Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live updates: भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्येही पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेयानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून आता त्यांचे लक्ष या संभाव्य पावसाकडे लागले आहे.
30 Jun 2025 08:04 PM (IST)
IND Vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्स ने जिंकला आहे. आता २ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरवात होणार ही. त्याआधी इंग्लंडने आपला प्लेइंग-११ जाहीर केला आहे. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरचा संघामध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला अद्याप प्लेइंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी वात पहावी लागणार आहे.
30 Jun 2025 07:45 PM (IST)
पुणे: मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
30 Jun 2025 07:29 PM (IST)
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे भारताचे दुसरे अंतराळवीर बनले आहेत आणि सध्या ते आंतरराष्ट्रीय अंतराळत आहेत. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील. शुभांशू भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीसह चार देशांच्या संयुक्त मोहिमेवर गेले आहेत, ज्याचे नाव अॅक्सिओम मिशन ४ आहे. हे अभियान २५ जून २०२५ रोजी दुपारी १२:०१ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित करण्यात आले. अंतराळात जाणं ही बाब भारतासाठी अभिनास्पद असली तरी अंतराळवीर काय जेवण करत असतील? कोणत्या परिस्थित राहत असतील? अंतराळत चालत असतील की तरंगत असतील? असे अनेक प्रश्नांची उत्तर आकर्षक वाटतं, पण तुम्हाला माहितीय का? अंतराळात लैंगिक संबंध ठेवत नाही, तरीही अंतराळवीर जाताना कंडोम का घालतात? चला तर मग जाणून घेऊया कारण…
30 Jun 2025 07:14 PM (IST)
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
30 Jun 2025 06:57 PM (IST)
आषाढी वारी म्हणजे काय तर विठ्ठल, वारकरी, टाळ-मृदुंग, भजन- किर्तन आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष. या वारीचे विविध पैलू आहेत. पायी चालत वारी करणाऱ्या या भक्तांचा हा पंढरीला वास्वव्यास असलेल्या या राजाच्या सगळ्याच गोष्टी खास आहेत त्यातलीच खास गोष्ट म्हणजे त्याचा पोशाख. हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. फेटा , धोतर , खांद्यावर उपरण आणि गळ्यात तुळशीची माळ असा वारकऱ्याचा आणि त्याचा राजाचाही वेश काहीसा सारखा आहे. याच विठ्ठलाच्या पोशाखाची महती जाणून घेऊयात.
30 Jun 2025 06:42 PM (IST)
Health Tips: हल्ली आपले जीवन अधिक धावपळीचे झाले आहे. ऑफिसचे कामामुळे जेवणाच्या वेळा पाळल्या न जाणे, कामाच्या व्यापामुळे व्यायाम करण्यासाठी किंवा अन्य आरोग्याला फायदेशीर गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार देखील महत्वाचा आहे. चांगला आहार देखील शरीरसाठी फायदेशीर ठरतो. दरम्यान दीर्घकाळ जगण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एक शक्तिशाली ज्यूस सांगितला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
30 Jun 2025 06:34 PM (IST)
भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक कंपनी. टाटाने देशात अनेक कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच केले आहे. नुकतेच कंपनीने Tata Harrier EV चा Stealth Edition लाँच केला आहे.ही एडिशन रियर व्हील ड्राइव्ह आणि क्वाड व्हील ड्राइव्ह या दोन पर्यायांमध्ये दिली जात आहे. या एडिशनचे एकूण चार व्हेरिएंट कंपनीने ऑफर केले आहेत. यापैकी दोन रियर व्हील ड्राइव्ह आणि दोन क्वाड व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजीसह येतील. यामध्ये Empowered 75 Stealth, Empowered 75 Stealth ACFC, Empowered QWD 75 Stealth और Empowered QWD 75 Stealth ACFC व्हेरिएंटचा समावेश आहे.टाटा हॅरियर ईव्ही स्टील्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 28.24 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 30.23 लाख रुपयांपर्यंत जाते.
30 Jun 2025 05:58 PM (IST)
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरडफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र राज्य हादरले आहे.
30 Jun 2025 05:36 PM (IST)
मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात झाले आहे. मात्र दिल्लीकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा होती. अखेर राजधानी दिल्लीत देखील पावसाचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून संपूर्ण भारतात दाखल झाला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रूद्रप्रयाग, उत्तरकशी, डेहराडून, हरिद्वार, नैनीताल या जिल्ह्यांत आज दिवसभरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
30 Jun 2025 05:32 PM (IST)
टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. इनोव्हा ही त्यातीलच एक लोकप्रिय कार आहे. नुकतेच Toyota Innova Hycross ची क्रश टेस्ट घेण्यात आली. बी एनसीएपीने केलेल्या क्रॅश टेस्टनंतर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला सेफ्टीसाठी पूर्ण पाच स्टार देण्यात आले आहेत. प्रौढ तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी या कारला पूर्ण गुण मिळाले आहेत. म्हणजेच ही कार सुरक्षिततेच्या परीक्षेत पूर्णपणे पास झाली आहे.
30 Jun 2025 05:17 PM (IST)
पाकिस्तानचा पारंपरिक मुस्लिम मित्र मानला जाणारा संयुक्त अरब अमिराती (यूएई) सध्या भारतासोबतच्या संबंधांना अधिक प्राधान्य देत असून, दोन्ही देशांतील राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याला नवे उधाण आले आहे. याच अनुषंगाने, यूएईने भारतीय नागरिकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ कार्यक्रमाचा विस्तार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १३ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालेल्या या धोरणामुळे, भारत आणि यूएईमधील प्रवास अधिक सुलभ आणि विस्तृत झाला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यातील सीमापार संधी आणि सहभागात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
30 Jun 2025 05:02 PM (IST)
राज्य सरकारने राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यभरातून वाढता विरोध आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलाय का? त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला काही फरक पडत नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
30 Jun 2025 05:00 PM (IST)
पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून पक्षी आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे विमानाच्या संचलनात बाधा निर्माण होत आहे. यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी गेल्याची घटना देखील काही दिवसापूर्वीच घडली होती.
30 Jun 2025 04:55 PM (IST)
राज्य सरकारने नुकताच मराठी आणि इंग्रजीसह हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा आदेश जारी केला होता. पण मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदीला तिसरी भाषा सक्तीकरणाला उघडपणे विरोध केला. इतकेच नव्हे तर स्थानिक पातळीवरूनही राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध सुरू झाला. जनतेचा तीव्र विरोध पाहून राज्य सरकारने आदेश मागे घेतला आहे. पण त्रिभाषा धोरणाला विरोध करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य नाही. यापूर्वी तामिळनाडू राज्यानेही त्रिभाषा धोरणाला विरोध केला आहे. पण त्रिभाषा धोरणाला राज्यनिहाय राजकारणाचे बळी का पडत आहे. असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
30 Jun 2025 04:47 PM (IST)
संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे शाळेतील 162 विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यान सर्वांचे रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आल्याचे समजते आहे.
30 Jun 2025 04:38 PM (IST)
चीन लवकरच चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. चीनने यासाठी एक नवीन योजना आखली आहे. २०३० पर्यंत ही योजना पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यासाठी चीनने एक मोठी यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे चीनसाठी चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने १७ जून रोजी चंद्र मोहिमे अंतर्गत “मेंगझोऊ” च्या ड्रॅगन कॅप्सूलची यशस्वी चाची केली आहे. यामध्ये मेंगझोऊचे कॅप्सूल एस्केप वॉटरपासून वेगळे करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याने चीनसाठी ही एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
30 Jun 2025 04:31 PM (IST)
अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. अनुपम यांच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट कान्ससह अनेक वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
30 Jun 2025 04:26 PM (IST)
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु झाली असून सायंकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. रवींद्र चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या संघटनात्मक बदलांसाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
30 Jun 2025 04:20 PM (IST)
राज्यामध्ये एकीकडे मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढलेला असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी थेट राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे कोल्हापूरचे नेते व उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीवरुन संजय पवार हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर आता त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारण रंगलं आहे.
30 Jun 2025 04:12 PM (IST)
हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, आणि या समितीच्या अहवालानुसार त्रिभाषा सूत्र ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार अनिल बोंडे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
30 Jun 2025 04:02 PM (IST)
नागपूर: हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, आणि या समितीच्या अहवालानुसार त्रिभाषा सूत्र ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार अनिल बोंडे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
खासदार अनिल बोंडे यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. खासदार अनिल बोंडे म्हणाले, " त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर कराव्या असा माशेलकर समितीचा अहवाल होता. माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्धव ठाकरे जो काही खटाटोप करत होते ते आपले पाप लपवण्यासाठी करत होते."
30 Jun 2025 04:01 PM (IST)
हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, आणि या समितीच्या अहवालानुसार त्रिभाषा सूत्र ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार अनिल बोंडे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
30 Jun 2025 03:44 PM (IST)
"भाजपमध्ये लोकशाही प्रक्रिया आहे... १२०० मंडळांच्या निवडणुकीनंतर, आम्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण केल्या आणि आता महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे... महाराष्ट्रातील निवडणुकीचे प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू देखील येथे उपस्थित आहेत... रवींद्र चव्हाण यांचे नामांकन दाखल झाले आहे... उद्या, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, महाराष्ट्र भाजप अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल. जर ते महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार असतील तर त्यांचे नाव जाहीर केले जाईल; जर अधिक अर्ज आले तर निवडणुका होतील... रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्ष वैभवाच्या नवीन उंची गाठेल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
30 Jun 2025 03:24 PM (IST)
"उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे लोक खोट्यावर खोटे बोलत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्णय जनतेवर सोडले आहेत आणि ते कोणती भाषा शिकायचे हे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी ठरवावं. उद्धव ठाकरे लोकांना दिशाभूल करण्याचे काम करत आहेत", असा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
30 Jun 2025 03:20 PM (IST)
कॅनडाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी उशिरा कॅनडाने अमेरिकनच्या तंत्रज्ञान कंपन्यांवरील डिजिटल कर लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडा आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर वाटाघाटीसाठी चर्चा करण्याचे म्हटले होते. यामुळे कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ३० जूनपासून अमेरिकेवर डिजिटल कर लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
30 Jun 2025 02:25 PM (IST)
पुरूषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा एक सामान्य कर्करोग आहे जो प्रोस्टेट ग्रंथीपासून सुरू होतो. प्रोस्टेट ही मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशयाच्या समोर स्थित एक लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी वीर्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा या ग्रंथीच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि अनियंत्रित होतात आणि ट्यूमर तयार करतात तेव्हा प्रोस्टेट कर्करोग होतो. हा कर्करोग हळूहळू वाढू शकतो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो वेगाने पसरतो. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे अनेकदा स्पष्ट नसतात, परंतु काही लक्षणांकडे लक्ष देऊन ते लवकर शोधता येते. प्रोस्टेट कॅन्सरची नक्की कोणती 5 लक्षणे आहेत जी तुम्हाला पहिल्या स्टेजबाबत संकेत देतात याबाबत जाणून घ्या
30 Jun 2025 02:24 PM (IST)
Dalai Lama reincarnation controversy : तिबेटी धर्मगुरू १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांच्या ६ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाळा येथे एक अत्यंत महत्त्वाची व गुप्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या ७२ तासांच्या बैठकीत जगभरातील १०० हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे चीनमध्ये मोठी अस्वस्थता आणि राजनैतिक हालचाल निर्माण झाली आहे.
30 Jun 2025 02:23 PM (IST)
Raj Thackeray’s Victory Rally Announcement: राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून उद्भवलेल्या वादानंतर रविवारी संबंधित दोन्ही शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला होणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिक घेतली होती. तसेच आंदोलनाची घोषणाही केली होती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेही आंदोलन होणार होते. पण राज्य सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का,याचया चर्चाही राज्यात सुरू झाल्या होत्या.
30 Jun 2025 02:23 PM (IST)
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. आजपासून विधानसभेमध्ये राजकीय खडाजंगी होताना दिसणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषेचे दोन्ही शासन आदेश महायुती सरकारने रद्द केले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे यंदाचे अधिवेशन हे गाजणार आहे. दरम्यान, यंदाचे पावसाळी अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या शिवाय जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
30 Jun 2025 02:22 PM (IST)
ICAI CA Final Result May 2025: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या ICAI CA मे अंतिम निकाल २०२५ जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार ICAIच्या अधिकृत वेबसाईट icai.org आणि icai.nic.in यावर आपले गुण तपासू शकतील. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर टाकावा लागेल.
30 Jun 2025 01:55 PM (IST)
अभिनेता अभिषेक बच्चन हा बॉलिवूडचे शहनशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक चित्रपटामुळे चर्चेत नसला तरीही देखील त्याची कायमच इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये स्वत:चं स्थान पक्कं केलं आहे. आज अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये डेब्यू करुन २५ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त अभिषेक बच्चनसाठी अमिताभ यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे.
30 Jun 2025 01:45 PM (IST)
WTC सायकलला सुरुवात झाली आहे, जगभरामध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. भारताच्या संघाचा इंग्लडविरुद्ध सामना सुरु आहे, तर ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन संघामध्ये मालिका पार पडली. या मालिका सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली कामगिरी करत आहे. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू अझहर महमूद यांची नवीन कार्यकारी रेड-बॉल मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.
30 Jun 2025 01:35 PM (IST)
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून (30 जून) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात १२ विधेयके मांडली जाणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने रविवारी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचे दोन जीआर (सरकारी आदेश) मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नवा वाद उफाळून आला आहे. यावेळी अधिवेशनासाठी देण्यात आलेल्या अधिकृत ओळखपत्रावर राष्ट्रचिन्ह अशोकस्तंब गायब झाले आहे.
30 Jun 2025 01:25 PM (IST)
भारतामध्ये जर एखाद्या खेळाडूला क्रिकेट खेळाडू व्हायच्या असेल तर त्या खेळाडूला त्याची चप्पल झिजेपर्यंत मेहनत घ्यावी लागते. भारताचे असेच अनेक खेळाडू आहेत ते फक्त डोमेस्टिक क्रिकेट ठेवून निवृत्ती घेतात. टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये फार कमी खेळाडूंना संधी मिळते. भारतामध्ये प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये लहान मुलांना किंवा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडुला क्रिकेटर व्हायचे असते. मागील अनेक वर्षांपासून महिला क्रिकेट देखील प्रगती करत आहे.
30 Jun 2025 01:20 PM (IST)
मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे जोरदार चर्चेमध्ये आले होते. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून आता धनंजय मुंडे हे आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत.
30 Jun 2025 01:10 PM (IST)
SSC ची जूनमधील सातवी मोठी भरती अधिसूचना आज प्रसिद्ध होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या सर्वात प्रमुख भरतींपैकी एक असलेल्या JE (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर) परीक्षा २०२५ साठी ऑनलाइन अर्ज आज सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. SSC कॅलेंडरनुसार, अभियंता तरुण 21 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील आणि संगणक आधारित परीक्षा 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रस्तावित आहे. SSC दरवर्षी केंद्र सरकारच्या विविध कार्यालये आणि विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती करते.
30 Jun 2025 01:01 PM (IST)
महाराष्ट्रला नवे मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (३० जून) सायंकाळी चार वाजता ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. मुख्य सचिव हे राज्याती सर्वोच्च आयएएस पद असून मुख्य सचिव मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून काम करतात.
30 Jun 2025 12:41 PM (IST)
मुंबईच्या मेट्रो 2 च्या बांगुर नगर मेट्रो स्थानकात मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.अवघ्या दोन वर्षांचा एक चिमुकला प्रवासी मेट्रोच्या दरवाजातून आत जात असताना दरवाजे अचानक बंद झाले.यामुळे मुलगा दरवाज्यात अडकून राहिला. मेट्रो सुरू होणार इतक्यात मेट्रोस्थानकात कार्यरत असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. संकेत चोडणकर यांच्या तात्काळ प्रतिसादाने मोठा अपघात टळला. संकेत यांनी प्रसंगावधान राखत क्षणार्धात ट्रेन ऑपरेटरला सूचना दिली आणि दरवाजे पुन्हा उघडून चिमुकल्याला सुरक्षित हातात घेतले.
30 Jun 2025 12:12 PM (IST)
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षात जाहीर केलेल्या ८१ अनधिकृत शाळांपैकी ६१ शाळा या एकट्या दिवा परिसरातील असून या शाळा बंद करण्यासाठी कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी १ जुलैपासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळाचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. असे असले तरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
30 Jun 2025 12:01 PM (IST)
विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिवरायांना अभिवादन .विरोधकांच्या डोक्यावर 'मी मराठी' ची टोपी. विरोधकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घातली टोपी . 'मी मराठी' असे लिहिलेली टोपी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घातली.
30 Jun 2025 11:54 AM (IST)
खगोल शास्त्र जयंत नारळीकरण, श्रद्धा टापरे, रोहितदास देशमुख यांच्या दुखःद निधनावर पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात शोक प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या (मंगळवार) पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
30 Jun 2025 11:42 AM (IST)
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (३० जून) सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत चालणार असून यामध्ये विविध ज्वलंत मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर आजचं संपूर्ण कामकाज तहकूब करण्यात आलं.
30 Jun 2025 11:38 AM (IST)
काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी दोन वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई इथं कुणाल पाटलांचा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणालचा आणि हजारो समर्थकांचा प्रवेश होणार आहे.
30 Jun 2025 11:33 AM (IST)
हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसेनं जल्लोष केला. ढोलताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 5 जुलै रोजी विजयी मोर्चासाठी आणि सभेसाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते नाशिकहून मुंबईला जाणार आहेत.
30 Jun 2025 11:10 AM (IST)
ठाकरे बंधूंचा मोर्चा होता म्हणून सरकारने जीआर रद्द केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनं पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
30 Jun 2025 11:08 AM (IST)
हिंदी अंमलबजावणीचा जीआर रद्द केल्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोध पक्ष आनंदोत्सव साजर करत आहेत. हातात टाळ घेऊन हरिनामाचा गजर करत विरोधकांकडून आनंदोत्सव साजरा.
30 Jun 2025 11:04 AM (IST)
राज्य विधीमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असताना सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत कम ऑन किल मी म्हटले होते. त्याच्या खिल्ली उडवत शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा देत होते.
30 Jun 2025 11:03 AM (IST)
यंदा मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले असून, संपूर्ण देश विक्रमी वेळेत व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, साधारणतः ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापणारा मान्सून यंदा ९ दिवस आधीच, म्हणजेच २९ जून रोजी सर्वदूर पोहोचला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सून ५ जुलैपासून अधिक वेग घेण्याची शक्यता असून, तोपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
30 Jun 2025 10:57 AM (IST)
राज्य विधीमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असताना सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत कम ऑन किल मी म्हटले होते. त्याच्या खिल्ली उडवत शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा देत होते.
30 Jun 2025 10:39 AM (IST)
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज (३० जून)पासून सुरू झाले असून ते १८ जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्यातील अनेक ज्वलंत मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य सरकारने अलीकडेच हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्याचा निर्णय घेतला असला, तरी या मुद्यावरूनही विरोधक सरकारला जाब विचारू शकतात.






