संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांमध्ये नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता गणेशोत्सवामध्ये पुण्यात मोठी गर्दी होत असते. राज्यासह देश आणि विदेशातून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेकजण पुण्यात येत असतात. गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ठेवणे तसेच गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, खराडी, वाघाली, लोणीकंद व चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ सराइतांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.
परिमंडळ चारमधील तडीपार केलेल्या गुंडांची नावे पुढीलप्रमाणे- शिवाजी लक्ष्मण रामावत (वय ३०), सचिन अशोक रणपिसे (वय २०), सुरज उर्फ किल्या कैलास बाणेकर (वय ३५), मोहम्मद उर्फ रहिम रहेमान शेख (वय १९), सलमान चाँदबाशा शेख (वय ३०) महेश बलभिम सरोदे (वय २२) सुंदर उर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ (वय ३५), नंदकुमार संजय पासंगे (वय २२) आशा सिताराम राठोड (वय ४८) शांताबाई गोविंद राठोड (वय ५०) नीता सुनील नगरकर (वय ६३) गणेश प्रकाश जाधव (वय १९) प्रेम विकी ससाणे (वय १९) मानकीबाई कमलेश चव्हाण (वय ५०), सोनीबाई बासू राठोड (वय ६०) मुन्नीबाई रेड्डी राठोड (वय ५०) अंबु राजू धोत्रे (वय ४९) गणेश उत्तम वाघमारे (वय २२) निलेश राहूल वाघमारे (वय २५) सत्यम राजू चमरे (वय २४) मोहम्मद हुसेन खान (वय २२) गोपाळ संजय यादव (वय २६), शशि पांडू चव्हाण (वय ४२) मोहन बागीवान जाधव (वय ४१) हबीब इबालु इराणी (वय २३) कमल सुभाष चव्हाण (वय ३६) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
परिमंडळ चारमधील १०० सराइतांवर नजर
परिमंडळ चारच्या हद्दीतील १०० हून अधिक सराइतांच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्यांच्यावरही लवकरच प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. तडीपार केलेले आरोपी पुन्हा शहरात आल्यास त्वरीत जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कात्रजमधील तीन गुंड तडीपार
कात्रजमधील ३ सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले आहेत. अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २०), विनोद दिलीप धरतीमगर (वय २२), प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (वय २१) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिघांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला होता.