• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Add Main Events 24 April

Top Marathi News Today: हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

Marathi breaking live marathi headlines update 24 april : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2025 | 08:09 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सिंधू पाणी करार आणि भारताच्या धोरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले असून, पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा थांबवण्याची तयारी सुरू झाली आहे.

The liveblog has ended.
  • 24 Apr 2025 06:35 PM (IST)

    24 Apr 2025 06:35 PM (IST)

    नरेश मस्के यांचे अडकलेल्या प्रवाशांबाबत वादग्रस्त विधान

    जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले आहेत. मात्र कधीही विमानाने न बसलेल्या आणि रेल्वेने गेलेल्या प्रवाशांना शिंदेंनी विमानामध्ये बसवून आणलं असं अपमानस्पद वक्तव्य खासदार नरेश मस्के यांनी केले आहे.

  • 24 Apr 2025 05:55 PM (IST)

    24 Apr 2025 05:55 PM (IST)

    मावळमध्ये राष्ट्रवादीचे महागाईविरोधात आंदोलन

    वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि.24)  वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

  • 24 Apr 2025 05:37 PM (IST)

    24 Apr 2025 05:37 PM (IST)

    भारतीय बीएसफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात

    भारतीय बीएसफ जवान पाकिस्तानी ताब्यात  घेतलंच्या माहिती मिळत आहे. बीएसएफ कॉन्स्टेबल पी. के. सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं आहे.

  • 24 Apr 2025 05:22 PM (IST)

    24 Apr 2025 05:22 PM (IST)

    कात्रजच्या घाटात दरीमध्ये ट्रक पडल्याची घटना

    पुण्यातील कात्रज जुन्या बोगद्या अलिकडे दरीमध्ये ट्रक व वाहनचालक पडल्याची घटना घडली आहे. यानंतरअग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने  जखमी अवस्थेमध्ये असलेल्या वाहनचालकास दरीमधून वर काढले. तसेच शासकीय रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात रवाना केले आहे.

  • 24 Apr 2025 05:14 PM (IST)

    24 Apr 2025 05:14 PM (IST)

    हल्ल्याच्या विरोधात पाचगणी टेबल लँड बंद

    या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.24) पर्यटन स्थळ पांचगणी येथील टेबल लँड व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आपला निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ही कृती करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. वाचा सविस्तर 

  • 24 Apr 2025 04:42 PM (IST)

    24 Apr 2025 04:42 PM (IST)

    असदुद्दीन ओवैसी यांना सर्वपक्षीय बैठकीचे आमंत्रण

    पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला उशीरा का होईना असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाला देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती.

    #WATCH | | Hyderabad, Telangana: On the all-party meeting called over #PahalgamTerroristAttack, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, "The reason for which the all-party meeting is called is of national importance. The Home Minister just called me and asked where I am. He has asked… pic.twitter.com/MnKF9TjiEe

    — ANI (@ANI) April 24, 2025

  • 24 Apr 2025 03:59 PM (IST)

    24 Apr 2025 03:59 PM (IST)

    डोंबिवलीत हॉटेल बंदचे आवाहन

    दहशतवादी हल्ल्यानिषेधार्थ राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहेत. अनेकांनी विविध पद्धतीने निषेध दर्शवला आहे. डोंबिवलीत हॉटेल बंद आवाहन करण्यात आले आहे.

    DOMBIVALI : दहशतवादी हल्ल्यानिषेधार्थ डोंबिवलीत हॉटेल बंद आवाहन | NAVARASHTRA#Dombivali #Protest #MarathiNews pic.twitter.com/ZCIa05TniH

    — Navarashtra (@navarashtra) April 24, 2025

  • 24 Apr 2025 03:50 PM (IST)

    24 Apr 2025 03:50 PM (IST)

    पुण्यामध्ये घरातील किचनमध्ये लागली आग

    चंदननगर येथील भाजी मंडई जवळ असणाऱ्या तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील एका घरात किचनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून तीन वाहने दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

  • 24 Apr 2025 03:07 PM (IST)

    24 Apr 2025 03:07 PM (IST)

    भारताच्या सर्व युद्धनौकांना अलर्ट; नौसैनिक, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

    जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अतिशय कठोर पावलं उचलली आहेत. पाकिस्तानशी सर्व स्तरावर संबंध तोडण्यात आले असून त्यांचे पाणीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानने आपल्या युद्ध नौका समुद्रात उतरवल्या आहेत. दरम्यान भारतानेही सर्व युद्धनौकांना अलर्ट मोडवर ठेवले असून नौसैनिक, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

  • 24 Apr 2025 02:42 PM (IST)

    24 Apr 2025 02:42 PM (IST)

    पोलादपूरमध्ये जाळला पाकिस्तानचा झेंडा

    पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. पोलादपूरमध्ये पहलगमा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान ध्वजदहन करण्यात आले.

    पोलादपूरमध्ये पहलगमा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान ध्वजदहन#PoladpurProtest #PahalgamAttack #MarathiNews pic.twitter.com/MnxIfceL48

    — Navarashtra (@navarashtra) April 24, 2025

  • 24 Apr 2025 02:35 PM (IST)

    24 Apr 2025 02:35 PM (IST)

    अग्निशमन दलाचे फायर मॉक ड्रिल सादर

    आगीची घटनेची गंभीर परिस्थिती कधीही उद्भवू शकते. याबाबत सामान्य नागरिक देखील सतर्क आणि सजग असावे या हेतून अग्निशमन दल प्रयत्नशील असते. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिकेसमोर अग्निशमन दलाचे फायर मॉक ड्रिल सादर करण्यात आले.

    Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेसमोर अग्निशमन दलाचे फायर मॉक ड्रिल | Navarashtra#Ambernath #FireDepartmentAction #MarathiNews pic.twitter.com/rY95rx6cWd

    — Navarashtra (@navarashtra) April 24, 2025

  • 24 Apr 2025 02:33 PM (IST)

    24 Apr 2025 02:33 PM (IST)

    कर्जत सावेळे गावात दिवसाढवळ्या गोहत्या

    कर्जत तालुक्यातील सावेळे गावामध्ये एका मुस्लिम कुटुंबातील तरुणाकडून दिवसाढवळ्या गोहत्या करत असताना गोरक्षक यांनी पाहिले. त्यानंतर १५ मिनिटात कर्जत पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान,गायीची कत्तल करण्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अलकाज पटेल या तरुणाला ताब्यात घेतले असून अन्य सात पशूंची कत्तल होण्यापासून सुटका करून गोशालेत दाखल केले आहे.

  • 24 Apr 2025 02:32 PM (IST)

    24 Apr 2025 02:32 PM (IST)

    पहलगाम हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

    मुंबईमध्ये जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन केले. आज सर्व भारतीयांच्या मनात चीड आहे. निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला गेला, अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 24 Apr 2025 02:12 PM (IST)

    24 Apr 2025 02:12 PM (IST)

    शरद पवारांनी घेतले गणबोटे परिवाराची भेट

    पहलगाम मधील दहशदवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांची राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे. वाचा सविस्तर

  • 24 Apr 2025 02:01 PM (IST)

    24 Apr 2025 02:01 PM (IST)

    पहलगाम हल्ल्यातील आरोपींवर प्रत्येकी २० लाखांचे बक्षीस

    जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी ३ दहशतवाद्यांना बक्षीस रक्कम जाहीर केली आहे, ज्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले आहेत. तिन्ही दहशतवाद्यांवर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

  • 24 Apr 2025 01:29 PM (IST)

    24 Apr 2025 01:29 PM (IST)

    पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला ‘स्ट्राईक’ची भिती; लोकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं ‘हे’ शब्द

    Pakistan Google Trends: भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम पर्यटन स्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यामुळे भारतीयांमध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानविरोधत कडक कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरुन पाकिस्तान भविष्यात अशी चूक करण्याचे धाडसही करणार नाही.याच वेळी पाकिस्तानतही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुगलवर सर्वात जास्त हलगाम हल्ला, भारताचा बदला, काश्मीर हल्ला असे कीवर्ड्स सर्च केले जात आहेत.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • 24 Apr 2025 12:59 PM (IST)

    24 Apr 2025 12:59 PM (IST)

    साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष ; नाला तुंबल्यामुळे ठाणेकर आक्रमक

    रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने तो जणू रस्ताच झाला असून बाळकुम दादलानी परिसरातील नाल्याची स्थिती दयनीय झाली आहे. पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाही, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

  • 24 Apr 2025 12:57 PM (IST)

    24 Apr 2025 12:57 PM (IST)

    नेरळमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध

    पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. नेरळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी काळे पोस्टर दाखवून दहशदवादी हल्ल्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

    Neral : नेरळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध | Navarashtra#Neral #PahalgamAttackProtest #MarathiNews pic.twitter.com/B8c13b6ARd

    — Navarashtra (@navarashtra) April 24, 2025

  • 24 Apr 2025 12:55 PM (IST)

    24 Apr 2025 12:55 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांशी चकमक

    जम्मू आणि कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यात एक जवान शहीद झाला. त्यानंतर चकमक सुरू झाली, अशी माहिती लष्कराने दिली आहे.

  • 24 Apr 2025 12:50 PM (IST)

    24 Apr 2025 12:50 PM (IST)

    काश्मीर ते महाराष्ट्र अडकलेल्या पर्यटकांसाठी खास विमानसेवा

    पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरुप राज्यामध्ये परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या 100 पर्यटकांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

    काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष… pic.twitter.com/WqRdPkWs2L

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2025

  • 24 Apr 2025 12:45 PM (IST)

    24 Apr 2025 12:45 PM (IST)

    कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली बंद

    पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने डोंबिवली बंद हाक पुकारली आहे. याचपार्श्वभूमीवर डोंबिवलीतीला दुकानं बंद ठेवण्यात आली आहे.

  • 24 Apr 2025 12:42 PM (IST)

    24 Apr 2025 12:42 PM (IST)

    पंतप्रधानांकडून दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाआधी दोन मिनिटे मौन बाळगले. तसेच दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

  • 24 Apr 2025 12:38 PM (IST)

    24 Apr 2025 12:38 PM (IST)

    नवी दिल्लीत पाकिस्तीन उच्चयुक्तालयाबाहेर आंदोलन

    पहलगाम दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर  गेल्या अर्ध्या तासापासून नवी दिल्लीत पाकिस्तीन उच्चयुक्तालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. लोकांची बॅरिकेडवर चढून  निदर्शन करण्यात आले.

  • 24 Apr 2025 11:47 AM (IST)

    24 Apr 2025 11:47 AM (IST)

    एकनाथ शिंदेंनी घेतली श्रीनगरमध्ये अडकलेल्यांची भेट

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर जम्मू -काश्मीर दौरा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली आहे.

    "संकटातही सोबत... शिवसेना तुमच्यासोबत!"
    उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब थेट श्रीनगरमध्ये — महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक हात मदतीचा, विश्वासाचा!"@mieknathshinde #Shivsena #EknathShinde #PahalgamAttack #WithPeopleAlways pic.twitter.com/3Nmzxll142

    — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) April 23, 2025

  • 24 Apr 2025 11:16 AM (IST)

    24 Apr 2025 11:16 AM (IST)

    Pahalgam Terror Attack : पाकिस्तानचा अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू

    पाकिस्तानच्या युद्धनौकांनी सुरू केलेला सराव, विशेषतः अत्याधुनिक क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, हा भारताच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा सराव सामान्य सराव नसून, भारताला संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते. मात्र भारत या प्रकारच्या दडपणांना भीक घालणार नाही, असे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.

    #BREAKING Pakistan announces live-fire naval drills for tomorrow, in the Arabian Sea, near its maritime border with India.@rwac48@arunp2810@SPS_Shahid@LancerFlying @goldenarcher @reportersujan @VishnuNDTV @ParthSatam pic.twitter.com/3rwADW3Nvo

    — Sandeep Mukherjee (@Libertarian196) April 24, 2025

    credit : social media

  • 24 Apr 2025 11:12 AM (IST)

    24 Apr 2025 11:12 AM (IST)

    गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू

    दिल्लीतील गृह मंत्रालयात गृह सचिवांसोबत RAW आणि IB च्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. पहलगाम हल्ला आणि अंतर्गत सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा आहे.

  • 24 Apr 2025 10:58 AM (IST)

    24 Apr 2025 10:58 AM (IST)

    गणबोटे आणि जगदाळे यांना मुरलीधर मोहोळांनी वाहिली श्रद्धांजली

    पहलगाम दहशदवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पहाटे निवासस्थानी आणण्यात आले. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दोघांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे,

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Murlidhar Mohol (@murlidharkmohol)

  • 24 Apr 2025 10:57 AM (IST)

    24 Apr 2025 10:57 AM (IST)

    काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु

    काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन गुरुवारी (दि.24) मुंबईला येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 24 Apr 2025 10:54 AM (IST)

    24 Apr 2025 10:54 AM (IST)

    भाजपकडून आतंकवादी हल्ल्याचा निषेध

    पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपाकडून नगर पुणे महामार्गावर आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

    Ahilyanagar : भाजपाकडून नगर पुणे महामार्गावर आतंकवादी हल्ल्याचा निषेध | Navarashtra#Ahilyanagar #BJPProtest #MarathiNews pic.twitter.com/bm2lYNG00d

    — Navarashtra (@navarashtra) April 23, 2025

  • 24 Apr 2025 10:54 AM (IST)

    24 Apr 2025 10:54 AM (IST)

    क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज ५२ वा वाढदिवस 

    आज क्रिकेटच्या देव म्हणजेच सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे.  सचिन तेंडुलकर आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. वाचा सविस्तर 

     

  • 24 Apr 2025 10:48 AM (IST)

    24 Apr 2025 10:48 AM (IST)

    पाकिस्तानने सुरु केला क्षेपणास्त्र सराव

    पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. पाक नौदलाने २४ एप्रिलच्या सकाळपासून २५ एप्रिलच्या दुपारी ४ वाजेपर्यंत अरबी समुद्रात क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केला आहे. पाकिस्तानने याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्था UKMTO (United Kingdom Maritime Trade Operations) ला दिली आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events 24 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashtra news
  • political news

संबंधित बातम्या

BJP National President: कोण होणार  राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता
1

BJP National President: कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट
2

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा; नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार
3

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा; नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले
4

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

व्हिडिओ

पुढे बघा
Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.