पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला 'स्ट्राईक'ची भिती; लोकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं 'हे' शब्द (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यामुळे भारतीयांमध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानविरोधत कडक कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरुन पाकिस्तान भविष्यात अशी चूक करण्याचे धाडसही करणार नाही.
याच वेळी पाकिस्तान सरकारडून पहलगाम हल्ल्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया आल्या आहेत. या हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही एक संबंध नसल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्या धूडकावून लावण्यासाठी तयार आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानमध्येही दिसून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिकांमध्ये देखील भिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी नागरिक गुगलवर भारताबद्दल सर्च करत आहेत. पाकिस्तानी नागरिक हल्ल्याची माहिती सोशल मीडियावर शोधत आहेत. पाकिस्तानमध्ये गुगलवर भारतीय नेत्यांबद्दल विशेष करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी माहिती सोधली जात आहे.
याशिवाय, पहलगाम हल्ला, काश्मीर हल्ला, मोदी, भारताचा बदला, आणि जम्मू सारखे कीवर्ड्स सर्च केले जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तामध्ये पहलगाम हा शब्द तिसऱ्या स्थानावर ट्रेंड करत आहे. यावरुन दिसून येते की, पाकिस्तीनी नागरिकांमध्ये या घटनेनंतर अस्वस्थता आणि अशांतात आहे. लोकांमध्ये भारताच्या प्रतिक्रियांबद्दल धास्ती निर्माण झाली आहे.
केवळ गुगलवरच नव्हे तर, फेसबुक, ट्विटर, युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा सुरु आहे. पाकिस्तानमध्ये #PahalgamTerriostAttackआणि #modi ट्रेंड होत आहेत. सोशल मीडियावर गुगल सर्चने स्क्रीनशॉट शेअर केले आहे. यावरुन स्पष्ट दिसून येते की पाकिस्तानी नागरिक भारताच्या लष्करी कारवाईशी संबंधित माहिती देखील शोधत आहेत.
अनेक पाकिस्तीनी नागरिकांनी त्यांच्या पोस्टमध्ये भीती व्यक्त केली आहे की, भारत या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मोठ्या लष्करी कारवाई करु शकतो. यामुळे पुलवामा आणि बालाकोटा सारख्या जुन्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. भारताच्या पहलगामवरील हल्ला, काश्मीर हल्ल्याचे अपडेट. मोदींची पहलगामवरील प्रतिक्रिया, पाकिस्तानी सैन्यावर भारताच्या बातम्या असे शोधत आहेत.
भारताने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. भारताने भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थिगीत दिली. तसेच 1 मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. याशिवाय पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना भारताचा व्हिसा यापुढे मिळणार नाही. तसेच 48 तासांत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसह नारिकांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे