतविजेता अर्जेटिना आणि स्पेन आमनेसामने येणार आहे. न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता महामुकाबल्याला सुरूवात होईल. हा विश्वचषक लिओनल मेस्सीचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे फुटबॉलचा हा भव्य सोहळा स्टेडियममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु, सामन्याआधी तिकिटांच्या दरांनी सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. एका तिकिटासाठी चाहते चक्क लाखो रुपये मोजत आहेत.
18 Jul 2026 03:25 PM (IST)
दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने सोनम वांगचुक यांना उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी मारहाण करत त्यांना डांबून ठेवण्यात आले. यामुळे जंतरमंतरवर काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. यावरून देशभरात मोठा गोंधळ उडाला असून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांकडूनही या कारवाईला विरोध होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला रोष व्यक्त केला आहे.
18 Jul 2026 03:13 PM (IST)
नवी मुंबईतील सीवूड येथून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीवूड सेक्टर-१५ येथील डीमार्टलगत बेलापूर येथील आरुष हॉटेल समोर अज्ञात तरुणाची डोक्यात वार करून झालेल्या हत्येचा गुन्हा नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी भिवंडी येथून मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन अन्सारी (वय ३६) याला अटक करण्यात आली असून, दारू पिताना झालेल्या वादातून लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
18 Jul 2026 02:59 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रामध्ये 3 मंत्रिपदांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंना 3 मंत्रिपदं हवी असून एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रिपदं शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पावसाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान प्रदेशिक पक्षांना केंद्राकडून वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये.
18 Jul 2026 02:50 PM (IST)
देशात दडपशाही सुरु आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. मात्र त्यांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचा आरोप खासदास संजय राऊतांनी केलाय. नागपुरात होणा-या उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी दिल्लीत ही कारवाई केल्याचा दावा संजय राऊतांनी केला. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहनही राऊतांनी केलंय.
18 Jul 2026 02:41 PM (IST)
धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव आणून निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने ED तब्बल 3000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला असून, तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
18 Jul 2026 02:30 PM (IST)
जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप येथे सावंतवाडी-रत्नागिरी एसटी बसचा अपघात झाला. मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. भरधाव बसने प्रथम रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कलंडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
18 Jul 2026 02:21 PM (IST)
पोलिसांची आणि अन्न व औषध प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी गुटखा तस्करांनी एक अत्यंत धक्कादायक शक्कल लढवल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी थेट कारवर 'भारत सरकार' अशी पाटी आणि भाजपचा झेंडा तसेच कमळ चिन्हाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. पालघर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला होता. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी एक संशयास्पद कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या आलिशान कारची झडती घेतली असता, पोलिसही चक्रावून गेले. कारमधून तब्बल 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला आहे.
18 Jul 2026 02:12 PM (IST)
वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे भासवून शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या पुण्यातील एका नामांकित डॉक्टरवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिमांशू अजवाणी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे.
18 Jul 2026 02:02 PM (IST)
अभिषेक दीपके यांच्यावर आंदोलनात शाईफेक, जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाला आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं रुग्णालयात नेल्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. अभिजीत दिपकेंनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. त्याच दरम्यान दीपकेंवर शाईफेक करण्यात आली आहे.
18 Jul 2026 02:00 PM (IST)
रेकॉर्डब्रेक पावसानंतर माथेरानचे रस्ते उखडले असून त्या सर्व रस्त्यांची माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोजमाप देखील घेतली आहे.दरम्याना शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
18 Jul 2026 01:55 PM (IST)
भारत हा जगभरातील तांदूळ उत्पादक देशांपैकी एक प्रमुख उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. जगभरातील तांदूळ उत्पादनापैकी एकमेव भारत देशात २८ टक्के तांदूळ पिकवला जातो. देशात भाताचे एकूण सुमारे १५ कोटी मेट्रिक टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. हे यश भारताची सक्षम कृषी व्यवस्थापन आणि शेतक-यांची जिद्द दर्शवते. मात्र तांदूळ उत्पादनासमोर आजही जुनी आव्हाने आ वासून उभी आहेत.
18 Jul 2026 01:50 PM (IST)
दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी मारहाण करत त्यांना डांबून ठेवण्यात आले. यामुळे जंतरमंतरवर काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. आज सकाळी झालेल्या या गोंधळानंतर आता सीजेपी अधिक आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान खूप प्रिय आहेत. म्हणून त्यांनी प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही.
18 Jul 2026 01:45 PM (IST)
जागतिक इतिहासात असे काही मोजकेच नेते होऊन गेले, ज्यांनी केवळ आपल्या देशाचेच नाही, तर संपूर्ण जगाचे विचार बदलून टाकले. अशाच थोर नेत्यांपैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि शांततेचे जागतिक दूत नेल्सन मंडेला (Nelson Mandela). त्यांचा जन्मदिवस म्हणजेच १८ जुलै हा दिवस दरवर्षी संपूर्ण जगभरात ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून अत्यंत आदराने साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी (UN) २००९ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि २०१० मध्ये हा दिवस पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला.
18 Jul 2026 01:40 PM (IST)
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता सिल्लोडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयात एका जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेला तिच्याच पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी चार वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालयाच्या गेटजवळ घडली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
18 Jul 2026 01:35 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मते मांडली. सध्या चित्रपटसृष्टीतील वातावरण, बदलतं सामाजिक चित्र आणि कलाकारांवर येणारा दबाब याबाबत बोलताना त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयीही मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशलमीडियावर चांगलीच रंगली आहे. मुलाखतीदरम्यान परेल रावल यांनी सांगितले की, आजच्या काळात अनेक लोक आपले विचार उघडपणे मांडताना दहावेळा विचार करतात. एखादे वक्तव्य केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याची भीती अनेकांच्या मनात असते. पुर्वी अनेक कलाकार आणि सार्वजनिक व्यक्ती निर्भीडपणे बोलत असत, मात्र आता परिस्थिती बदलल्याचे त्यांचे मत आहे.
18 Jul 2026 01:30 PM (IST)
बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांनी शुक्रवारी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर तपास अधिकारी आणि स्वारगेट पोलिस म्हणणे मांडणार आहेत.
18 Jul 2026 01:25 PM (IST)
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मिक्सरच्या वायरने गळा आवळून पत्नीची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पती स्वतः चाकण पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना चाकण (ता. खेड) इथे घडली.
18 Jul 2026 01:15 PM (IST)
आजच्या आधुनिक आणि गजबजलेल्या जगात आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आवाजाने वेढलेला आहोत. वाहनांचे हॉर्न, कारखान्यांचे आवाज, कानावर पडणारे बांधकामांचे आवाज आणि डिजिटल उपकरणांचा अखंड गोंगाट या सर्व कोलाहलात आपण निसर्गाचे आणि आपल्या सभोवतालचे खरे, शांत ध्वनी ऐकणे विसरून गेलो आहोत. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जीवनातील ऐकण्याचे (श्रवणाचे) महत्त्व आणि या ध्वनींचा आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतो, याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १८ जुलै रोजी जगभरात ‘जागतिक श्रवण दिन’ (World Listening Day) साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला केवळ ‘ऐकण्याची’ नव्हे, तर ‘जाणीवपूर्वक श्रवण करण्याची’ आठवण करून देतो.
18 Jul 2026 01:05 PM (IST)
भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava लवकरच दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. कंपनी त्यांच्या विराट स्मार्टफोन सीरीजअंतर्गत दोन्ही नवीन स्मार्टफोन्स सादर करणार असल्याची माहिती आहे. Virat V1 5G आणि Virat V1 या नावाने कंपनीचे आगामी स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. पण लाँचिंगपूर्वीच कंपनीने स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांमध्ये उत्साह वाढला आहे. Virat V1 5G आणि Virat V1 हे दोन्ही स्मार्टफोन्स 24 जुलै रोजी भारतात लाँच केले जाणार आहेत. लावाचे हे अपकमिंग स्मार्टफोन फ्रेश डिझाईन लँग्वेंज, बेस्ट परफॉर्मेंससाठी डिझाईन करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
18 Jul 2026 12:48 PM (IST)
पुणे–शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर टोल आकारला जाणार असून स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महसूल प्रशासनाकडून स्थानिक रहिवाशांचे प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी अंतिम निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नियमांनुसार होणार असल्याने स्थानिकांना टोलमुक्त प्रवासाऐवजी 'लोकल पास' घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
18 Jul 2026 12:36 PM (IST)
18 Jul 2026 12:24 PM (IST)
18 Jul 2026 12:12 PM (IST)
18 Jul 2026 11:50 AM (IST)
बॉलिवूड अभिनेतचा आमिर खान आता नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने तिसर लग्न केलं. आमिर खानने गौरी स्पिरिटशी लग्न केले; हे तिचे तिसरे लग्न केले. गौरी स्पिरिटशी ही हिंदू असल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्ट आणि एका कथित ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये आमिर खानला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला असून, ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने दिली गेल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे मनोरंजन क्षेत्रासोबतच सुरक्षा यंत्रणांचेही लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे.
18 Jul 2026 11:40 AM (IST)
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने गुपचूप त्यांच्या वेबसाईट आणि ॲपवरून एक लोकप्रिय प्लॅन हटवला आहे. कंपनीच्या एअरटेल वेबसाईट किंवा एअरटेल थँक्स ॲपवर 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध नाही. हा प्लॅन का हटवण्यात आला, याचे कारण अद्याप कंपनीने अधिकृतपणे जाहिर केले नाही. पण कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आता 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध नसल्याने यूजर्सना दुसऱ्या प्लॅनची निवड करावी लागणार आहे.
18 Jul 2026 11:30 AM (IST)
बाहेर ऊन्हाच्या कडक उष्ण लाटा आणि त्याने कासावीस झालेला जीव यामुळे व्यक्तीने एक अनोखाच जुगाड लावला आणि एसीची थंड हवा खाण्यासाठी तो एटीयममध्ये जाऊन झोपला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर आपल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
18 Jul 2026 11:21 AM (IST)
सलग २१ दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले. यावेळी जंतरमंतरवर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पण दिल्ली पोलिसांनी वागचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी केला आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. सोनम वागंचुक यांच्यानंतर आता आपणही आता उपोषणात सामील झाल्याचे दीपके यांनी सांगितले. उपोषणाची घोषणा करताना अभिजीत दीपके यांनी देशातील सर्वांना आपापल्या शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले.
18 Jul 2026 11:00 AM (IST)
डोबिंवली येथे मनसेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.
राजू पाटील म्हणाले, “मी बोलण्याच्या ओघात ‘तो रवी कुठे’ असे म्हटले. मात्र, त्याचा वेगळाच अर्थ काढून बाजार मांडण्यात आला. माझा आक्षेप बॅज लावून जाण्याबाबत होता. दीपेश म्हात्रे यांनी तो बॅज लावूनच जावे, म्हणजे ते कोणत्या पक्षात आहेत हे सर्वांना समजेल. दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुकू नको. अरे तू थुकून थुकून थोबडा ओला केला आहे.”
18 Jul 2026 10:50 AM (IST)
नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. घडलेली घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.