Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : मागील तीन दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सायंकाळच्या वेळेस वरुणराज रोज हजेरी लावत आहे. हवामान विभागाने राज्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत असू शकतो. मुंबईतील काही भागांना काल हवामान खात्याने यलो अलर्ट तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. आता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला देखील पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
15 May 2025 04:08 PM (IST)
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 खोपोली शिळफाटा येथे निमुळता असल्याकारणाने तेथे प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात व दररोज वाहतुकीची कोंडी होत असते. सदर रस्ता रुंदीकरणासाठी आम आदमी पार्टी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर 42 डिग्री तापमानात भर उन्हात करण्यात आले.
15 May 2025 03:32 PM (IST)
भारतात आयफोन बनवण्याची अॅपलची योजना आता अडचणीत येऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतात आयफोन उत्पादनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत भारतात बनवलेले आयफोन फक्त भारतातच विकले जातात तोपर्यंत ते ठीक आहे, परंतु अमेरिकेसाठी आयफोन भारतात बनवू नयेत.
15 May 2025 02:57 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाकडे प्रार्थना केली.
#WATCH | Head coach of Indian cricket team, Gautam Gambhir offers prayers at Shree Siddhivinayak Ganapati Temple in Mumbai.
(Video: Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust) pic.twitter.com/SHEcPyOJDs
— ANI (@ANI) May 15, 2025
15 May 2025 02:09 PM (IST)
श्रीनगर मधील एअर बेसला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट देत भारतीय हवाई दलाच्या (IAF) जवानांशी संवाद साधला. यावेळी सैन्याने 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या.
#WATCH | J&K: Indian Air Force (IAF) personnel raise slogans of 'Vande Mataram' and 'Bharat Mata ki Jai' as they interact with Defence Minister Rajnath Singh at Srinagar Air Base. pic.twitter.com/0Hxz1WWmiD
— ANI (@ANI) May 15, 2025
15 May 2025 02:00 PM (IST)
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर तीव्र हल्लाबोल केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांबरोबर संवाद करताना सांगितले की, भारत कधीही युद्धाच्या बाजूने नव्हता, परंतु जेव्हा आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला होईल तेव्हा आम्ही प्रत्युत्तर देऊ. जगाला संदेश देताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानसारख्या दुष्ट देशाच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर देखरेख ठेवली पाहिजे. तसेच ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याचं राजनाथ सिंह यांनी भरभरून कौतुक केलं आहे. "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून मारलं आणि आम्ही दहशतवाद्यांना, पाकिस्तानला त्यांचं कर्म पाहून अद्दल घडवली.
15 May 2025 01:52 PM (IST)
"पाकिस्तान सारख्या बेजबाबदार आणि विशिप्त देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली पाहिजेत," अशी मागणी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.
15 May 2025 01:36 PM (IST)
ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेत आलेल्या लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही विजय शहा यांना फटकारले आहे. दुसरीकडे जबलपूर उच्च न्यायालयाने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाने संपूर्ण आदेश समाविष्ट करून एफआयआर योग्यरित्या लिहिण्यास सांगितले आहे.
15 May 2025 12:49 PM (IST)
पुण्यातील धायरीमध्ये डीएसके चौक येथे एका इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
15 May 2025 12:47 PM (IST)
मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.
15 May 2025 12:09 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धावर मध्यस्थी केल्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
15 May 2025 11:57 AM (IST)
उत्तर प्रदेशातील बलिया येथील भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि रसरा साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंह रघुवंशी यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, बब्बन सिंग एका लग्न समारंभात एका महिला डान्सरसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बब्बर सिंग यांनी याला बांसडीहच्या आमदार केतकी सिंग यांच्या समर्थकांचे षड्यंत्र म्हटले आहे आणि पोलिसांकडे तक्रार करण्याबद्दल बोलले आहे, तर केतकी सिंग यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
15 May 2025 11:50 AM (IST)
सध्या शिधाकार्ड धारकांचे ई-केवायसी करणे सुरु आहे. यामध्ये उत्पन्न वाढलेल्या कुटुंबाचे शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील 18 लाख रेशन कार्ड धारकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
15 May 2025 11:32 AM (IST)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. तणावपूर्ण परिस्थितीनंतर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh arrives in Srinagar, Jammu and Kashmir. J&K Lt Governor Manoj Sinha is also accompanying him. pic.twitter.com/G9pBg3NA6e
— ANI (@ANI) May 15, 2025
15 May 2025 10:52 AM (IST)
पाकिस्तानला एका बाजूने भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. तर बलुचिस्तानने देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.बलोच नेते मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
15 May 2025 10:46 AM (IST)
भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकले आहेत. नाशिकमध्ये पार पडलेल्या त्यांच्या एक सभेमध्ये हे पोस्टर झळकवण्यात आले.
15 May 2025 10:44 AM (IST)
भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी सुरु असली तरी सीमा भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. संघर्षमय परिस्थिती असताना त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
15 May 2025 10:44 AM (IST)
रोहित शर्माचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा अनेकदा अशा मजेदार कमेंट्स करत असतो. जे चाहत्यांनाही खूप आवडत आले आहे. चाहतेही हा व्हिडिओ पाहून खूप आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. खेळाडूंना उकसवणे रोहित शर्माला नेहमीच आवडते आणि त्याचाच प्रत्यय या मुलाखतीत आला असून हा व्हिडिओ व्हायरल होतोय
15 May 2025 10:42 AM (IST)
महाराष्ट्रामध्ये होणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मोठे राजकारण रंगले होते. विरोधकांनी जोरदार टीका करत हे महायुती सरकारचे अपयश असल्याचे म्हणत मोठी टीका केली होती. आता हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमधून बाहेर पडून उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे.