Maharashtra Breaking News
28 Nov 2025 09:34 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू रांची येथे पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेमध्ये बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रांची हे एमएस धोनीचे मूळ गाव आहे. त्यामुळे त्याने विराट कोहली आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंसाठी त्याच्या घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते.
28 Nov 2025 09:32 AM (IST)
बिहारच्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी टेकडीवर वसलेले मुंडेश्वरी माता मंदिर आज जगातील सर्वात जुने कार्यरत मंदिर म्हणून ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ६०८ फूट उंचीवरील या टेकडीवर वसलेले हे प्राचीन शक्तीपीठ हजारो वर्षांपासून अखंडपणे पूजेचे केंद्रबिंदू राहिले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (ASI) विविध शिलालेख, शकेकालीन पुरावे आणि ब्राह्मी लिपीतील लेखांच्या आधारे या मंदिराचे बांधकाम सुमारे १०८ इसवी सनाचे असल्याचे मान्य केले आहे. यामुळे मुंडेश्वरी मंदिराला ‘जगातील सर्वात जुने अखंड कार्यरत मंदिर’ हा मान मिळाला आहे.
28 Nov 2025 09:32 AM (IST)
पाकिस्तानमध्ये सध्या ट्राय सिरीज खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये तीन संघ सहभागी झाले आहेत. या मालिकेचा सेमीफायनलचा सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवण्यात आला. टी-२० ट्राय सिरीजच्या सहाव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर श्रीलंकेच्या विजयाने झिम्बाब्वेचा प्रवास संपुष्टात आला आहे.
28 Nov 2025 09:28 AM (IST)
GST Economic Outlook: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण केल्याने वापरात लक्षणीय वाढ झाली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या ऑक्टोबरच्या मासिक आर्थिक आढावामध्ये असे म्हटले आहे की, महागाईचा दबाव कमी झाल्यामुळे आणि अलिकडच्या कर सुधारणांमुळे घरगुती उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जवळच्या काळात वापराचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत आहे.
Marathi breaking live marathi- ओबीसी आरक्षण कायम झाल्यानंतर राज्य शासनाने जवळपास ३-४ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. नगर परिषद व नगर पंचायतींची प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु, आता त्यात आरक्षणाच्या टक्केवारीचे विघ्न आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने नाराजी व्यक्त करत निवडणुका रोखण्याचा इशारा दिला. शुक्रवारी (दि. २८) यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून, फैसला होण्याची शक्यता आहे.






