Maharashtra Breaking News, Marathi News Live Updates
Modi Putin Meet : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले असताना नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर एक अत्यंत अनपेक्षित आणि ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः विमानतळावर पोहोचून पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. सामान्यतः अशा प्रसंगी परराष्ट्र मंत्री किंवा उच्चपदस्थ अधिकारी परदेशी नेत्यांचे स्वागत करतात, मात्र पंतप्रधान स्वयं उपस्थित राहणे हे राजनैतिक प्रोटोकॉलला छेद देणारे होते. ही केवळ औपचारिकता नव्हती, तर भारत-रशिया) मैत्रीची (India-Russia friendship) ताकद, परस्पर विश्वास आणि विशेष संबंधांचे प्रतिक म्हणून पाहिले गेले. मोदी आणि पुतिन यांच्यातील उबदार हस्तांदोलन आणि मिठीने जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
सविस्तर वृत्त- राजनैतिक चौकटीपलीकडील संवाद! PM मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले मित्राचे स्वागत
05 Dec 2025 06:28 PM (IST)
मुंबई: राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीन' पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआय' (Artificial intelligence)तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
05 Dec 2025 06:03 PM (IST)
नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यात एका चिमूरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये संतापजनक घटना घडली आहे. 55 वर्षांच्या व्यक्तीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
05 Dec 2025 05:55 PM (IST)
अलीकडेच टाटा मोटर्सने भारतीय बाजारात नवीन टाटा सिएरा लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे. कंपनीने अद्याप सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत. सर्व व्हेरिएंटच्या किंमती डिसेंबर 2025 च्या मध्यापर्यंत जाहीर केल्या जातील. 16 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन बुकिंग सुरू होण्यापूर्वी आणि डीलरशिपवर बुकिंग सुरू होण्यापूर्वी किंमती जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.5 लाखांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे.
05 Dec 2025 05:36 PM (IST)
नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यात एका चिमूरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये संतापजनक घटना घडली आहे. 55 वर्षांच्या व्यक्तीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
05 Dec 2025 05:03 PM (IST)
भारतात बजाजने अनेक उत्तम आणि स्टायलिश लूक असणाऱ्या Pulsar बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय 160 सीसी स्पोर्ट-नेकेड बाईकचा एक नवीन प्रकार, बजाज पल्सर एन160 लाँच केली आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये सिंगल-सीट पर्याय आणि प्रीमियम गोल्ड यूएसडी फोर्क्स आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 1,23,983 आहे.
05 Dec 2025 04:50 PM (IST)
दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आबा मोरे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत स्वगृही परतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातच बंडाची पहिली ठिणगी पडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घर वापसी केल्याने आमची ताकद आणि उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते राजेश वायाळ पाटील यांनी दिली आहे..
05 Dec 2025 04:45 PM (IST)
दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आबा मोरे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत स्वगृही परतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातच बंडाची पहिली ठिणगी पडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घर वापसी केल्याने आमची ताकद आणि उत्साह वाढला आहे.
05 Dec 2025 04:40 PM (IST)
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाच्या मुलाखतींना उमेदवार इच्छुकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ढोल-ताशे, बँड आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात उमेदवारांनी ताकदीचे शक्तीप्रदर्शन करत मुलाखतींना हजेरी लावली. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी आणि महानगरप्रमुख किरण काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मुलाखतींसाठी मनपाकरिता २१७, जिल्हा परिषदेसाठी ९८ आणि पंचायत समितीसाठी १४१ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. महिला, युवा आणि नवीन चेहऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.
05 Dec 2025 04:35 PM (IST)
महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या सेवांवर संकट निर्माण करणाऱ्या TET अनिवार्यता निर्णयाविरोधात राज्य शासनाने अद्याप सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने शिक्षकवर्गात तीव्र नाराजी उसळली आहे. याच निषेधार्थ नांदेडमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत 5 डिसेंबर रोजी आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मुक मोर्चा काढला. शासनाच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांनी या लढ्याला तिव्र स्वरूप दिले असून, सेवा सुरक्षा, भविष्य आणि न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरला.
05 Dec 2025 04:30 PM (IST)
सोलापूर शहरातील एका २२ वर्षीय तृतीय पंथीय व्यक्तीने स्वतःला संपवले आहे. प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. प्रकाश व्यंकप्पा कोळी असे मृत तरुणाचे नाव असून प्रकाशने मृत्यूपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
05 Dec 2025 04:25 PM (IST)
मटण मच्छी खातात म्हणून मराठी लोकांना नाकारला फ्लॅट नाकारल्याची धक्कादायक आणि संतापजक घटना मीरा भाईंदरमध्ये घडली आहे.
05 Dec 2025 04:20 PM (IST)
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) मोठा राजकीय धक्का बसला आहे. हितेंद्र ठाकूर यांचे जवळचे सहकारी आणि बविआचे महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. बविआ परिवहन समितीचे अध्यक्ष कल्पक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे बविआला मोठा फटका बसणार आहे. आमदार राजन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
05 Dec 2025 04:15 PM (IST)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दोन दिवसीय भारत दौरा अनेक कारणांनी गाजत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींसोबत ते २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर बैठकीत सहभागी होतील. या भेटीदरम्यान संरक्षण करार, कुशल कामगारांसाठी मोबिलिटी पॅक्ट आणि नागरी अणु करार होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यामुळे भारत-रशिया व्यावसायिक संबंधांसाठी नवे मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधी पक्षात रंगलेले शाब्दिक युद्ध ही सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पाहा!
05 Dec 2025 04:08 PM (IST)
मेट्रो ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कल्याण शहराला बसला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामादरम्यान मुख्य पाइपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गुरुदेव हॉटेलजवळील रस्ता खचला असून नागरिकांना २४ तासांहून अधिक काळ पाणी मिळालेले नाही. कल्याण स्टेशन परिसरात आणि बैल बाजार भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांमधील समन्वयाच्या अभावामुळे कल्याणकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
05 Dec 2025 03:50 PM (IST)
प्राध्यापक भरती हा राज्यातील रखडलेल्या मुद्द्यांपैकी एक असलेला मुद्दा आहे. कारण काही दिवसांपूर्वीच उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीचा विषय जाहिर केला होता. पण यातील निकष NET/SET उत्तीर्ण आणि उच्चशिक्षित उमेदवारांना मान्य मुळीच नव्हते. कारण यामुळे ते भरतीमध्ये नियुक्त होण्यापासून वंचित राहत होते. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी प्राध्यापक भरतीसाठी नवीन निकष जाहीर करणारा अध्यादेश प्रसिद्ध केला होता. मात्र या अध्यादेशामुळे अनेक NET/SET उत्तीर्ण आणि उच्चशिक्षित उमेदवार भरतीपासून वंचित राहतील, अशी गंभीर शक्यता निर्माण झाली. परिणामी शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध विद्यापीठातील प्राध्यापक संघटना, संशोधक आणि उमेदवारांनी या निर्णयाला विरोध दर्शवित सरकारचे लक्ष वेधले.
05 Dec 2025 03:40 PM (IST)
Indigo flights cancelled : नवी दिल्ली : इंडिगो कंपनीच्या फाईट रद्द झाल्याने संपूर्ण देशामध्ये गोंधळ उडाला आहे. कंपनीच्या सर्व फाईटचे उड्डाण रद्द होत असल्यामुळे देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर गोंधळ उडालाा आहे. 12 तासांहून अधिक तास प्रवासी न खाता पिता विमानतळावर ताटकळत उभे आहेत. इंडिगो कंपनीला (Indigo) पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाइनला संपूर्ण देशात 550 हून अधिक फाईट रद्द केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
05 Dec 2025 03:30 PM (IST)
देशभरातील सुमारे ९०० इंडिगो फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा प्रभाव पडताना दिसून आला. अनेकांची कामे यामुळे रखडली तर एका जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनमध्ये जाता आलं नाही. होय, बुधवारी ३ डिसेंबर रोजी इंडिगोने अचानक आपल्या फ्लाईट्स कॅन्सल केल्यामुळे कर्नाटकातील हुबळी येथे एका लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत मोठा गोंधळ दिसून आला. फ्लाईट्स कॅन्सल झाल्यानंतर जोडपे भुवनेश्वरलाच अडकले. पाहुणेमंडळी उपस्थित झाल्यानंतर हा सोहळा अचानक कॅन्सल करणं त्यांना पटलं नाही ज्यानंतर जोडप्याने ऑनलाइन व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीला हजेरी दाखवली. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
05 Dec 2025 03:20 PM (IST)
सलमान खानचा रिॲलिटी शो “बिग बॉस १९” अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी, एक स्पर्धक “बिग बॉस १९” ट्रॉफी उचलताना दिसेल. मालती चहरच्या अलिकडेच बाहेर पडल्यानंतर, टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत.बिग बॉस हा भारतातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोपैकी एक आहे आणि टॉप पाच फायनलिस्टमध्ये अमाल मलिक, फरहाना भट, प्रणीत मोरे, तान्या मित्तल आणि टिकट टू फिनालेचा विजेता गौरव खन्ना आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे.
05 Dec 2025 03:10 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर (अंकुश थोरात । नवराष्ट्र): सणासुदीचा काळ म्हणजे रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेली असतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अलीकडच्या महिन्यांत रेल्वे प्रवाशांना अक्षरशः वेठीस धरले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाच्या हद्दीतील दहा रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या काळात तब्बल २,४०० हून अधिक चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. चोरीच्या या वाढत्या आकड्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
05 Dec 2025 03:01 PM (IST)
IND vs SA ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दूसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. त्यामुळे आता मालिकेत १-१ अशी बरोबरी झाले आहे. दरम्यान भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या चार विकेटने रोमांचक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा एडेन मार्कराम म्हणाला की, संघ जिंकला की धावा करणे महत्त्वाचे असते आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवासाठी तो स्वतःला जबाबदार धरतो. मार्करामने ११० धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ३५९ धावांचे लक्ष्य गाठता आले. भारताने रांचीमध्ये खेळलेला पहिला एकदिवसीय सामना १७ धावांनी जिंकला होता.
05 Dec 2025 02:55 PM (IST)
डिसेंबर महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास मानला जातो. कारण या महिन्यात एक-दोन नव्हे तर तीन एकादशी तिथी येत आहे. हिंदू धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि ही तिथी सर्व दुःखे दूर करते असे म्हटले जाते. एकादशी ही प्रत्येक पंधरवड्यातली अकरावी तिथी असते, ज्यामध्ये भगवान विष्णूची पूजा उपवास करून विधीपूर्वक केली जाते. ही तिथी देवतांच्या उर्जेचे केंद्र मानली जातात आणि मानवाच्या शरीरावर, मनावर आणि चेतनेवर तिचा सर्वोत्तम परिणाम होतो. पुराणांमध्ये या एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि वैकुंठ धाम देखील प्राप्त करतात असे म्हटले जाते. डिसेंबर महिन्यात येणाऱ्या तीन एकादशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या
05 Dec 2025 02:46 PM (IST)
इंडिगो कंपनीच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने देसभरातील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत होणाऱ्या विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला आहे. गुरुवारीच ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
05 Dec 2025 02:40 PM (IST)
प्राइम व्हिडिओने आज आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित सिरीज फोर मोअर शॉट्स प्लीजच्या शेवटच्या सीझनची घोषणा केली आहे. ही लोकप्रिय सिरीज येत्या १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही मालिका वर्षाच्या अखेरीस धमाकेदारपणे परतत आहे आणि सुट्टीच्या हंगामाच्या अगदी वेळेवर येणारा हा शेवटचा सीझन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. फ्रँचायझीचा हा शेवटचा भाग आहे, ज्यामध्ये विनोद, हृदयस्पर्शी ड्रामा, न थांबणारे शॉट्स आणि जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकलेल्या महिल्यांचा प्रवास यामध्ये दिसणार आहे.
05 Dec 2025 02:30 PM (IST)
टेक जायंट कंपनी अॅपलने अॅप स्टोअर अवॉर्ड्स 2025 च्या 17 विजेत्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे बेस्ट अॅपचे अवॉर्ड कोणाला मिळाले आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अॅपलने गेल्या महिन्यात अॅप स्टोअर अवॉर्ड्स 2025 च्या सर्व फाइनलिस्ट्सच्या नावांची घोषणा केली होती. अॅपलने सांगितलं आहे की, यावर्षी कंपनीने या अॅप्स आणि गेम्सना पुरस्कार देताना, त्यांनी तांत्रिक कल्पकता आणि सांस्कृतिक प्रभावाच्या निकषांवर या अॅप्सचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दिग्गज टेक कंपनीने सांगितलं आहे की, प्रत्येक विजेत्याला अॅप स्टोअर एडिटर्सने अधिक चांगले इनोवेशन, यूजर एक्सपीरियंस आणि डिझाईनसाठी निवड केली आहे.
05 Dec 2025 02:25 PM (IST)
भारत सरकार त्यांच्या मालकीच्या आयडीबीआय बँकेचे लवकरच खाजगीकरण करून ६४,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी सरकार लवकरच बोली प्रक्रिया सुरू करणार असून उदय कोटक बँक आघाडीवर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार बँक विकण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र, ही प्रक्रिया लक्षणीय प्रगतीपथावर आहे. मुंबईमध्ये स्थित असलेल्या बँकेतील बहुसंख्य हिस्सा विकून सरकार अंदाजे ६४,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
05 Dec 2025 02:15 PM (IST)
India vs South Africa Pitch Report : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिका शेवटच्या सामन्यावर पोहोचली आहे. या मालिकेचा पहिला सामना हा 6 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवण्यात यश मिळवले. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे.
05 Dec 2025 02:08 PM (IST)
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट "धुरंधर" आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. परंतु चित्रपटाचा शेवट एक मोठे आश्चर्यचकित करणारा आहे. निर्मात्यांनी शेवटी "धुरंधर" चा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची घोषणाही केली आहे. "धुरंधर" चा सिक्वेल "रिव्हेंज" पुढील वर्षी १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातच दुसऱ्या भागाची घोषणा केल्यामुळे चाहते आणखी उत्साहित झाले आहेत.
05 Dec 2025 02:00 PM (IST)
काही परदेशी खेळाडू जाणूनबुजून मेगा लिलावात भाग घेणे टाळतात. त्याऐवजी, ते मिनी लिलावात त्यांची नावे सादर करतात. खरं तर, फ्रँचायझी मेगा लिलावात त्यांचे संघ तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे परदेशी खेळाडूंवर कमी पैसे खर्च होतात. दरम्यान, फ्रँचायझी त्यांच्या संघातील पोकळी भरून काढण्यासाठी मिनी लिलावात भाग घेतात. परिणामी, फ्रँचायझी स्टार परदेशी खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतात. सर्व फ्रँचायझींनी याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
05 Dec 2025 01:50 PM (IST)
नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा गंभीर मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. कोल्हापूर–पुणे मार्गावरील नऱ्हे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले. “आपण दिल्लीतून पथक पाठवले, काही अपघातांचे प्रमाण कमी झाले; तरीही दुर्घटना सुरूच आहेत. कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकले, मात्र काम पूर्ण कधी होणार? नऱ्हे भागात शून्य अपघात कसे साध्य होणार?” असा थेट सवाल त्यांनी गडकरींना केला.
05 Dec 2025 01:40 PM (IST)
रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या मागील एक वर्षातील विकासकामांचा आढावा घेतला. रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य देऊन पुढील पाच वर्षे कृषी क्षेत्रात काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत वितरित करण्यात आली असून सौर ऊर्जा निर्मितीद्वारे वीजपुरवठा सुधारण्याचे काम राज्याने केले आहे. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणे, “नमो सन्मान” योजनेतून लाभ देणे, जलयुक्त शिवार २ आणि नदी जोड प्रकल्प हे महत्त्वाचे निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
05 Dec 2025 01:30 PM (IST)
कर्जत तालुक्यातील महत्वाचा रस्ता असलेल्या कर्जत – कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ पासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर वन जमिनीचा प्रश्न न सोडवता रस्त्याचे काम पूर्ण करू पाहत आहे.कल्याण- कर्जत हा राज्यमार्ग 21 किलोमीटरचा कर्जत तालुक्यातून जात आहे. त्या राज्यमार्गाचे दुपदरीकरण काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यावेळी ठेकेदाराने अनेक ठिकाणी वन जमीन आहे म्हणून रस्ता एकपदरी ठेवला. नियमानुसार रस्त्याचे काम घेणारा ठेकेदार हा वन आणून जमिनीची परवानगी आणून त्या भागात रस्त्याचे काम पूर्ण करीत असतो. मात्र त्यावेळी शिल्लक राहिलेले काम आजही नव्याने रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर तसेच ठेवण्यात आले आहे. रस्त्याचे दुपदरीकरण होऊन दहा वर्षाचा कालावधी लोटला तरी सर्वांजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर वन जमिनीचा प्रश्न सोडविता आला नाही.
05 Dec 2025 01:20 PM (IST)
पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद काम आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असे अभिनेता अनेक वेळा म्हणाला आहे. आणि आता अभिनेत्याने स्वतःच हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटेवर पूर्ण केल्याचे दिसत आहे. अभिनेत्याने आगामी ‘कैरी’ या मराठी चित्रपटात पोलिसांची भूमिका साकारलेली दिसत आहे. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत हा अभिनेता दिसणार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमधील अभिनेत्याची ही करारी भूमिका पाहून चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
05 Dec 2025 01:02 PM (IST)
आपले नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरे होईल, अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला भर स्मशानभूमीत चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळी (Chiplun)येथे घडली. यामध्ये फिर्यादी प्रशांत चव्हाण (३३, सध्या रा. आकले, चिपळुण, मुळ रा. कळकवणे, दादर, चिपळुण) हा जखमी झाला आहे. या मारहाण प्रकरणी किरण जाधव (सध्या रा. पिंपळी मळरा. पाटण, सातारा, मगट जाधव, अविनाश जाधव, सौरभजाधव (सर्व रा. तळदेव, महाबळेश्वर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.
05 Dec 2025 12:50 PM (IST)
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे, या मालिकेचा पहिला सामना सुरु आहे, या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला पण आता वेस्ट इंडिजच्या संघाता शाई होप याने न्यूझीलंडसमोर आव्हान उभे केले आहे. वेस्ट इंडिजचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज शाई होपने शुक्रवारी मोठा प्रभाव पाडला. ३२ वर्षीय फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
05 Dec 2025 12:40 PM (IST)
देशामध्ये सध्या इंडिगो कंपनीच्या (Indigo flight) पूर्णपणे ढासाळलेल्या कारभाराची जोरदार चर्चा आहे. इंडिगो कंपनीने प्रवाशांचे अक्षरशः हाल केले आहेत. सातत्याने सर्वच प्रमुख विमानतळांवरुन फ्लाईट रद्द होत असल्यामुळे 12-12 तास प्रवासी विमानतळावर ताटकळत उभे आहेत. अन्नपाण्याशिवाय कराव्या लागणाऱ्या या प्रतिक्षेमुळे प्रवाशांनी इंडिगो कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत इंडिगो कंपनी विरोधात आवाज उठवला जात आहे. मात्र यामुळे कंपनीला देखील मोठे नुकसान झाले आहे. इंडिगो कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
05 Dec 2025 12:30 PM (IST)
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत होणाऱ्या विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला आहे. गुरुवारीच ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे दिल्ली, हैदराबाद, गोवा आणि मुंबई सारख्या प्रमुख विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. खाजगी टीव्ही चॅनेल्सच्या वृत्तानुसार, दिल्ली विमानतळावर हजारो बॅगा विखुरलेल्या होत्या. अनेक प्रवासी जमिनीवर झोपलेले दिसले आणि घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, आज सकाळपासून दिल्ली विमानतळावर २०० हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यात १३५ निर्गमन आणि ९० आगमनांचा समावेश आहे.
05 Dec 2025 12:20 PM (IST)
सध्या वीण दोघातली तुटेना मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आहे. अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जी जाणून तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अभिनेत्रीला अलिकडेच ‘महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी झाली असून अभिनेत्रीने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.
05 Dec 2025 12:10 PM (IST)
रशिया आणि युक्रेनमधील(Russia Ukraine War) तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाबाबत आता एक नवा आणि निर्णायक वळणबिंदू गाठला जात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या ताज्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून, त्यांनी हा युद्धसंघर्ष लवकरच संपणार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की रशिया–युक्रेन युद्ध आता समाप्तीच्या टप्प्यात येत असून, ते स्वतः या युद्धबंदी प्रक्रियेला पूर्णतः गती देतील आणि ती प्रत्यक्षात आणतील. त्यांच्या या विधानामुळे युद्धग्रस्त नागरिकांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहेत, तर काही तज्ज्ञ मात्र या दाव्याकडे संशयाने पाहत आहेत.
05 Dec 2025 12:10 PM (IST)
फ्लिपकार्टवर सुरु असलेला ब्लॅक फ्रायडे अखेर संपला आहे. सेल संपला असला तरी देखील भारतातील फेस्टिव्ह शॉपिंगचा उत्साह अजूनही कायम आहे. याच कारणामुळे आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा एक नवीन सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेल आजपासून म्हणजेच 5 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. तर 4 डिसेंबर रोजी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना या सेलचा एक्सेस देण्यात आला होता. हा सेल 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. 6 दिवस सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, ऑडियो प्रोडक्ट्स आणि अनेक टेक गॅझेट्सवर धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. जर तुम्ही यावर्षी सेलमध्ये नवीन गॅझेट खरेदी केले नसेल तर तुम्ही फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेलची ही संधी गमावू नका.
05 Dec 2025 12:00 PM (IST)
अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "कोरेगाव पार्क येथील जमिनीच्या व्यवहारात ज्या ज्या सवलती व सूट विविध खात्यांतर्फे पार्थ पवार, शीतल तेजवानी व दिग्विजय पाटील यांना दिल्या आहेत , त्या सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास मिळाल्याच पाहिजेत. या पुढे महाराष्ट्रातील कोणत्याही कंपनीने गुन्हा केला तर संचालकांना अटक करता कामा नये," अशी भूमिका अंजली दमानिया यांनी लिहिले आहे.
05 Dec 2025 11:50 AM (IST)
सध्या सोशल मीडियावर बिहारमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये वऱ्हाडींनी रस्सगुल्ला न मिळाल्यामुळे तुफान हाणामारी केली. यामध्ये अगदी ताटं, खुर्च्या फेकून मारण्यात आल्या आहेत. त्यातचबरोबर हे लग्न देखील मोडले. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
A chaotic scene unfolded in a wedding in #Bihar's #BodhGaya after the bride and the groom's families exchanged blows over a shortage of rasgulla.
The incident was caught on CCTV installed inside the hotel where the wedding was taking place, and the video surfaced online.… pic.twitter.com/As6vU9WXSZ
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 4, 2025
05 Dec 2025 11:40 AM (IST)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत असल्याच्या भावना मोदींनी व्यक्त केल्या.
Presented a copy of the Gita in Russian to President Putin. The teachings of the Gita give inspiration to millions across the world.@KremlinRussia_E pic.twitter.com/D2zczJXkU2
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
05 Dec 2025 11:30 AM (IST)
महाराष्ट्र 'राजभवन'चे नाव आता 'लोकभवन' झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. ‘लोकभवन’ हे केवळ राज्यपाल यांचे निवासस्थान व कार्यालय नसून राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटना यांच्यासह संवाद आणि सहभाग साधणारे एक केंद्र आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
महाराष्ट्र 'राजभवन' झाले आता 'लोकभवन'
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. ‘लोकभवन’ हे केवळ राज्यपाल यांचे निवासस्थान व कार्यालय नसून राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक,… https://t.co/pAoTCqTDWM
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2025
05 Dec 2025 11:19 AM (IST)
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळील दरीत खाजगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी अंदाजे ४. ३० वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहिती नुसार १ डिसेंबर २०२५ रोजी नेपाळ येथून ११० महिला,पुरुष प्रवाशांना घेऊन निघालेली खाजगी बस एम पी १३ पी १३७१ आज पहाटे आंबा घटातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस सुमारे पन्नास फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३७ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील आठ जण गंभीर जखमी आहेत.अपघाताची वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा व देवरुख पोलीस निरीक्षक व साखरपा पोलीस कर्मचारी यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन जखमीना बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी दाखल केले
05 Dec 2025 11:09 AM (IST)
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असेलल्या इंडिगोची अनेक प्रवासी प्राधान्य देतात. मात्र इंडिगो कंपनीला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाइनला संपूर्ण देशात 200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या निर्णयामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीच्या नावाची बदनामी देखील झाली आहे. यामुळे इंडिगो कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसान सहन करावे लागले.
05 Dec 2025 10:59 AM (IST)
रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. परिणामी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड म्हणून भारतावरील भारत २५% कर दुप्पट केला. आता, भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर ५०% कर आकारला जातो. तथापि, भारत आणि रशियामधील व्यापार केवळ कच्च्या तेलापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती औषधनिर्माण, बांधकाम साहित्य, प्रक्रिया केलेले अन्न, अंतर्गत वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे.
05 Dec 2025 10:52 AM (IST)
चित्रपट निर्माता करण जोहर “द ट्रेटर्स” या रिॲलिटी शोमध्ये होस्टिंग करताना दिसला, ज्यामुळे तो चर्चेत आला. त्याने हा शो उत्तम प्रकारे होस्ट केला. गुरुवारी एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२५ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट होस्टचा पुरस्कार चित्रपटात निर्मात्याने मिळवला आहे. तसेच “द ट्रेटर्स” या शो मधील त्याची होस्टिंग देखील चाहत्यांना खूप पसंत पडली. आणि आता तो सर्वोत्कृष्ट होस्ट पुरस्कारामुळे आणखी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
05 Dec 2025 10:49 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराज गायकवाडची सुरुवात खराब झाली. चौथ्या क्रमांकावर खेळल्यानंतर त्याने ८ चेंडूत १४ धावा केल्या. तथापि, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक विशेषज्ञ सलामीवीर असलेल्या गायकवाडला दुसऱ्या सामन्यात त्याच्या नवीन भूमिकेशी जुळवून घेण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्याने रायपूरमध्ये ८३ चेंडूत १०५ धावा केल्या, ज्यामध्ये १२ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. २८ वर्षीय फलंदाजाचे हे पहिले एकदिवसीय शतक होते. त्याने विराट कोहली (१०२) सोबत १९५ धावांची मजबूत भागीदारी केली.
05 Dec 2025 10:41 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये विंटर सीजन आणि क्रिसमस च्या निमित्ताने एका नव्या इव्हेंटची एन्ट्री झाली आहे. फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी फ्रॉस्टी सीझन लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेयर्सना आकर्षक वेपन लूट क्रेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे वेपन लूट क्रेट मोफत अनलॉक करून प्लेयर्स प्रीमियम गन स्किन प्राप्त करू शकतात. यासोबतच प्लेयर्सना एक्सक्लूसिव स्वीट ड्रीम्स पॅन स्किन देखील मिळणार आहे. हे सर्व क्लेम करण्यासाठी डायमंडची गरज नाही.
05 Dec 2025 10:32 AM (IST)
भारत आणि रशियामधील (India and Russia) ऐतिहासिक संबंध अधिक बळकट होत असताना, त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत भेटीपूर्वी क्रेमलिन येथे एका मुलाखतीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. भारत आणि रशियामधील वाढते सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाच्या, अगदी अमेरिकेच्याही विरोधात नाही, असे ते म्हणाले. ही भागीदारी केवळ दोन्ही देशांच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी आहे, हा संदेश त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.






