Maharashtra Breaking News
28 Oct 2025 05:05 PM (IST)
पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग संदर्भात "स्टे" कायम आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत धर्मदाय आयुक्त यांच्याकडून "स्टे" कायम करण्यात आला आहे. "स्टे" दरम्यान जागेवर कुठला ही व्यवहार करता येणार नाही. ३० ऑक्टोबर रोजी राज्य धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे.
28 Oct 2025 04:55 PM (IST)
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांच्या व्हिस्की ब्रँडने खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा व्हिस्की ब्रँडदेखील व्यावसायिक जगात एक मोठे नाव बनत आहे. संजय दत्त यांच्या व्हिस्की ब्रँड, “द ग्लेनवॉक” ने चार महिन्यांत संपूर्ण भारतात १० लाखांहून अधिक बाटल्या विकल्या आहेत. कंपनीच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे विक्रीचे प्रमाण पाच पट आहे, गेल्या वर्षी याच काळात विकल्या गेलेल्या २००,००० हून अधिक बाटल्यांपेक्षा ही लक्षणीय वाढ आहे.
28 Oct 2025 04:40 PM (IST)
भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी बाजी मारली. सुरुवातीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकला. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात २९ ऑक्टोबरपासून ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबद्दल भाष्य केले आहे.
28 Oct 2025 04:35 PM (IST)
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये बिहार पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील दिसून येत आहे. विरोधकांनी बिहारमधील व्यवस्थेवर टीकास्त्र डागले आहे. तर सत्ताधारी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र दरम्यान, बिहार पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये जेवायला गेलेल्या बहीणीवर भावावर दादागिरी करत कोण रे ही तुझी असे विचारुन पोलिसांनी त्रास दिला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस हे नक्की रक्षक आहेत का असा प्रश्न उपस्थित केला.
28 Oct 2025 04:35 PM (IST)
भारताचे तिन्ही सशस्त्र दल येत्या ३० ऑक्टोबरपासून पश्चिम सीमेवर संयुक्तपणे ‘त्रिशूल’ सराव सुरू करणार आहे. भारतीय लष्कराकडून या सरकार या सरावासाठी मोठी तयारीदेखील सुरू केली आहे. भारताने त्रिशूल सरावासाठी आधीच NOTAM (हवाई मोहिमांना सूचना) जारी केली आहे. भारताच्या या सरावामुळे पाकिस्तानी सैन्यात मात्र घबराट पसरली आहे.
28 Oct 2025 04:25 PM (IST)
डी. गुकेशने सेंट लुईस, मिसूरी, यूएसए येथे झालेल्या क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊनच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखला आहे. तो जागतिक बुद्धिबळ विजेता का आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. जगातील अव्वल चार खेळाडूंचा समावेश असलेली ही एक छोटी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आहे. या स्पर्धेत गुकेश व्यतिरिक्त, मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना देखील सहभागी होत आहेत. कार्लसनविरुद्ध गुकेशची सुरुवात जरी खराब झाली असली तरी त्याने नाकामुरा आणि कारुआनाविरुद्ध लागोपाठ दोन विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. नाकामुराविरुद्धचा हा विजय जास्तच विशेष ठरला आहे. काही दिवसांपूर्वी जपानी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने गुकेशवर मिळवलेल्या विजयानंतर गैरवर्तन केले होते.
28 Oct 2025 04:20 PM (IST)
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! अशी म्हण म्हणतात ती उगाचच नाही. कारण आपला शेजारी असलेला आपला शत्रू पाकिस्तानला देखील हीच म्हण लागू होते. पाकिस्तान सतत भारताच्या कुरापती काढत असतो. दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन केले आहे. भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे.
28 Oct 2025 04:15 PM (IST)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी आहे. वाढत्या इंधनांच्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. तसेच पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल करणे जास्त सोपे आणि सोयीस्कर असते. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईकला देखील ग्राहकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
28 Oct 2025 04:10 PM (IST)
सरकारी नौकरीची सुवर्ण संधी! इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ६४ हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट irctc.com द्वारे अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसे करावे.
28 Oct 2025 04:01 PM (IST)
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.
28 Oct 2025 03:56 PM (IST)
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.
28 Oct 2025 03:46 PM (IST)
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचा एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे राग मनात धरत पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने फावड्याने डोक्यात वार करून हत्या केली.
28 Oct 2025 03:42 PM (IST)
बसमधील सीटवरून होणारे वाद हे प्रवाशांमध्ये रोजच्याच घडत असले तरी, कधीकधी हे वाद मारामारी किंवा शारीरिक हाणामारीपर्यंत पोहोचतात. हल्ली असे वाद बरेचजा व्हायरल होताना दिसतात. दिल्लीत तर हे आता अगदीच कॉमन झाले आहे. पण इतर ठिकाणीही हे वाद हमखास बघायला मिळतात.
28 Oct 2025 03:37 PM (IST)
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता.
28 Oct 2025 03:23 PM (IST)
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, गृहमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, त्यांची युती झाली तरी त्यामुळे मुंबईकरांचे गेल्या २५ वर्षात झालेले नुकसान भरून निघणार नाही.
28 Oct 2025 03:18 PM (IST)
आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली असून आयोग 18 महिन्यात अहवाल सादर करणार आहेत. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
28 Oct 2025 03:17 PM (IST)
दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रील स्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे इत्यादी हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी ‘रीलस्टार’चा ट्रेलर शेअर केला आहे.
28 Oct 2025 03:10 PM (IST)
ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “उद्याचा हा मोर्चा ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढला आहे.
28 Oct 2025 02:55 PM (IST)
लाखो तरुण बँकांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत आहेत, येणाऱ्या प्रत्येक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) पुढील पाच महिन्यांत ३,५०० नवीन अधिकारी पदांची भरती करणार आहे.
28 Oct 2025 02:50 PM (IST)
तासगाव/ मिलिंद पोळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर तासगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा उलथापालथीच्या टप्प्यावर आली आहेत. भाजपपासून दूर झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी नव्या राजकीय दिशेचा शोध सुरू केला आहे, तर विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीवर आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजप नव्याने संघटन करुन तयारीला लागली आहे. त्यामुळे तासगाव नगरपरिषदेची निवडणूक ही सत्तेसाठीची लढत न राहता प्रतिष्ठेची झुंज ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
28 Oct 2025 02:44 PM (IST)
पिंपरी : पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे. या निर्णयामुळे नदी स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५२५ कोटी रुपयांच्या कामांसाठी शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला असून, डिसेंबर २०२५ पासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
28 Oct 2025 02:40 PM (IST)
साखळी फेरीत काही जवळच्या विजयांसह उपांत्य फेरीत स्थान मिळविणारा दक्षिण आफ्रिका महिला एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम चार सामन्यांमध्ये इंग्लंडचा सामना करेल. इंग्लंड चार वेळा विश्वविजेता आहे. जर दक्षिण आफ्रिकेला मजबूत आव्हान उभे करायचे असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज त्यांच्या दोन्ही लीग स्टेज पराभवांमध्ये अपयशी ठरले, दोन्ही वेळा फिरकी गोलंदाजांसमोर ते कोसळले.
28 Oct 2025 02:31 PM (IST)
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 10 नोव्हेंबरपासून Twitter.com डोमेन बंद केला जाणार आहे, म्हणजेच आता सर्व सेवा X.com डोमेनवर शिफ्ट केली जाणार आहेत. तथापी जास्त युजर्सवर याचा थेट परिणाम होणार नाही. मात्र काही अंकाऊंट्स असे आहेत ज्यांनी वेळीच योग्य पाऊलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा हे अकाऊंट लॉक होऊ शकतात.
28 Oct 2025 02:30 PM (IST)
मुंबई: फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी आणि भारतातील आघाडीच्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) आज मुंबईतील त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयात दक्षता जागरूकता सप्ताह २०२५ चे उद्घाटन केले.
28 Oct 2025 02:25 PM (IST)
अहिल्यानगर: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २७ ते २९ ऑक्टोंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पाश्र्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
28 Oct 2025 02:19 PM (IST)
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणाने लग्नाच्या अवघ्या २५ दिवसानंतरच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीसोबत होणारे सततचे वाद आणि तिसऱ्यांदा तिने घर सोडून गेल्यामुळे निराश होऊन तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुधीर वर्मा असे आहे.
28 Oct 2025 02:08 PM (IST)
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच त्याने चांगली कमाई केली आहे आणि अजूनही तो आपला ठसा कायम ठेवत आहे. चाहते ‘कांतारा चॅप्टर १’ च्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ओटीटी रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे, पण चाहते अजूनही नाराज आहेत. यामागचे कारण काय आहे आपण जाणून घेणार आहोत.
28 Oct 2025 02:02 PM (IST)
गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असं सांगितलं जात आहे की तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत, तेही सलमान खानसोबत. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचा ‘पार्टनर’ चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता बातमी आहे की जवळपास दोन दशकांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
28 Oct 2025 01:55 PM (IST)
पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे. या निर्णयामुळे नदी स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५२५ कोटी रुपयांच्या कामांसाठी शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला असून, डिसेंबर २०२५ पासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
28 Oct 2025 01:48 PM (IST)
साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित PSI गोपाल बदने याला पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशीदेखीस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली तर गोपाल बदने याने पोलिसांना सरेंडर केले. पण सरेंडर होण्यापूर्वी गोपाळ बदने ने मोबाईल लपवला असल्याचे समोर आले आहे.
28 Oct 2025 01:40 PM (IST)
गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असं सांगितलं जात आहे की तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत, तेही सलमान खानसोबत. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचा ‘पार्टनर’ चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता बातमी आहे की जवळपास दोन दशकांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
28 Oct 2025 01:35 PM (IST)
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घरगुती हिंसाचार, अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये फक्त वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांचे सरासरी प्रमाण दर तीन गुन्ह्यांसाठी एक घरगुती हिंसाचाराचा गुन्हा आहे. हे आकडे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडूनच आले आहेत.
28 Oct 2025 01:25 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघामध्ये अनेक नवे खेळाडू असणार आहेत. एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारताचे खेळाडू श्रेयस अय्यर हा जखमी झाला होता त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
28 Oct 2025 01:15 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र यामध्ये युतीमध्ये लढत द्यायची की स्वबळावर लढायचे याची चाचपणी अद्याप सुरु आहे. यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतंर्गत चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शाह हे मुंबईमध्ये भाडप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाला राजकीय सूर जास्त होते. यामध्ये अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली.
28 Oct 2025 01:05 PM (IST)
राष्ट्रीय चाचणी संस्थेने अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यावर्षी परीक्षेत तीन नवीन सैनिक शाळा जोडल्या गेल्या आहेत. इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.nic.in वर अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे, तर शुल्क भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असेल.
28 Oct 2025 01:00 PM (IST)
वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरी उघडकीस आणली होती. आता या प्रकरणानंतर पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेश कौशिक यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत या फॅक्टरीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र ठाण्याच्या इतक्या जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
28 Oct 2025 12:50 PM (IST)
उत्तरप्रदेश येथील झाँसी जिल्ह्यातून अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर गळा चिरला आणि भुसाखाली लपवून ठेवला. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे.
28 Oct 2025 12:40 PM (IST)
साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर पीएसआय बदने याचे नाव लिहिले होते. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
28 Oct 2025 12:20 PM (IST)
फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीडित महिला डॉक्टरचे मूळ गाव वडवणी आज कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी हा बंद पुकारला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले नसून तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी पुरावे नष्ट करून नंतर सरेंडर केले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
28 Oct 2025 12:11 PM (IST)
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री एक अत्यंत संशयास्पद मृतदेह सेक्टर -७४ येथील आलिशान सुपरटेक नॉर्थ आय सोसायटीत आढळून आला आहे. तो मृतदेह २९ वर्षीय तरुणाचा असल्याचे समोर आलं आहे. त्याच आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना अपघात आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहे.
28 Oct 2025 12:05 PM (IST)
जन सुराज्य पक्षाच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणामध्ये मोठा बदल करणारे प्रशांत किशोर यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर हे चक्क दोन राज्यांचे मतदार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रशांत किशोर हे बिहारसह पश्चिम बंगालचे देखील मतदार असल्याची धक्कादायक दावा वृत्तसंस्थांकडून करण्यात येत आहे.
28 Oct 2025 11:55 AM (IST)
छठपूजेचा बिहारसह उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साह आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी होणार आहेत. मात्र त्यांच्या पूजेसाठी खोटी यमुना नदी तयार केली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
28 Oct 2025 11:45 AM (IST)
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा १२ तासांहून अधिक साधारण १३० किलोमीटरचा प्रवास करून रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई गावात पोहोचला. प्रचंड उत्साह आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा मोर्चा आज नागपूरकडे कूच करणार आहे. यावेळी नागपुरात महाएल्गार सभा घेऊन बच्चू कडू सरकारला जाब विचारणार आहेत.
28 Oct 2025 11:25 AM (IST)
मुंबईतील वरळी डोममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख केला. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अजगर असा केला.
28 Oct 2025 11:25 AM (IST)
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.
28 Oct 2025 11:17 AM (IST)
"अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे असे त्यांनी म्हटले. अमित शहांनी काल कुबड्या म्हणून उल्लेख केला. भिमान असल्यास एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे," असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले,
28 Oct 2025 11:07 AM (IST)
बिहारमध्ये छठपूजेचा मोठा उत्साह आहे. यानिमित्ताने बिहारी महिलांनी नदीच्या किनारी जाऊन छठपूजा केली. यामुळे घाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी मोठ्या जहाजातून आकर्षक सजावट केलेला रथ नदीतून फिरवण्यात आला.
छठ घाटों पर संध्या अर्घ्य के दौरान मतदाता जागरूकता गतिविधि@ECISVEEP pic.twitter.com/g6dfDrkwAr
— Chief Electoral Officer, Bihar (@CEOBihar) October 27, 2025
28 Oct 2025 10:59 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यामध्ये टीम इंडिया हारल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी मैदानावर धुमाकुळ घातला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने धमाल केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, रोहित शर्माने भारतात शानदार पुनरागमन केले.
28 Oct 2025 10:52 AM (IST)
उत्तरप्रदेश येथील झाँसी जिल्ह्यातून अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर गळा चिरला आणि भुसाखाली लपवून ठेवला. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे.
28 Oct 2025 10:46 AM (IST)
साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर पीएसआय बदने याचे नाव लिहिले होते. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
Marathi Breaking news live updates: गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत भूकंप होताना दिसत आहे. त्यातच आता पश्चिम तुर्कीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ६.१ इतकी तीव्रता नोंदवली गेली. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या (AFAD) मते, भूकंपाचे केंद्र बालिकेसिर प्रांतातील सिंदिरगी शहरात होते. इस्तंबूल, बुर्सा, मनिसा आणि इझमीर प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.






