सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग म्हणजे, पुण्यातून जाणारा नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा साधारण ७ किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावरून पुण्यातील वाहतूकीसोबतच अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर पुर्वी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटर होती. वारंवार होणाऱ्या अपघातानंतर हा वेग कमी करून ४० किलोमीटर एवढा करण्यात आला. पण, त्याचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे. त्यासोबतच, पोलीस, पालिका, महामार्ग अशा तीन विभागांचा ताळमेळ देखील बसत नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याचेही मत आहे.
पोलिसांच्या पाहणीनुसार, तीव्र उतार कमी करण्यासोबतच दोन्ही बाजूला अपुर्ण असलेला सर्व्हिस रोड पुर्ण होणे गरजेचे आहे मात्र, तो जलद गतीने होताना दिसत नाही. ज्यामुळे स्थानिक वाहने मुख्य रस्त्यावर येतात. वाहने जागोजागी असलेल्या मार्गाने महामार्गावर येतात आणि त्यामुळे कोंडीसोबतच अपघाताला निमत्रंण मिळते. गेल्या महिन्यात नवले पुल परिसरात साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर एका चारचाकीला आग लागली आणि त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर, कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिली. यापुर्वीही अनेकवेळा गंभीर अपघात या भागात झालेले आहेत. पण, एका अपघातानंतर पुर्ण प्रशासन जागे होते, आणि पुन्हा उपाययोजना सूचवल्या जातात. पण, त्या पुर्ण मात्र होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना अत्यंत लवकर करणे गरजेचे असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
नेमक होत काय?
नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा ७ किलोमीटर रस्ता तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात होतात. अनेकवेळा चालक गाडी बंद करून डिझेल वाचविण्यासाठी तीव्र वेगाने येतात. मग, मोठ्या वाहनांचा एअर ब्रेक लागत नाही आणि अपघात होतात, असे निरीक्षण पोलिसांचे आहे. दोन वर्षापूर्वी असाच भीषण अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिस, महामार्ग यांची एक चौकी कात्रज बोगद्याच्या आगोदर उभा करून त्याच ठिकाणी वेग तपासला जाणार होता. पण, काही दिवसानंतर पुन्हा जैसे थेच स्थिती निर्माण झाली.
काय आहेत उपाययोजना?






