Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : येत्या पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक होणार आहे. क्रीडा विश्वातील सायना आणि पारुपल्ली या दोघांनी विभक्त होणार असून यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्यात बऱ्याच अमराठी लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर अभिनेता सुबोध भावेने त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
14 Jul 2025 07:13 PM (IST)
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात घडला आहे. मुंबई एअरपोर्टवर एका मालवाहू ट्रकनी विमानाला धडक दिली आहे. अकासा एअरलाईन्सच्या विमानाला एका मालवाहू ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाणार होते. या अपघातामध्ये विमानाचे आणि ट्रकचे देखील नुकसान झाले आहे.
14 Jul 2025 06:57 PM (IST)
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासाठी १४ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्वंकष विकास आराखड्यावर (डीपी) अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ४० हजारांहून अधिक हरकती, सूचना आणि आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकतींवरून नागरिकांचा डीपीवरील तीव्र विरोध स्पष्ट झाला असून, “हा वादग्रस्त डीपी रद्दच करावा,” अशी भूमिका आता शहरवासीयांनी घेतली आहे.
14 Jul 2025 06:00 PM (IST)
उत्तर प्रदेशच्या अलीगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीगडमधील प्रसिद्ध असणारे टीआर डिग्री कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर गंभीर हल्ला झाला आहे. ही विद्यार्थिनी बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होती. कॉलेजमध्ये ही विद्यार्थिनी जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर असंख्य जखमा आणि चाकूने वार केलेले निशाण होते. तिला त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने शुद्धीवर आल्यावर तिच्यावर हल्ला झाल्याचे तिने सांगितले.
14 Jul 2025 05:48 PM (IST)
अलीगढ: उत्तर प्रदेशच्या अलीगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीगडमधील प्रसिद्ध असणारे टीआर डिग्री कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर गंभीर हल्ला झाला आहे. ही विद्यार्थिनी बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होती. कॉलेजमध्ये ही विद्यार्थिनी जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर असंख्य जखमा आणि चाकूने वार केलेले निशाण होते. तिला त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने शुद्धीवर आल्यावर तिच्यावर हल्ला झाल्याचे तिने सांगितले.
14 Jul 2025 05:46 PM (IST)
राज्यातील हवामानात काहीसा बदल पाहायला मिळणार आहे. पुढील ४-५ दिवस महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात, पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.कोकणातील जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस काहीसा व्यापक स्वरूपात पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर तुलनेने कमी पण बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात फार हलकासा ते तुरळक पाऊस होण्याची शक्यता असून, पुण्याच्या घाट भागात मध्यम ते तुरळक जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट किंवा गडगडाटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
14 Jul 2025 05:24 PM (IST)
जर तुम्ही बेंगळुरूमध्ये राहत असाल किंवा तुम्ही कधी बेंगळुरूला गेला असाल तर तुम्ही बेंगळुरूची वाहतूक कोंडी नक्कीच पाहिली असेल. बेंगळुरूच्या वाहतुकीमुळे लोकांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. लोकांना १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तासंतास लागतात. आता बेंगळुरूच्या या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी EaseMyTrip चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी १ कोटी रुपये देऊ केले आहेत.
14 Jul 2025 05:11 PM (IST)
खोपोली शहरात गेले चार महिने एक वेळ पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्याविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून आज शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षातर्फे खोपोली नगरपरिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वात हा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत या महिला हंडा डोक्यावर घेऊन खोपोली नगरपरिषदच्या कार्याल्यावर पोहचल्या व त्यांनी अधिकार्यानी धारेवर धरले व एक निवेदन देत पूर्वी प्रमाणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
14 Jul 2025 05:09 PM (IST)
राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली. पण यानंतर आता राज ठाकरेंविरोधात भडकाऊ भाषण केल्याच्या आरोप करत तीन वकिलांनी थेट पोलीस महासंचालकांकडे संयुक्त तक्रार दाखल केली आहे.
स्वविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा
14 Jul 2025 04:55 PM (IST)
अहिल्यानगर शहरात सध्या जोरदार विकासकामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचे तसेच ड्रेनेजची कामे सुरू आहे. तर एकविरा चौक ते पारिजात चौक या मुख्य मार्गावर सध्या ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू आहे. मात्र या लाईन शेजारी जमा झालेला कचरा कोणाच्याही लक्षात येत नसल्याने तो थेट ड्रेनेज लाईनमध्ये वाहून जात आहे. त्यामुळे पाईप मध्ये कचरा गेल्याने भविष्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे या कामाच्या ठिकाणी कुठलेही बॅरिकेड, सूचना फलक किंवा संरक्षक व्यवस्था न लावता सरळपणे खोदकाम सुरू आहे. जर याठिकाणी एखादी दुर्दैवी जीवितहानी झाली, तर याची जबाबदारी कोणी घेणार? असा थेट सवाल माजी सैनिक मनसुख वाबळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच नागरिकांचा जीव धोक्यात घालून हे काम करत असलेल्या महापालिका प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने या गंभीर निष्काळजीपणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
14 Jul 2025 04:50 PM (IST)
कर्जत तालुक्यात बहुसंख्येने मराठा समाज राहत असून मराठा भवन उभारण्यासाठी एकत्र येऊया आणि मराठा भवन भवन उभारावुया असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.आमदार थोरवे यांनी समाजाने एकत्रित राहून केलेल्या आरक्षण लढ्याचे कौतुक केले. "जोपर्यंत समाज आपली ताकद दाखवत नाही, तोपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही असे स्पष्ट मत मांडून, मतभेद विसरून समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध झाली असून, दोन कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
14 Jul 2025 04:45 PM (IST)
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात उत्तर भारतीयांच्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली. उत्तर भारतीयांमध्ये विशेष महत्त्व असलेल्या श्रावणी सोमवारला १ जुलैपासुन सुरुवात झाली आहे. आज पहिला सोमवार असल्याने शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी शिवमंदिर परिसरात ‘बम बम भोले’च्या जयघोषाने परिसरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिव मंदिराच्या प्रवेशद्वारापासून शिवमंदिर पोलीस चौकी मार्गे उल्हासनगर दिशेला कैलास कॉलनी चौकापर्यंत भाविकांची मोठी रांग लागली होती. भर पावसात भाविक रांगेत उभे राहून दर्शनाची वाट पाहत होते.
14 Jul 2025 04:40 PM (IST)
काही महिन्यांपूर्वी सिडकोने रिक्षा स्टँड परिसरात डांबरीकरण केलेले होते. मात्र सात ते आठ दिवसांत पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून रस्त्याची चाळण झालेली आहे. रिक्षा स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे सिडको आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रिक्षा स्टँडच्या दुरवस्थेसंदर्भात लवकरच सिडकोकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
14 Jul 2025 04:40 PM (IST)
राज्य सरकारच्या जाचक करप्रणालीविरोधात आज नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यवसायिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.राज्य सरकारने दारूवरील व्हॅट दुप्पट केलं असून, परवाना शुल्कात १५% वाढ आणि एक्साईज ड्युटीत तब्बल ६० टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे.या निषेधाचं तीव्र रूप घेत आज नवी मुंबईतील अनेक हॉटेल्स एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली.व्यवसायिकांचा आरोप आहे की, या प्रकारामुळे अधिकाधिक व्यवसाय अवैध मार्गाने वळण्याची शक्यता आहे आणि कायदेशीर व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
14 Jul 2025 04:35 PM (IST)
६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांचे १५ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात डोंबिवलीकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आशयाचे डोंबिवली झळकले बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या घरासाठी एकत्र येऊयात असे बॅनर ठिकठिकाणी झळकलेले दिसत आहेत.
14 Jul 2025 04:25 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी वाहतुकीचे साधन बनलेल्या इ रिक्षा प्रवासी यांना घेऊन जात असताना या चालत्या गाडीवर झाड कोसळले.त्यावेळी रिक्षा मध्ये प्रवास करीत असलेल्या दोन प्रवाशांना आणि इ रिक्षाचालक जखमी झाले.दस्तुरी ते माथेरान हुतात्मा स्मारक या टप्प्यातील रस्ता तीव्र चढाव असलेला असल्याने इ रिक्षाचा वेग देखील कमी होता.मात्र कोसळलेले झाडं हे मोठे असल्याने इ रिक्षा मधून प्रवास करणारे प्रवाशांचे अंगावर कोसळले. इ रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षा मधून प्रवास करणारे तिघेजण जखमी झाले आहेत.
14 Jul 2025 04:15 PM (IST)
जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंड दरम्यान, भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (१४ जुलै) घसरणीसह बंद झाले. आयटी शेअर्समध्ये घसरण आणि अमेरिका-भारत व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे निफ्टी-५० आणि सेन्सेक्स सलग चौथ्या व्यापार सत्रात घसरले. आज बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १५० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८२,५३७.८७ वर उघडला. व्यवहारादरम्यान तो ८२,०१० अंकांवर घसरला. शेवटी, तो २४७.०१ अंकांनी किंवा ०.३० टक्क्यांनी घसरून ८२,२५३.४६ वर बंद झाला.
14 Jul 2025 04:13 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. भर्तरीय गोलंदाजानी इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर रोखले. प्रतिउत्तरात भारताने चौथ्या दिवसाअखेर ४ गडी गमावत ५८ धावा केल्या होत्या.आज भारत हा सामना जिंकण्याच्या खूप जवळ पोहचला आहे. या सामन्यात विजय मिळवणं गिलसेनेनेसह संगःचे प्रशिकक्ष गौतम गंभीर यांच्यासाठी देखील खूप महत्वाचा असणार आहे. परंतु, त्याआधीच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर लॉर्ड्सच्या गॅलरीत बसून एक शिवी देताना दिसून येत आहे.
14 Jul 2025 04:01 PM (IST)
राज्यातील शिंदे गटातील नेत्यांवर सातत्याने वादग्रस्त आरोप होऊ लागले असताना, आता जलसंधारण मंत्री संजय राठोड हेही अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका झाली होती. आता राठोड यांच्यावरही थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकनाथ शिंदे गटाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात संजय राठोड यांना “दणका” दिला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपल्या आमदार, खासदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक ‘डॅमेज कंट्रोल’साठी घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
14 Jul 2025 03:53 PM (IST)
युक्रेन- रशिया युद्धासंदर्भात अमेरिका ट्रम्प मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रशियासंदर्भात आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिकृत घोषणा करणार असून नाटोचे महासचिव मार्क रूटे यांच्याशी देखील वॉशिंग्टनमध्ये चर्चा करणार आहेत. त्यानंतर अमेरिकेचे विशेष दूत कीथ केलॉग युक्रेन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे संबंध ताणण्याची शक्यता असून संघर्ष अधिक तीव्र झाला तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
14 Jul 2025 03:42 PM (IST)
रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास ३ वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. अनेक नागरिकांना यात जीव गमवावा लागला आहे. अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धबंदीसाठी मध्यस्थी करत असल्याचा दावा करत असताताच, दोन्ही बाजूंनी हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. त्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चांगलंच फटकारलं आहे. पुतीन बोलतात एक आणि करतात एक. कधीच आपल्या विधानांवर ठाम राहात नाहीत. एकीकडे चांगलं बोलतात आणि रात्री लोकांवर बाँब टाकतात, अशा शब्दात त्यांनी पुतीन यांच्यावर टीका केली आहे.
14 Jul 2025 03:38 PM (IST)
पुणे: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र आता कदाचित पाऊस काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस वरुणराजा ब्रेक घेऊ शकतो. मात्र राज्यात हलक्या ते तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज नेमका काय आहे ते पाहुयात.
14 Jul 2025 03:06 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले,या पर्यटकांना परतीच्या प्रवासाच्या वेळी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. घाटरस्त्यात वाहने अडकून पडल्याने पर्यटकांना चालत घाटरस्ता उतरावा लागला.या सर्व गैरसोयींमुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीबाबत पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचे पर्यटक पाहत होते. दरम्यान शनिवारी रविवारी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करायला हवे अशा सूचना सातत्याने येत आहेत.
14 Jul 2025 03:04 PM (IST)
अखेर तो क्षण आलाच! गेल्या अनेक दिवसांपासून विवो युजर्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. विवोचा प्रिमियम सिरिजवाला अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. अनेक दमदार फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह या स्मार्टफोनने भारतात एंट्री केली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या स्मार्ट
फोनचे टिझर शेअर केले जात होते. त्यामुळे हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता अखेर ही उत्सुकता संपली आहे. कारण विवोचा नवा अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आल आहे.
14 Jul 2025 03:01 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी येथून ११ युवक तिथे फिरायला गेले. तेव्हा एकाच पोहताना मृत्यू झाला. मृतकाचे नाम साहिल राजू रणदिवे असं बुडालेल्या तरुणाचा नाव असून तो २४ वर्षाचा आहे. ही घटना मुरुडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली.
14 Jul 2025 02:58 PM (IST)
कोरियन चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी येत आहे, ज्यामुळे सर्वांचे मन दुखावले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कांग सेओ-हा यांचे निधन झाले. ही बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कोरियन माध्यमांनी कांग सेओ-हा यांच्या निधनाची पुष्टी केली आहे, ज्यात असे म्हटले आहे की ही अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती. या प्राणघातक आजाराशी झुंज देत असताना, तिने वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे.
14 Jul 2025 02:58 PM (IST)
Israel Iran War : जगातील दोन बलाढ्य देश इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. जून महिन्यात तब्बल १२ दिवस चाललेल्या युद्धानंतर काही काळ शांतता अनुभवायला मिळाली होती. मात्र, आता समोर आलेल्या खळबळजनक माहितीने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
14 Jul 2025 02:44 PM (IST)
पुणे: पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
14 Jul 2025 02:38 PM (IST)
IND Vs ENG : चालू तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जॅक क्रॉलीची वेळ वाया घालवण्याची रणनीती ही त्याने आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम रणनीती होती असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले. परंतु तो म्हणाला की, भारत तक्रार करू शकत नाही. कारण पाहुण्या संघाने दुसऱ्या दिवशीही हीच पद्धत अवलंबली. इंग्लंडचा सलामीवीर क्रॉलीच्या वेळ वाया घालवण्याच्या रणनीतीनंतर भारताला आणखी एक षटक टाकता आले नाही तेव्हा तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी राग भडकला, ज्यावर कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
14 Jul 2025 02:38 PM (IST)
सोलापूरच्या कुमठे गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या गावातील एका तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या आई वडिलांनी त्याचा अंत्यसंस्कार करून बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
14 Jul 2025 02:37 PM (IST)
प्रत्येक व्यक्तीला आपण नेहमीच सुंदर दिसावे, असे वाटत असते. सुंदर आणि चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन ट्रीटमेंट करून त्वचा उजळदार केली जाते, तर कधी वेगवेगळ्या क्रीम किंवा महागडे उत्पादने, फेश वॉशचा वापर त्वचेसाठी केला जातो. पण चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. बिघडलेली पचनक्रिया, पाण्याची कमतरता आणि सतत वापरल्या जाणाऱ्या क्रीममुळे त्वचा अधिकच निस्ते आणि कोरडी होऊन जाते. त्वचेमधील तेल आणि ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा कोरडा होऊन जातो. तरुण वयातच त्वचा अतिशय निस्तेज आणि म्हाताऱ्यासारखी वाटू लागते. दैनंदिन आयुष्य जगताना केलेल्या चुकांमुळे कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज दिसणे, त्वचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात
14 Jul 2025 02:37 PM (IST)
पुणे: पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
14 Jul 2025 02:07 PM (IST)
वडगाव मावळ : खंडाळा घाटात एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी (१२ जुलै) संध्याकाळी खोपोलीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून वाहतूक केलेले लोखंडी पाइप अचानक घसरले . यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी व कारवर ट्रकमधील लोखंडी सळी कोसळली. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
14 Jul 2025 01:55 PM (IST)
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईट एआय-१७१ च्या विमान अपघातात दररोज नवंनवीन ग सातत्याने दावे केले जात आहेत. दरम्यान, एएआयबीच्या सुरुवातीच्या अहवालावर पायलट युनियन यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात असून त्यांना वाटते की अहवालात कोणत्याही पुराव्याशिवाय वैमानिकांवर खोटे आरोप केले जात आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही अंदाज लावला जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक एआय-१७१ च्या अपघाताबाबतच्या प्राथमिक चौकशी अहवालावर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटने आयसीपीएने एएआयबीच्या अलीकडील प्राथमिक अहवालावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
14 Jul 2025 01:50 PM (IST)
भारत विरुद्ध इंग्लड सामन्याच्या पाचव्या दिनाचा हवामानाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका इंग्लडमध्ये खेळवली जात आहे. भारताच्या संघाने या मागिल दोन सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या संघाला मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर 135 धावांची गरज भारताच्या संघाला आहे.
14 Jul 2025 01:41 PM (IST)
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. इंजिनीयरिंग विभागाचे हे विद्यार्थी असून विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये विद्यापिठाकडून फेरफार करण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
14 Jul 2025 01:40 PM (IST)
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पारुपल्ली कश्यपपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ही माहिती शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केले होते आणि आता ७ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत.सायना नेहवालच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या खेळाबरोबरच ती ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनद्वारे भरपूर कमाई करते आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे. चला जाणून घेऊया या स्टार खेळाडूकडे आलिशान घरापासून ते आलिशान कारच्या संग्रहापर्यंत काय काय आहे?
14 Jul 2025 01:30 PM (IST)
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनने सोमवारी पहिल्यांदाच $120,000 ची ऐतिहासिक पातळी ओलांडली. गुंतवणूकदारांना या आठवड्यात क्रिप्टो उद्योगासाठी नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित असल्याने ही वाढ झाली. रॉयटर्सच्या मते, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सोमवारपासून डिजिटल मालमत्ता उद्योगाला नवीन नियम देऊ शकणाऱ्या अनेक प्रस्तावांवर चर्चा सुरू करत आहे. हे असे नियम आहेत ज्यांची उद्योग बऱ्याच काळापासून मागणी करत होता.
14 Jul 2025 01:27 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे आमदार उपस्थित होते. त्यांनी एकमेंकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या (डब्ल्यूएचसी) ४७ व्या अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकार आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन.
14 Jul 2025 01:25 PM (IST)
राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्ता बदलली. त्यानंतर शिवसेना पक्षही फुटला. तेव्हापासून शिवसेना पक्ष कुणाचा? निवडणूक चिन्ह कुणाकडे राहणार? याबद्दलची कायदेशीर लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर आज (14 जुलै) अधिकृत शिवसेना पक्ष आणि निडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हा खटला लढवत आहेत. आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. पण तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु राहिला.
14 Jul 2025 01:21 PM (IST)
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे राहत्या घरास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घर प्रमोद बांबर्डेकर यांचे असून ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. या घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच या घटनेचा कुडाळ पोलीस पंचनामा करीत आहेत.
14 Jul 2025 01:15 PM (IST)
सध्या बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. शिवाय बांगलादेशात हिंदू समुदायाविरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतेच ढाकामध्ये एक धक्कादायक आणि क्रूरतेची मर्यादा ओलांडणारी घटना समोर आली आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने बांगलादेशात हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे.
14 Jul 2025 01:00 PM (IST)
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध स्टंट कलाकार एसएम राजू यांचे शूटिंग दरम्यान स्टंट करताना निधन झाले. ते चित्रपट निर्माते पीए रणजीत यांच्या आगामी ‘आर्य’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत होते. यादरम्यान एसएम राजू यांचा कार उलटून स्टंट करताना मृत्यू झाला. आता अभिनेता विशालने राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
14 Jul 2025 12:55 PM (IST)
रायगडच्या माणगाव वरून कुंभेकडे जात असलेल्या एसटी बसला निजामपूर जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला साइड घेत असताना ही एसटी बस अचानक घसरून पलटी झाली. त्यामुळे हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यात १० प्रवाशी जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
14 Jul 2025 12:45 PM (IST)
जळगावातील कांचन नगरात पोलीस दलाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्या तसंच दहशत माजवणाऱ्या तरुणांची अर्धनग्न अवस्थेत शनिपेठ पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, त्याच परिसरातून गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर या दोन्ही तरुणांची कान पकडून अर्धनग्नावस्थेत धिंड काढण्यात आली.
14 Jul 2025 12:35 PM (IST)
माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह दहा जणांचाही पक्षप्रवेश झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
14 Jul 2025 12:31 PM (IST)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
14 Jul 2025 12:25 PM (IST)
कोयना धरणाचे दरवाजे उद्या उघडण्यात येणार आहे. सहा वक्री दरवाजे एक फूट 6 इंचाने उघडून 5000 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याचा धरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.
14 Jul 2025 12:20 PM (IST)
“शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत. मानांकन टिकवणे हे मोठे आव्हान. सर्वच 20 देशांनी आपल्याबाजूने मतदान केलं. यूनेस्कोकडून शिवरायांच्या कौशल्याची दखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे शिवरायांचे गडकिल्ले जागतिक वारसा यादीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
14 Jul 2025 12:15 PM (IST)
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. उद्धव ठाकरेंनी नाव चिन्ह आणि झेंडा वापरण्याची परवानगी मागितलीय. दरम्यान प्रहारचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली इतपर्यंत ठिक होतं. मात्र त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं अशी प्रतिक्रिया दिलीय.
14 Jul 2025 12:05 PM (IST)
बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्याने पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले.






