
Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news updates : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा केली.
कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी राज्य सरकारने ९ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून ही समिती एप्रिलपर्यंत शिफारसी सादर करणार आहे. या शिफारसींवर आधारित पुढील प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
31 Oct 2025 06:27 PM (IST)
पंढरपूर : कार्तिकी शुद्ध एकादशी येत्या रविवारी (दि.2) असून, या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.
31 Oct 2025 06:13 PM (IST)
पुणे: गेला महिनाभर सुरू असलेल्या पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या हॉस्टेल संदर्भातील व्यवहार रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांनी आज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिला. ‘हा मुद्दा जैन समाज आणि संबंधित विकसक यांच्यातील असून या प्रकरणात जैन समाजाच्या भावनांना न्याय दिला जाईल,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
31 Oct 2025 05:59 PM (IST)
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी (टीओआर) ला मान्यता दिली आहे. यामुळे वेतन आणि पेन्शन वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने नवीन वेतन रचना, निवृत्ती लाभ आणि सेवा अटी निश्चित करण्याचे काम आयोगावर सोपवले आहे. आयोगाने १८ महिन्यांच्या आत, म्हणजे एप्रिल २०२७ पर्यंत सरकारला त्यांच्या शिफारसी सादर कराव्यात.
31 Oct 2025 05:39 PM (IST)
रोहित आर्याने 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी फुलप्रुफ प्लॅन आखला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, याच आरए स्टुडिओत त्याने अभिनेत्री ऋचिता जाधवलाही बोलावले होते. धक्कादायक बाब म्हणजे, ही माहिती खुद्द ऋचिता जाधवने उघडकीस आणली आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी आरए स्टुडिओत येण्यासाठी फोन केला होता, असा दावा रुचिता जाधवने केला आहे.
31 Oct 2025 05:05 PM (IST)
मोबाईल क्रांती आणि फोर जी नेटवर्कमुळे चित्रपटगृहे हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. कोट्यवधींचा खर्च करून उभी केलेली ही थिएटर प्रेक्षकांअभावी ओस पडू लागली होती. विजेचा खर्चही निघत नसल्याने शहरातील चार सिनेमागृहे पूर्णपणे बंद पडली, तर जी सुरु आहेत ती देखील शेवटचा श्वास घेत होती. अशा परिस्थितीत, सिनेमागृहांना ‘संजीवनी’ देणारा एक महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) नुकताच गृह विभागाने जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार, सिनेमागृहांसमोरील जागेत आता रुग्णालये किंवा शाळा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.
31 Oct 2025 04:50 PM (IST)
आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहनवाज कुरेशीसह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली असून ₹१५ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
31 Oct 2025 04:40 PM (IST)
मुंबईत गुरुवारी झालेल्या रोहित आर्या एनकाउंटर प्रकरणानंतर विरोधकांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांना लक्ष्य केले आहे. रोहित आर्या बुद्धीचातुर्य आणि हुशार अभ्यासू तरुण होता. शिक्षण क्षेत्रात त्यांचे आपले चांगले प्रोजेक्ट सादर केले होते. दीपक केसरकर मंत्री असताना किती प्रोजेक्ट सादर झाले माहीत नाही. पण रोहित ज्या अर्थी सांगतोय त्याअर्थी त्याचे करोडो रुपये अडकले होते. शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ करण्याचे काम आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे, अशी खरमरीत टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.
31 Oct 2025 04:25 PM (IST)
बोईसर शहरातील गणेशनगर परिसरात आज दुपारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर येथील चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चोरट्यांनी दोन राऊंड फायरिंग केले. सुदैवाने ज्वेलर्सचे मालक गोळीबारात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
31 Oct 2025 04:20 PM (IST)
राज्यातील मतदार यादीतील कथित घोळांवरून विरोधी पक्ष आता एकत्र येत असून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चात सक्रिय भूमिका घेतली असून, या आंदोलनाला राज्यभरातून विरोधी पक्षांचे पाठबळ मिळत आहे.
31 Oct 2025 04:15 PM (IST)
चोंढी गावातील तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या मारामारी प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि अन्य काही साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर काही जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव या व्यक्तीने निकालाचा धक्का सहन न होताच काही तासांत त्याचा जीव गेला.
31 Oct 2025 04:10 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साखर कारखान्यांचे धोरण यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि साखर सहसंचालक विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने यंदा ऊसाला ३५५० रुपये प्रति टन भाव निश्चित केला असतानाही, जिल्ह्यातील एकही साखर कारखाना या निर्देशानुसार भाव द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गतवर्षीच्या हंगामात अनेक कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक भाव जाहीर करूनही, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ एफआरपीनुसारच भाव दिला. कारखान्यांकडे शिल्लक असलेली रक्कम दिली जात नसल्याची जोरदार ओरड शेतकऱ्यांनी केली.
31 Oct 2025 04:04 PM (IST)
नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मिनीट्रेन सुरु झालेली नाही.परंतु प्रवाशी वर्गासाठी आशादायक बाब म्हणजे नेरळ माथेरान मार्गावर मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना नेरळ येथून माथेरान पोहचली आहे. त्याचवेळी माथेरान येथून नेरळ अशी देखील पोहचली आहे.मालवाहू गाडी २८ ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरान साठी निघाल्यावर या गाडीला श्रीफळ वाढवून सुरुवात केली.
31 Oct 2025 03:50 PM (IST)
जेव्हा भलामोठा चित्रपट पाहण्याची इच्छा होत नाही तेव्हा कमी वेळेच्या शाॅर्ट फिल्म्स आपल्यासाठी परफेक्ट पर्याय ठरतात. बहुतेक तरुणांना आजकाल नेहमीच्या रोमँटिक कथा नाही तर सस्पेन्स थ्रिलरने भरलेल्या कथा पाहायला अधिक आवडते. या कथा शेवटपर्यंत प्रक्षकांना कथेतील रहस्य उलगडू देत नाहीत ज्यामुळे ते कथेच्या शेवटर्यंत त्याच्या मनात कथेला जाणून घेण्याती जज्ञासा कायम राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शाॅर्ट फिल्मविषयी सांगणार आहोत, ज्याची कथा तुमचे मनोरंजन तर करेलच शिवाय तुमच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण करेल. या शाॅर्ट फिल्मच नाव आहे 'चटणी'! चला या कथेत नक्की काय दडवण्यात आलं आहे ते जाणून घेऊया.
31 Oct 2025 03:45 PM (IST)
आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतात. प्रत्येकाच्या फोनमध्ये आज तुम्हाला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पाहायला मिळतील. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. पण सोशल मीडिया खरंच फायद्याचा आहे का? सोशल मीडियाचे इतके मोठ्या प्रमाणात युजर्स का आहेत? आता आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या काही हटके फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
31 Oct 2025 03:40 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. काबूलशी संबंध सुधारले असले तरी अफगाणिस्तानची भूमी फितना-अल-खवारीज आणि फितना-अल-हिंदुस्तान सारख्या दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केला आहे. यावार आता तालिबानने देखील भाष्य केले आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवस आधी पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यात अनेक नागरिक ठार देखील झाले होते.
31 Oct 2025 03:30 PM (IST)
Jalgaon Road Condition: चाळीसगाव: अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. वर्षभरातच या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावरील दोन ठिकाणी असलेल्या नाल्यांवर फरशीच बसवण्यात आली नसल्याने वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
31 Oct 2025 03:20 PM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला १२५ धावांनी हरवल्यानंतर भारत अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
31 Oct 2025 03:15 PM (IST)
Sanjay Raut Break: मुंबई: महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत हे सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणावरुन ब्रेक घेण्याचे ठरवले असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
31 Oct 2025 03:05 PM (IST)
सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. याला देवोत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. चार महिन्यांच्या योगिक झोपेनंतर विश्वाचे रक्षक असलेले भगवान विष्णू या दिवशी जागे होतात आणि या दिवशी विवाह, मुंडन, गृहस्नान इत्यादी सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मी, तुळशी आणि शालिग्राम यांच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते.
31 Oct 2025 02:52 PM (IST)
शेतकऱ्यांचे आंदोलन संपले नाही, शेवटचा हप्ता मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असे माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होत.
31 Oct 2025 02:50 PM (IST)
सोशल मिडियाच्या जगात काही ना काही घडत असतंच. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात जे पाहून आपलं मनोरंजन होईल. इथे हास्यास्पद, भावूक करणारे तसेच आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज नेहमीच शेअर होत असतात. अशातच आता इथे आणखीन एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पती-पत्नीच्या नात्याशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये पती आपल्या प्रेयसीला भेटायला जात असतो, परंतु त्याच्या पत्नीला या गोष्टीचा आधीच सुगावा लागतो, ज्यानंतर ती त्याच्या मागे मागे त्याच्या प्रेयसीकडे जाते. आता पती, पत्नी आणि त्याची प्रेयसी असे सर्वच जेव्हा आमने-सामने भिडणार तेव्हा काय घडेल याचा विचार करा… व्हिडिओमध्ये मात्र पुढे फार मोठा राडा घडून आला आणि याच हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
31 Oct 2025 02:50 PM (IST)
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती आहे. अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांनी काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
31 Oct 2025 02:40 PM (IST)
नोकरीच्या शोधात असलेल्या आणि फक्त 10वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मालकीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) कंपनीत उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने ‘हॉस्टेल सुपरिटेंडंट/वार्डन’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी वेळ देण्यात आला आहे.
31 Oct 2025 02:35 PM (IST)
प्रभागनिहाय प्रारूप यादी ६ नोव्हेंबर रोजी होईल जाहीर होणार आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यात नागरिकांची घरे दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास प्रत्येकांनी वैयक्तिक ताक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे. महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
31 Oct 2025 02:30 PM (IST)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. आज पाच वर्षांनंतरही सुशांतचे चाहते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भावपूर्ण आठवणीत ठेवतात. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता.
31 Oct 2025 02:30 PM (IST)
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील चौडी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इर्नस्टट्यूट येथे बेकायदेशीरपणे तलवार व लोखंडी शिगा, लाकडी दांडके घेऊन घुसून रुपाली थळे, विजय चळे, मनिषा घरत यांच्यासह इतर दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह इतर २० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.३०) सुनावली आहे.
31 Oct 2025 02:19 PM (IST)
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन मंत्री झाले आहेत. तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मोहम्मद अझरुद्दीन यांना गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या नियुक्तीसह आता तेलंगण सरकारमध्ये १६ मंत्री झाले आहेत. मोहम्मद अझरुद्दीन हे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत आणि ते राज्यपालांच्या कोट्यातून तेलंगणा विधान परिषदेवर निवडून आले होते आणि आता त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.
31 Oct 2025 02:15 PM (IST)
बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध चित्रपट कुटुंबांपैकी एक असलेले कपूर कुटुंब आता त्यांच्या आयुष्यातील आणि नातेसंबंधांच्या आठवणी पडद्यावर आणत आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या नवीन माहितीपट “डायनिंग विथ द कपूर्स” चे पोस्टर रिलीज केले आहे, जो २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पिढ्यानपिढ्या हिंदी चित्रपटसृष्टीला आकार देणाऱ्या कुटुंबाची झलक दाखवणार आहे, ज्याची मुळे पृथ्वीराज कपूरपासून रणबीर कपूरपर्यंत पसरलेली आहेत.
31 Oct 2025 02:08 PM (IST)
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे बेकायदेशीरपणे तलवार व लोखंडी शिगा, लाकडी दांडके घेऊन घुसून रुपाली थळे, विजय थळे, मनिषा घरत यांच्यासह इतर दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह इतर २० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.३०) सुनावली आहे.
31 Oct 2025 02:00 PM (IST)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे आजच्या दिवशी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांना केवळ पाच फुटांच्या अंतरावरुन 25 गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे कॉंग्रेसकडून आज शोक व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. या ठिकाणी आता इंदिरा गांधी स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. तसेच त्या शेवटच्या चालत आलेल्या मार्ग देखील सुरक्षित ठेवण्यात आला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी या ठिकाणी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
31 Oct 2025 01:50 PM (IST)
क्वालालंपूर येथे झालेल्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी १० वर्षांच्या ‘भारत-अमेरिका प्रमुख संरक्षण भागीदारी आराखड्या’वर स्वाक्षरी केली. या करारानंतर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “हा संरक्षण करार भारत-अमेरिका संरक्षण संबंधांच्या संपूर्ण क्षेत्राला धोरणात्मक दिशा देईल. हे आमच्या वाढत्या धोरणात्मक अभिसरणाचे प्रतीक आहे आणि भागीदारीच्या नव्या दशकाची सुरुवात दर्शवते. संरक्षण आमच्या द्विपक्षीय संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभ राहील. मुक्त, खुले आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.”
31 Oct 2025 01:40 PM (IST)
कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, 12 पोलीस उपअधिक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 127 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 386 पोलीस अंमलदार व 1 हजार 500 होमगार्ड तसेच 2 एसआरपीएफ कंपनी, 4 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी दोन पथके, आपत्कालीन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 10 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
31 Oct 2025 01:30 PM (IST)
कर्नाटक प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी काळ्या दिनाची मूक फेरी होणारच आहे. त्यामुळे, १ नोव्हेंचर रोजी काळा दिन पाळून निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केले आहे. बेळगाव, निपाणी, खानापूर येथे मराठी कानडी वाद विकोपास गेला आहे. गेली पाच दशके सीमाभागात कन्नड सक्तीचा वरवंटा मराठी भाषिकांवर फिरवला जातो आहे. त्याविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी मराठी भाषिक प्रयत्नशील आहेत. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. २१ जानेवारी २०२६ पासून नियमित सुनावणी होणार असल्याने मराठी भाषिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
31 Oct 2025 01:20 PM (IST)
बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. एनडीएने या जाहीरनाम्याला “संकल्प पत्र” असे नाव दिले आहे. एनडीएने आपल्या जाहीरनाम्यात बिहारमधील प्रत्येक तरुणाला नोकरी आणि रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. महिला उद्योजकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन दिले आहे. शिवाय, बिहारमध्ये एक फिल्म सिटी बांधण्याचेही आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि एनडीएने जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत.
31 Oct 2025 01:10 PM (IST)
भारतीय पुरुष संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या मालिकेचा पहिला सामना हा पावसामुळे धुऊन गेला त्यामुळे पहिल्या सामन्याचा निकाल आला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फॉर्ममध्ये परतण्याने भारतीय संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जाईल. युवा फलंदाज अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीने टी-२० क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे.
31 Oct 2025 01:05 PM (IST)
जावळी तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले असून, खर्शी-बारामूरे गण सर्वसाधारण प्रवर्गाला जाहीर झाल्याने व पंचायत समितीचे सभापतिपद देखील खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने खर्शीबारामुरे गणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती झाल्यास हा गण शिंदे सेनेला सोडण्यात यावा व महायुती न झाल्यास देखील या गणातून आपण निवडणूक लढणारच असल्याचे शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख समीर गोळे यांनी सांगत खर्शी बारामुरे गणात शड्डू ठोकला आहे.
31 Oct 2025 12:55 PM (IST)
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पन्नास वेळा सांगितले की मी नरेंद्र मोदींना फोन केला आणि मोदींनी डोके टेकवून ऑपरेशन सिंदूर थांबवले. भारतीय हवाई दलाची सात विमाने कोसळ्याचे ट्रम्प यांनी सांगितले पण ट्रम्प खोटं बोलत आहेत, असं म्हणण्याची पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत नाही. त्यांनी पन्नास वेळा पंतप्रधानांचा अपमान केला आहे नरेंद्र मोदी भितीपोटी अमेरिकेत गेले नाहीत आणि इथे मतांची चोरी करत आहे. अशी टिका लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (३० ऑक्टोबर २०२५) नालंदा येथे एका जाहीर सभेत बोलताना ऑपरेशन सिंदूर’वरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ”
31 Oct 2025 12:45 PM (IST)
किडनी आपल्या रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करतात आणि शरीरातून काढून टाकतात. जर किडनीने योग्यरित्या काम करणे थांबवले तर हे विषारी पदार्थ शरीरात जमा होतील, ज्यामुळे रोगाचा धोका वाढेल. म्हणून, मूत्रपिंडाच्या नुकसानाच्या लक्षणांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.
31 Oct 2025 12:35 PM (IST)
आयुष्मान खुरानाचा “थामा” आणि हर्षवर्धन राणेचा “एक दीवाने की दिवानियत” चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. दोन्ही चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. परंतु, आयुष्मान खुरानाचा “थामा” हा चित्रपट हर्षवर्धन राणेच्या “एक दीवाने की दिवानियत” पेक्षा कलेक्शनच्या बाबतीत पुढे आहे. दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या रिलीजपूर्वीच बरीच चर्चा निर्माण केली. प्रेक्षक “थामा” आणि “एक दीवाने की दिवानियत” ची आतुरतेने वाट पाहत होते आणि लोक दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत आहेत. चला जाणून घेऊया “थामा” आणि “एक दीवाने की दिवानियत” ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.
31 Oct 2025 12:25 PM (IST)
भारताने मध्य आशियातील आपली सर्वात मोक्याची लष्करी उपस्थिती संपवली आहे. भारत तझाकिस्तानच्या आयनी एअरबेसवरील ऑपरेशन्स औपचारिकपणे संपवत आहे. २००२ पासून कार्यरत असलेले हे एअरबेस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर भारतासाठी एक प्रमुख देखरेख बिंदू म्हणून काम करत होते. सरकारी सूत्रांनुसार, भारत आणि ताजिकिस्तानमधील द्विपक्षीय करार २०२२ मध्ये संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भारतीय हवाई दल आणि लष्करी कर्मचारी आणि लष्करी उपकरणे पूर्णपणे माघारी घेतल्यानंतर हे घडले.
31 Oct 2025 12:15 PM (IST)
एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस कंपनी स्टारलिंक भारतात लवकरच त्यांची सेवा सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने प्रयत्न देखील सुरु केले आहेत. भारतीय सरकारच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून मस्कला भारतात त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करावी लागणार आहे. भारतातील स्टारलिंकच्या लाँचिंगबाबत सतत अपडेट्स येत असतात. आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. हे अपडेट युजर्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात कंपनीने 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन दिवशी स्टारलिंकच्या डेमोचे आयोजन केले आहे. मुंबई शहरात हे आयोजन करण्यात आले आहे.
31 Oct 2025 12:05 PM (IST)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ५६० हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे कार्यक्रम आयोजित करत ही जयंती साजरी केली. १,२१९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण केले आणि परेड दरम्यान एकतेची शपथ घेतली, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीत श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला, देशभरात हजारो लोक सहभागी झाले आणि २३१,००० पेक्षा जास्त लोक ऑनलाइन संवाद साधले.
31 Oct 2025 12:00 PM (IST)
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की, "...काँग्रेसला केवळ ब्रिटीशांकडून पक्ष आणि सत्ता वारशाने मिळाली नाही, तर गुलाम मानसिकतेलाही आत्मसात केले. काही दिवसांत, वंदे मातरम, त्याचा १५० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. १९०५ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली, तेव्हा वंदे मातरम हा निषेधाचा प्रत्येक नागरिकाचा आवाज बनला. वंदे मातरम हा देशाच्या एकतेचा आणि एकतेचा आवाज बनला. ब्रिटिशांनी वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्नही केला. ब्रिटिशांना कधीही यश आले नाही. वंदे मातरमचा जयघोष भारताच्या कानाकोपऱ्यात गुंजत राहिला. परंतु ब्रिटिश जे करण्यात अयशस्वी ठरले, ते काँग्रेसने साध्य केले. काँग्रेसने धार्मिक आधारावर वंदे मातरमचा एक भाग काढून टाकला. याचा अर्थ काँग्रेसने समाजाचे विभाजन केले आणि ब्रिटिशांच्या अजेंडाला पुढे नेले... ज्या दिवशी काँग्रेसने वंदे मातरम तोडण्याचा, तोडण्याचा आणि विभाजित करण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी भारताच्या फाळणीचा पाया रचला. जर काँग्रेसने ते पाप केले नसते तर आज भारताचे चित्र वेगळे असते." असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.
31 Oct 2025 11:50 AM (IST)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधींनी लिहिले आहे की, भारताच्या इंदिरा गांधी - निर्भय, दृढनिश्चयी आणि सर्व शक्तींसमोर अढळ. आजी, तुम्ही मला शिकवले की भारताची ओळख आणि स्वाभिमानापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. तुमचे धैर्य, करुणा आणि देशभक्ती मला माझ्या प्रत्येक पावलावर प्रेरणा देत राहते, अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या.
भारत की इंदिरा - हर ताकत के सामने निडर, दृढ़ और अडिग।
दादी, आपने सिखाया कि भारत की अस्मिता और आत्मसम्मान से बड़ा कुछ नहीं होता। आपका साहस, संवेदना और देशभक्ति आज भी मेरे हर कदम की प्रेरणा है। pic.twitter.com/RL58wRK9Wn
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 31, 2025
31 Oct 2025 11:40 AM (IST)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांची हत्या करण्यात आलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यांची हत्या करण्यात आलेल्या ठिकाणी सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेते भावूक झाल्याचे दिसून आले.
Congress President Shri @kharge, CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji, LoP Shri @RahulGandhi and other senior Congress leaders paid tribute to former Prime Minister Smt. Indira Gandhi ji at the Indira Gandhi Memorial on her death anniversary.
📍 New Delhi pic.twitter.com/kLhGNTTf9f
— Congress (@INCIndia) October 31, 2025
31 Oct 2025 11:30 AM (IST)
मुलांना शूटिंगसाठी बोलवून त्यांना बंधक बनवून ठेवण्याचा प्रकार घडला. पवईच्या आरए स्टुडिओमध्ये ही घटना घडली. याबाबत स्टुडिओची प्रतिक्रिया समोर आली आहे. “काल आमच्या स्टुडिओमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. अन्य व्यक्तीने केलेल्या बुकिंगदरम्यान हा प्रकार घडलेला आहे. पण मुंबई पोलिसानी तत्काळ केलेल्या कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई पोलिसांचे आभार.आमची टीम पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत असून योग्य ती मदत करत आहे. आम्ही यापुढेही कलाकारांना योग्य ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत” असं आरए स्टुडिओने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
31 Oct 2025 11:20 AM (IST)
2018 मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुरुवारी याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ठाकरे यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याविषयी प्रतिसाद न दिल्याने आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
31 Oct 2025 11:10 AM (IST)
ब्रिटनच्या राजघराण्यामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राजा चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अॅड्यूज यांची राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रिन्स अॅड्यूज यांच्याकडून त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या आहेत. तसेच ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेसमधून प्रिन्स अॅड्यू यांना बाहेर काढण्यात आल्याचीही चर्चा आहे.
31 Oct 2025 11:00 AM (IST)
Indira Gandhi Death Anniversary: भारताच्या सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या महिला पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. भारताच्या पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी 9:30 वाजता त्यांच्या सफदरजंग रोड , नवी दिल्ली येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर त्यांचे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली.पाच फूटांवर सतवंतसिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाइन गन घेऊन उभा होता. इंदिरा गांधी यांच्यावर तब्बल 25 गोळ्या झाडण्यात आल्या. आजही पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा आणि त्यांचे निर्णय कोणीही विसरु शकलेले नाही.
31 Oct 2025 10:59 AM (IST)
भारताने मध्य आशियातील आपली सर्वात मोक्याची लष्करी उपस्थिती संपवली आहे. भारत तझाकिस्तानच्या आयनी एअरबेसवरील ऑपरेशन्स औपचारिकपणे संपवत आहे. २००२ पासून कार्यरत असलेले हे एअरबेस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर भारतासाठी एक प्रमुख देखरेख बिंदू म्हणून काम करत होते. सरकारी सूत्रांनुसार, भारत आणि ताजिकिस्तानमधील द्विपक्षीय करार २०२२ मध्ये संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भारतीय हवाई दल आणि लष्करी कर्मचारी आणि लष्करी उपकरणे पूर्णपणे माघारी घेतल्यानंतर हे घडले.