Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates: ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे, कारण खासदार हा जनतेचा खरा प्रतिनिधी असतो, असे म्हणत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा भिन्न भूमिका मांडली आहे.”देशाचे सैन्य कोणत्याही एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशाचे आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे,” असा सल्लाही काँग्रेसने दिला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात देशाला सखोल माहिती मिळावी, यासाठी काँग्रेसने संसदेचे विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे.
14 May 2025 05:37 PM (IST)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान या तणावाच्या काळात भारताचा एक जवान पाकिस्तानमध्ये चुकून पोहोचले होते. मात्र आज सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. 14 मे ला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पाकिस्तानने त्यांना सुरक्षितपणे भारताच्या स्वाधीन केले. यावर आता बीएसएफ जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
14 May 2025 04:49 PM (IST)
नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती, सरन्यायाधीश भूषण गवई, शरद पवार - अजित पवार यांच्यावर देखील भाष्य केले आहे.
अनिल देशमुख म्हणाले, "नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघडकीस आला आहे. हा घोटाळा तर व्यापमपेक्षा मोठा घोटाळा दिसून येत आहे. 20 ते 30 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्त्या झाल्या." नागपूर जिल्ह्यात 1058 शिक्षक बोगस असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.
14 May 2025 04:03 PM (IST)
रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या ,गाड्या ,अनधिकृत वाढीव बांधकामावर पालिकेने कडक कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
14 May 2025 03:55 PM (IST)
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन केल्लर लाँच केले आहे. यात आतापर्यंत तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले असून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
14 May 2025 02:51 PM (IST)
भारत सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. यानंतर आता एक नवीन निर्णय घेत ई पासपोर्टची सेवा सुरु करण्यात आली आहे. ई पासपोर्टमुळे प्रवाशांची ओळख सुरक्षित राहणार आहे, शिवाय इंटरनॅशनल प्रवासात देखील मदत मिळणार आहे. ई-पासपोर्ट दिसायला पारंपारिक पासपोर्ट प्रमाणेच असतो, परंतु यामध्ये एक खास माइक्रोचिप लावलेली असते. या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, तसेच बायोमेट्रिक डिटेल्स देखील सेव्ह केलेल्या असतात. जसं की फोटो, फिंगरप्रिंट इत्यादी. हा संपूर्ण डेटा सुरक्षित पद्धतीने एन्क्रिप्टेड असतो. हा डेटा केवळ अधिकृत स्कॅनिंग सिस्टमद्वारेच वाचला जाऊ शकतो.
14 May 2025 02:08 PM (IST)
Nubia Z70S Ultra स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने Nubia Pad Pro देखील लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन Snapdragon 8 Elite SoC, 16GB पर्यंत रॅम आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफनची डिझाईन अतिशय युनिक आणि आकर्षत आहे. यानंतर आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन गॅझेट लाँच करण्याच्या तयारी आहे. आता लवकरच कंपनी Ultra Retro किट लाँच करणार आहे.
14 May 2025 01:10 PM (IST)
दहिसर ते काशीगाव मेट्रो मार्गिकेची आज चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या मार्गिकेमुळे मुंबईतील वाहतूक समस्या मार्गी लागणार आहे.
14 May 2025 12:47 PM (IST)
तेजस्वी घोसाळकर पोहोचल्या उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचल्या असून उद्धव ठाकरेंनीच तेजस्वी घोसाळकर यांना भेटीकरिता बोलावले आहे.
14 May 2025 12:22 PM (IST)
पंजाब सीमेवर तैनात असलेले BSF जवान पूरनम कुमार शॉ 23 एप्रिल रोजी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि तेव्हापासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात आहेत. या घटनेनंतर त्यांच्या सुटकेसाठी दोन्ही देशांमध्ये सुरुवातीला ध्वज बैठकांद्वारे चर्चा झाली. मात्र तब्बल 22 दिवसांनंतर पाकिस्तानने भारताचा बीएसएफ जवान पूर्णम कुमार यांना भारतात परत पाठवले आहे.
14 May 2025 12:01 PM (IST)
नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह आसपासच्या भागातून पिकणारा दर्जेदार कांदा आता थेट दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे. मुंबई बंदरावरून या कांद्याचा थेट निर्यातीस प्रारंभ झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध झाली आहे.
14 May 2025 11:58 AM (IST)
'ऑपरेशन सिंदूर' आणि संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील पानिपत येथून एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या गुप्तहेराचे नाव नौमन इलाही आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील कैराना येथील आहे. तो पाकिस्तानातील इक्बाल नावाच्या दहशतवाद्याच्या संपर्कात होता. तो इतर सोशल मीडिया अॅप्सद्वारे देशाशी संबंधित गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवत होता.
14 May 2025 11:57 AM (IST)
पीएमपीएमएल आणखी एक हजार बसेस घेणार आहे. यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बस खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता याबाबतचा निर्णय घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे.
14 May 2025 10:58 AM (IST)
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात आजपासून ड्रेसकोड लागू करण्यात आली. यासंदर्भात देवस्थान व्यवस्थापकांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाविकांनी मंदिरात पारंपारिक कपडे परिधान करून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
14 May 2025 10:54 AM (IST)
महाराष्ट्राचे सुपु्त्र म्हणजेच न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. न्यायमूर्ती गवई हे २३ नोव्हेंबरपर्यंत सरन्यायाधीश राहणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात, सरन्यायाधीश गवई वक्फ प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करतील. त्याच वेळी, न्यायमूर्ती बीआर गवई हे बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे पहिले सरन्यायाधीश आणि अनुसूचित जातीतील दुसरे सरन्यायाधीश आहेत.
14 May 2025 10:46 AM (IST)
स्मार्टफोन कंपनी मोटोरोला इतर कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आता मोटोरोलाने नवीन प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंंमत 99 हजार रुपयांच्या घरात आहे. स्मार्टफोनचा लूक देखील क्लासी आहे. शिवाय फीचर्स देखील अत्यंत कमाल आहे.
14 May 2025 10:03 AM (IST)
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रमुख नेते शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर जनतेला काय फायदा होईल? वास्तवात, शरद पवार आणि अजित पवार कधीच वेगळे झाले नव्हते. हे केवळ एक ढोंग आहे’, असे बच्चू कडू म्हणाले.
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
14 May 2025 09:19 AM (IST)
ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यात एक बुलेटप्रूफ वाहन समाविष्ट करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
14 May 2025 09:14 AM (IST)
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातल्या परळी (Parli) गावात मंगळवारी संध्याकाळी एका तरुणीची निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणी परळीतील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम येथे नर्स म्हणून काम करत होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. पण अलीकडे काही कारणांमुळे या दोघांमध्ये वाद वाढले होते.या वादातूनच संबंधित तरुणाने तिला लक्ष्य करून हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.






