Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : विशाळगडावरील अतिक्रमणे वन खात्याने तातडीने जमीनदोस्त करावीत असे आदेशच वन मंत्री नाईक यांनी दिले आहेत. तसेच वन मंत्री नाईक यांनी, विशाळगडावरील वन खात्याच्या जमिनीवर असणारी अतिक्रमणे काढून, ती निघालीच पाहिजेत, गडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणे विरोधात नितीन शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. सर्व अपडेट एका क्लिकवर….
01 Mar 2025 05:12 PM (IST)
मराठी साहित्यविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांची प्राणज्योत मालवली आहे, त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या.
01 Mar 2025 04:53 PM (IST)
माणगांव तालुक्यातील कुंभे जवळच्या चन्नाट परिसरात पावसाळ्यानंतरही उत्साही ब्लॉगर व पर्यटकांचा जीवघेणा खेळ सुरूच आहे. निष्काळजीपणे येथील धोकादायक ठिकाणी वावर तसेच कुंडामध्ये उड्या मारणे अशा गोष्टी होतांना दिसत आहे. हा परिसर अत्यंत धोकादायक असून याआधी या ठिकाणी अनेक पर्यटक अडकले आहेत तर काही जणांचा जीव देखील गेला आहे. यापुढे येथे कोणतीही दुर्घटना होऊन एखाद्याचा जीव जाऊ नये आवाहन करण्यात येत आहे.
01 Mar 2025 04:34 PM (IST)
भाजपचे आमदार बबन लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे. एका वृत्तवाहिनीश बोलताना ते म्हणाले,माझे वय 60 पेक्षा अधिक आहे. मी आता विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र साधुसंताच्या आशीर्वादानं आणि पक्षाने जर संधी दिली तर एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे
01 Mar 2025 04:18 PM (IST)
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जुन्या इमारतीला धोकादायक घोषित करून पालिकेने ती पाडली. या इमारतीत राहणारे अनेक रहिवासी अक्षरशः रस्त्यावर आले. मात्र, या इमारतीत असलेला बार मात्र सुरक्षित राहिला आहे. इतकेच नव्हे, तर ‘रिपेअरिंग परमिशन’ च्या नावाखाली हा बार नव्याने बांधण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे.
01 Mar 2025 04:16 PM (IST)
ठाणे महानगर पालिका हद्दीतील बेतवडे येथील रुणवाल माय सिटी येथील दहा बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्स परिसरात अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे सोसायटीमध्ये भयभीत वातावरण झाले. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही सदर माहिती दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांना माहित पडतात तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी अग्निशमन दलाला प्राचारण केले आहे.
01 Mar 2025 03:58 PM (IST)
भाजपचे माजी मंत्री तथा परतूरचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली यापुढे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे विधान केले आहे. परंतु साधू संतांचे आशिर्वाद आणि वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर आपल्या लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. आपण आता साठ वर्षांचे झालो असल्याने रिटायरमेंटच्या मार्गावर असल्याचे लोणीकर यांनी आपल्या वाढदिवशीच स्पष्ट केले.
01 Mar 2025 02:36 PM (IST)
महाराष्ट्राचे राजकारण एका अनोख्या वळणावर आले आहे जिथे भाजप त्यांच्या मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक जुना निर्णय थांबवला आहे.
01 Mar 2025 02:20 PM (IST)
महाराष्ट्रातील विदर्भात बर्ड फ्लू (H5N1 विषाणू) चा कहर वाढत आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा गावात एका पोल्ट्री फार्ममध्ये ६८३१ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. २७ फेब्रुवारी रोजीच्या प्रयोगशाळेच्या अहवालात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ हाय अलर्ट जारी केला.
01 Mar 2025 01:43 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्म दराच्या टक्केवारीत अल्प प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाची जनजागृती, शासनाचे कठोर धोरण यामुळे मुलींचा जन्म दराचा टक्का आता वाढत चालला आहे.
01 Mar 2025 01:41 PM (IST)
मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका निवासी इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली आहे. घाटकोपरमधील पंत नगर परिसरातील इमारत क्रमांक ७६ च्या शेजारी असलेल्या इमारतीत आग लागली आहे. फ्लॅटमधून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
01 Mar 2025 01:33 PM (IST)
ऑस्ट्रेलियाचा संघ आता चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संघाला त्यांच्या सलामी जोडीमध्ये बदल करावे लागतील, ज्यात ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर दुखापतग्रस्त आहे आणि त्यामुळे तो उपांत्य फेरीसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. हा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट आहे, जो फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला.
01 Mar 2025 01:12 PM (IST)
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जर १ मार्च रोजी इंग्लंडला हरवले आणि भारताच्या संघाने होणाऱ्या २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांमध्ये किंवी संघाला पराभूत केले तर भारताचा संघ अ गटात अव्वल स्थान पटकावले आणि ऑस्ट्रेलियाने ब गटात दुसरे स्थान पटकावले. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य फेरीचा पहिला सामना ४ मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होऊ शकतो.
01 Mar 2025 01:00 PM (IST)
WhatsApp ने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि 84 लाख भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. WhatsApp ची मूळ कंपनी मेटाने कारवाई केली आहे. WhatsApp च्या गैरवापर आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे कंपनीने 84 लाख अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे युजर्सची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल.
01 Mar 2025 12:44 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा सध्या मराठा समाजाच्या रोषाचा धनी ठरत आहे. महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळल्यानंतर त्याच्याविरोधात आज मीरा-भाईंदर शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार 'जोडो मारो' आंदोलन करण्यात आले. गोल्डन नेस्ट सर्कल येथे पार पडलेल्या या आंदोलनाला शेकडो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
01 Mar 2025 12:33 PM (IST)
कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो, मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटील आणि आमदार अशोक माने यांनी शक्तीपीठ संघर्ष समितीला पत्र देवून विरोध दर्शविला आहे.
01 Mar 2025 12:29 PM (IST)
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत एक मोठा बदल केला आहे. कंपनीने आता त्यांची सर्वात स्वस्त कार अल्टो के १० लाँच केली आहे. ज्यामध्ये मानक म्हणून ६ एअरबॅग्ज आहेत.
01 Mar 2025 12:18 PM (IST)
मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे केसीसी बिल्डकॉनच्या उभ्या असलेल्या टॅंकरला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेरनचा एकाबाजूचा भाग कापला गेला. तर टॅंकर मुंबईच्या दिशेने फिरून पटली झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर कंटेनरमधील भाजीपाला सर्वत्र विखुलेला होता. महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती.
01 Mar 2025 12:15 PM (IST)
मध्य रेल्वेरील मुख्य़ मार्गिकेवर असलेले नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक कामे केली जात आहेत. प्रवाशांसाठी रेल्वे स्थानक परिसरात नवी इमारत तयार करण्यात आली आहे. या तळमजल्यावर संगणकीय आरक्षण केंद्र आणि उपनगरीय लोकल तिकीटघर तयार केले आहेत.
01 Mar 2025 12:08 PM (IST)
Pig butchering च्या घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घटना लक्षात घेऊन आता सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे. Pig butchering मध्ये बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि गृहिणींना लक्ष्य केलं जात आहे. या स्कॅममध्ये स्कॅमर्स प्रथम पीडितेचा विश्वास जिंकतात आणि त्याला गुंतवणुकीसाठी तयार करतात आणि नंतर अचानक सर्व पैसे लुटतात.
01 Mar 2025 11:55 AM (IST)
स्वारगेट घटनेनंतर एसटी प्रशासनाला जाग आली असून आता एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांप्रमाणे गणवेशसक्ती करण्यात आली आहे. चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करणे बंधणकारक करण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता खाकी टी-शर्टही घालता
01 Mar 2025 11:42 AM (IST)
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता, आज त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
01 Mar 2025 11:33 AM (IST)
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना धक्का.
01 Mar 2025 11:33 AM (IST)
स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीचं आंदोलन आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
01 Mar 2025 11:33 AM (IST)
राज्यात 1 मार्च हा परिवहन विभागाचा स्थापना दिवस “परिवहन दिन” म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मीरा-भाईंदर शहरासाठी अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 58 वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub Regional Transport Office) मीरा-भाईंदर येथे मंजूर झाले असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज जाहीर करण्यात आला आहे.
01 Mar 2025 11:32 AM (IST)
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. तर या नेत्याला पुन्हा एकदा मातोश्री वर यावं लागेल, असं भाकित नाहीतर त्यांनी दावा दाखल केला आहे.