अमित शहांचा मोठा दावा (Photo Credit - x)
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी दावा केला आहे की, बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) युती दोन-तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकून मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येईल. News18 च्या ‘सबसे बड़ा दंगल बिहार’ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, अचूक संख्या सांगणे कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की आम्ही बिहारमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवू. आणि ‘आम्ही’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA युती निवडणूक जिंकेल.”
#Exclusive | Amit Shah hits out at the opposition, calling it a “Maha-thug-bandhan” born out of compulsion and riddled with seat-sharing differences.@18RahulJoshi | #Bihar2025 #NDA #NitishKumar #News18DangalBihar #AmitShah pic.twitter.com/kFzI3Uybzl — News18 (@CNNnews18) October 29, 2025
अमित शाह यांनी पुढे म्हटले की, त्यांनी राज्याच्या ज्या-ज्या भागांचा दौरा केला आहे, तिथे त्यांना सत्ताधारी NDA युतीच्या बाजूने सकारात्मक लाट दिसत आहे. नेटवर्क १८ ग्रुपचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी बिहारच्या राजकीय मुद्द्यांवर अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गृहमंत्री शाह म्हणाले, “आमच्या जागांच्या संख्येत अविश्वसनीय वाढ होईल. गेल्या ११ वर्षांत जे डबल इंजिन सरकार चालले, त्यापूर्वी नितीश कुमार आणि भाजपचे सरकार होते, त्यात खूप बदल झाले आहेत.” चांगल्या शासनामुळे आमच्या बाजूने ही लाट आहे. बिहारमध्ये ८७ लाख शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत आहे. बिहारच्या लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ मिळत आहे.
बिहारमध्ये NDA ची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होईल, या प्रश्नावर अमित शाह यांनी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही नितीशजींच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवत आहोत, यात कोणताही संभ्रम नाही. मी हे स्पष्टपणे सांगितले आहे.” यासोबतच त्यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा टोला लगावला. “लालूजींची इच्छा आहे की त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, तर सोनियाजींची इच्छा आहे की त्यांचा मुलगा पंतप्रधान व्हावा. मी दोघांनाही सांगू इच्छितो की बिहारमध्ये आणि दिल्लीत कोठेही (तुमच्या मुलांसाठी) जागा रिकामी नाही.”






