Maharashtra Breaking News
29 Oct 2025 11:18 AM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना कॅनबेरा येथे होणार आहे. या मालिकेत पाच सामने होणार आहेत, या मालिकेचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि आता सर्वांनाच काळजी आहे की त्याच कारणामुळे T20 मालिका देखील रद्द होईल. हवामानाची एक मोठी अपडेट आली आहे आणि चाहते नक्कीच आनंदी होतील.
29 Oct 2025 10:59 AM (IST)
“बिग बॉस १९” या रिॲलिटी शोमध्ये दररोज नवीन ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिषेक बजाज आणि अशनूर कौरमुळे संपूर्ण घराला शिक्षा झाली. कॅप्टन मृदुल तिवारीच्या कॅप्टनशिपमध्येही दुरावा निर्माण झाला. आता, “बिग बॉस १९” च्या घराला त्याचा नवा कॅप्टन, प्रणित मोरे सापडला आहे. अखेर प्रणितला ‘बिग बॉस’च्या घराची सत्ता मिळाली आहे. आता या खेळाला आणखी रंगत येणार आहे. या बातमीने प्रणितच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
29 Oct 2025 10:55 AM (IST)
बिग बॉस १९ च्या घरातला खेळ खूपच रंजक बनला आहे. अर्धा शो पुर्ण झाला आहे आणि अनेक स्पर्धक हे घराबाहेर झाले आहेत. अशनूर आणि अभिषेकची चूक आणि मृदुलच्या निर्णयानंतर, घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कुनिका सदानंदने मृदुलला कमकुवत कर्णधार म्हणून संबोधले. शोच्या नवीन प्रोमोमध्ये, मृदुल घरातील सदस्यांच्या कृतींमुळे अस्वस्थ होऊन रडताना दिसला. दरम्यान, अभिषेक आणि प्रणीतने त्याच्या बाजूने भूमिका घेतली.
The captain can't take it anymore! 🥹
Dekhiye #BiggBoss19, Mon-Sun raat 9 baje @JioHotstar aur 10:30 baje @ColorsTV par.#Vaseline #AppyFizz @danubeproperty @vzyindia
{BB, Bigg Boss, BB19, Bigg Boss 19} @iamgauravkhanna @Humarabajaj6 @itanyamittal @ashnoorkaur03… pic.twitter.com/FA9nGJbeTY
— Bigg Boss (@BiggBoss) October 28, 2025
29 Oct 2025 10:46 AM (IST)
Apple ने मंगळवारी पहिल्यांदा 4 ट्रिलियन डॉलर मार्केट वॅल्यूचा टप्पा पार केला आहे. आता Apple हि तिसरी मोठी कंपनी बनली आहे, जिने हे यश गाठलं आहे. यामागील महत्त्वाचं कारण नवीन आयफोन मॉडेल्सची जबरदस्त डिमांड असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळे AI शर्यतीत कंपनीच्या मंद प्रगतीबद्दलची चिंता कमी झाली आहे.
29 Oct 2025 10:39 AM (IST)
दादर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने अचानक स्वतःवर धारदार चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानकावर सेवेवर असलेल्या होमगार्डने तत्परतेने धाव घेत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. मात्र, त्यानंतरही त्या प्रवाशाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
29 Oct 2025 10:32 AM (IST)
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
29 Oct 2025 10:27 AM (IST)
बुधवारी कॅनबेरामधील हवामान थंड राहण्याची शक्यता आहे, दिवसा हलक्या पावसाची शक्यता आहे. तथापि, संध्याकाळी हवामान स्वच्छ होईल आणि संपूर्ण सामना खेळवता येईल अशी अपेक्षा आहे. मनुका ओव्हल हे टी२० आणि बीबीएल क्रिकेटमध्ये कमी धावांचे मैदान राहिले आहे, जिथे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असते आणि चौकार मोठ्या असतात. त्यामुळे सूर्यकुमार यादव दोन किंवा तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतात. टी२० सामन्यांमध्ये येथील सरासरी धावसंख्या १४४ आहे, त्यामुळे चाहत्यांना फलंदाजांकडून कमी धावसंख्या दिसण्याची शक्यता आहे.
29 Oct 2025 10:20 AM (IST)
फटाके फोडत असलेल्या एका तरुणावर माथेफिरू गुंडाने चाकू हल्ला केला. गुंडाने पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धरारक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत समतानगर परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी शेख इकराम उर्फ मेजर शेख मुश्ताक (वय २२, रा. प्रवेशनगर) याला अटक केली. जखमी रिवायत अकबर शेख खान (वय २१, रा. अजीज कॉम्प्लेक्स, यशोधरानगर) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
29 Oct 2025 10:10 AM (IST)
बार्सिलोनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हार्डवेयर लाँच ईव्हेंटमध्ये Oppo Find X9 ही नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Oppo Find X9 Pro आणि Find X9 हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स 16 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये सादर करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत Oppo Find X9 सीरीज भारतात लाँच केली जाणार आहे.
29 Oct 2025 10:05 AM (IST)
सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. पण ‘बिग बॉस १९’ च्या अलिकडच्या भागात घडलेल्या घटनेने मोठा गोंधळ उडाला आहे. अलिकडच्या भागात तान्या मित्तल, नीलम गिरी आणि कुनिका सदानंद अशनूर कौरची बॉडीशेमिंग करताना दिसल्या आहेत. शिवाय, इतर स्पर्धक, अमाल मलिक आणि शाहबाज यांनीही अशनूरची खिल्ली उडवली. आता, अभिनेत्रीला पाठिंबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत आणि यावर आपले मत मांडले आहे.
29 Oct 2025 09:59 AM (IST)
भिवंडी: भिवंडीत एक संतापजनक आणि धक्कदायक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ठार मारल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत घडली आहे.
29 Oct 2025 09:55 AM (IST)
मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानला ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील दुसरा सामना शुक्रवारी लाहोरमध्ये खेळला जाईल.
29 Oct 2025 09:52 AM (IST)
तिरूवनंतपुरम : पती-पत्नीमधील वाद हा नवीन विषय नाही. मात्र, जर हा वाद टोकाला गेला की कोर्टापर्यंत जावं लागणे हे अनेकदा घडतं. त्यातच आता केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणावर निर्णय देताना पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे ही क्रूरता असल्याची टिप्पणी केली आहे. न्यायालयाने या निरीक्षणासह महिलेला घटस्फोट मंजूर केला.
29 Oct 2025 09:46 AM (IST)
Mohammad Rizwan refuses to sign central contract : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पाकिस्तानमध्ये टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना हा काल पार पडला. या पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट हा दररोज नवीन वादांमुळे चर्चेचा विषय आहे. आता एक नवीन ड्रामा सुरू झाले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने थेट पीसीबीवर टीका केली आहे आणि काही मोठ्या मागण्या केल्या आहेत.
29 Oct 2025 09:40 AM (IST)
भारतात शाओमी, वनप्लस, विवो, ओप्पो, अॅपल, रिअलमी, नथिंग, अशा अनेक ब्रँड्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. हे ब्रँड्स गेल्या अनेक वर्षांपासून युजर्सच्या मनावर राज्य करत आहेत. भारतातील स्मार्टफोन बाजारात या स्मार्टफोन्सचा मोठा हिस्सा आहे. हे स्मार्टफोन्स ब्रँड्स युजर्सच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्मार्टफोन लाँच करत असतात. मात्र आता या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी एक नवीन स्मार्टफोन ब्रँड सज्ज झाला आहे. भारतीय बाजारात लवकरच एका नवीन स्मार्टफोन ब्रँडची एंट्री होणार आहे. हा नवीन स्मार्टफोन ब्रँड भारतातील स्मार्टफोन युजर्सना कशा पद्धतीने इंप्रेस करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांतच नव्या स्मार्टफोन ब्रँडची भारतात एंट्री होणार आहे. या नव्या स्मार्टफोन ब्रँडचं नाव Wobble असं आहे.
29 Oct 2025 09:34 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : कार विक्रीच्या नावाखाली दोघांनी एका तरुणाची तब्बल 1 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे घेऊन देखील त्यांनी कार नावावर न करता कार घेऊन पसार झाले. ही घटना ७ जून २०२४ ते १७ मार्च २०२५ दरम्यान घडली. शहेबाज पठाण (वय ३५, रा. चिश्तिया चौक) आणि मयुर धानुरे (वय ४०, रा. मोंढा नाका) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
29 Oct 2025 09:28 AM (IST)
बाजारातील इतर तज्ञांनी देखील आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. हे शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज देखील आज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडियन बँक , जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (न्याका), फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जेटेक इंडिया लिमिटेड, वैभव ग्लोबल लिमिटेड आणि लॉरस लॅब्स लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.
29 Oct 2025 09:22 AM (IST)
भारतात 29 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,081 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,074 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,061 रुपये आहे. भारतात 29 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,20,810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,610 रुपये आहे. भारतात 29 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 150.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,50,900 रुपये आहे. दिल्ली शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,20,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,760 रुपये आहे.
29 Oct 2025 09:20 AM (IST)
मोबाईलवर येणारे अज्ञात कॉल अनेकांसाठी त्रासदायक ठरतात. अनेकदा कॉल करणारा कोण आहे, हे समजत नसल्याने लोक फोन उचलणे टाळतात किंवा नंबर ब्लॉक करतात. मात्र, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाने (DoT) देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना CNAP (Calling Name Presentation) सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सेवेअंतर्गत मोबाईलवर येणाऱ्या कॉलसोबत कॉल करणाऱ्याचे नावही स्क्रीनवर दिसेल. म्हणजेच, अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलदरम्यान संबंधित व्यक्तीचे नाव थेट मोबाईलवर झळकेल.
29 Oct 2025 09:17 AM (IST)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात उद्भवलेले चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडा येथून जाताना 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
29 Oct 2025 09:10 AM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन्ही संघ टी-20 मालिकेत आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने विजय मिळवला होता. आता आजपासून (29 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होतील. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ही मालिका विविध भारतीय भाषांमध्ये पाहू शकतील. तर ऑनलाइन प्रेक्षकांसाठी सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. या मालिकेत दोन्ही संघ नवी सुरुवात करण्याच्या तयारीत असून, चाहत्यांमध्ये या रोमांचक सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
29 Oct 2025 09:05 AM (IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीचे आवाहन केल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांमधील संभाव्य युद्ध रोखण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या हस्तक्षेप केला होता. जपानमधील अमेरिकन सैन्याला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “मी अनेक युद्धे थांबवली. भारत आणि पाकिस्तानमध्येही युद्ध होणार होते. मी दोन्ही देशांच्या नेत्यांशी — पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच्या ‘फील्ड मार्शल’शी — बोलून शत्रुत्व संपवले.त्या संघर्षादरम्यान सात अगदी नवीन आणि सुंदर विमाने पाडण्यात आली होती.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे दावे केले आहेत, मात्र भारताने त्यांच्या या दाव्यांना सातत्याने नाकारले आहे. भारताचा ठाम दावा आहे की, दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात कोणत्याही तृतीय पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारला गेला नव्हता.
29 Oct 2025 08:55 AM (IST)
गामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाकडून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी न देण्याची शक्यता असून, पक्षात नव्या पिढीला पुढे आणण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी उलथापालथ होऊ शकते. अनेक अनुभवी नगरसेवकांची नाराजी व्यक्त होण्याची शक्यता असून, काहींनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे.
29 Oct 2025 08:51 AM (IST)
बिहारनंतर, निवडणूक आयोग आता देशभरात विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करण्याची तयारी करत आहे. मतदार यादीच्या अखिल भारतीय विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मोहिमेबाबत निवडणूक आयोग एक मोठी पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडणूक आयोगाने बिहारनंतर देशातील १० ते १५ राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात SIR प्रक्रिया राबवणार असल्याची घोषणा केली आहे.
वाचा सविस्तर- SIR प्रक्रियेत मतदार यादीतून नाव वगळू नये यासाठी ‘हे’ काम आतापासूनच करा
29 Oct 2025 08:49 AM (IST)
मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानला ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील दुसरा सामना शुक्रवारी लाहोरमध्ये खेळला जाईल.
Marathi Breaking news live updates : भिवंडीत एक संतापजनक आणि धक्कदायक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ठार मारल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत घडली आहे.






