Maharashtra Breaking News
25 Nov 2025 09:38 AM (IST)
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारातील ८१ कोटी ९१ लाखांच्या वसुलीसाठी ३० एप्रिल अखेर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश विभागीय सह निबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी बँकेच्या ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी (दि.२६) हजर राहण्याची नोटीस प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बजावली आहे.
25 Nov 2025 09:28 AM (IST)
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्य असे राम मंदिर उभारण्यात आले आहे. या राम मंदिरात आता एक वैभवशाली सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार आहेत. हा भव्य ध्वजारोहण सोहळा परंपरा, श्रद्धा आणि राष्ट्रवादाचा एक अनोखा संगम असेल. ध्वजारोहणाचा शुभ काळ सकाळी ११:५८ ते दुपारी १२:३० पर्यंत आहे. त्यामुळे या 32 मिनिटांत हा सोहळा पार पडेल, अशी माहिती दिली जात आहे.
25 Nov 2025 09:18 AM (IST)
25 Nov 2025 09:05 AM (IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाकडून संघ जाहीर करण्यात आले आहेत. भारताच्या संघात एक मोठा बदल दिसून आला आहे, कारण शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. यामुळे केएल राहुलला भारतीय संघाचे कॅप्टन नियुक्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दोन सलामीवीरांची निवड केली आहे - ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल. या दोन्ही युवा खेळाडूंना त्यांच्या चांगल्या फॉर्ममुळे संघात स्थान मिळाले आहे. शुभमन गिलच्या दुखापतीमुळे आता गायकवाड आणि जैस्वाल यांच्यात चुरस रंगणार आहे, कारण तेच आता रोहित शर्माचा परफेक्ट सलामी जोडीदार ठरू शकतात.
25 Nov 2025 09:00 AM (IST)
कॅनडात( Canada) राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी आणि ऐतिहासिक ठरणारी घटना घडली आहे. कॅनडाच्या संसदेत सादर केलेले विधेयक C-3 अधिकृतपणे मंजूर झाले असून त्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे. या बदलामुळे कॅनडात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या भावी पिढ्यांसाठी नागरिकत्व मिळवणे आता अधिक सोपे, न्याय्य आणि स्पष्ट मार्गाने शक्य होणार आहे.
25 Nov 2025 08:53 AM (IST)
कोल्हापुरात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कौसर गरगरे नावाच्या 30 वर्षीय विवाहित महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिच्या आत्महत्येमागे निवडणूक खर्चासाठी माहेरकडून तब्बल दहा लाख रुपये आणण्याचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे
वाचा सविस्तर- कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास
25 Nov 2025 08:50 AM (IST)
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असाव्यात, पण तिजोरीचा मालक आपल्या हातातच आहे, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये प्रचार सभेच्या शुभारंभाच्या वेळी चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले. राज्यातील सरकारी निधीच्या वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये तणाव वाढले असून, अजित पवार यांनी दावा केला होता की, “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि निधी कुणाला द्यायचा हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे.” यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “तुम्ही तिजोरीच्या चाव्या ठेवलेल्या असाल, तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर ती उघडली, तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे,” असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला.
25 Nov 2025 08:45 AM (IST)
विवाह पंचमीचा पवित्र सणांपैकी एक सण मानला जातो. हा दिवस राम सीतेच्या विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप आहे. पंचांगानुसार, विवाह पंचमी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी आज मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी आहे. असे म्हटले जाते की, जर तुम्ही विवाह पंचमीच्या दिवशी राशीनुसार राम आणि सीतेला काही वस्तू अर्पण केल्या तर त्यांना शाश्वत फळे मिळतात. शिवाय, विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. विवाह पंचमीच्या दिवशी रामसीतेला राशीनुसार कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या जाणून घ्या.
वाचा सविस्तर- Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी
25 Nov 2025 08:37 AM (IST)
राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादविवादातून माहेरी आलेल्या पत्नीवर पतीने तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडकीतील औंध रोडवरील पोस्ट ऑफिसजवळ हा प्रकार घडला आहे. हल्ला करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
25 Nov 2025 08:36 AM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या याद्या १२ तारखेला आणि त्यानंतर सोमवारी (दि. २४) प्रसिध्द करण्याचे नियोजन होते. मात्र, आता या याद्या बुधवारी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समित्यांचे १४६ गण आदींसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा परिषदेतील सदस्य पदासाठी १३ ऑक्टोंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
25 Nov 2025 08:32 AM (IST)
Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0: प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते, पण ते साध्य करणे सोपे नसते. बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक करून हे स्वप्न पूर्ण करू शकतात. तथापि, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करत नाही तर मध्यमवर्गीय व्यक्तींना त्याचा फायदा मिळवून देत आहे. कसे ते समजून घेऊया.
वाचा सविस्तर - घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?
25 Nov 2025 08:30 AM (IST)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारातील ८१ कोटी ९१ लाखांच्या वसुलीसाठी ३० एप्रिल अखेर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश विभागीय सह निबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी बँकेच्या ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी (दि.२६) हजर राहण्याची नोटीस प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बजावली आहे.
जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनीही बँकेच्या कारभाराबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीनुसार, मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली.
25 Nov 2025 08:29 AM (IST)
Gold Rate Today: भारतात सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात सतत घसरण सुरु आहे. आज देखील पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोनं – चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यां ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज भारतातील विविध शहरातील सोन्याचे दर काय आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
भारतात 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,512 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,469 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,384 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,840 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 162.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,62,900 रुपये आहे.
25 Nov 2025 08:28 AM (IST)
सोमवारी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोककळाला बुडाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने केवळ भारतच शोक करत नाही, तर पाकिस्तानी लोकही दुःखी आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार रशीद लतीफ यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते. ऑक्टोबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते बरे होऊन परतले असले तरी त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती.
सोमवारी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना लतीफ म्हणाले की धर्मेंद्र हे एक दिग्गज होते आणि त्यांनी एक दीर्घ वारसा सोडला आहे. माजी यष्टीरक्षक म्हणाले की, हे-मॅन पाकिस्तानमध्येही खूप प्रसिद्ध होते. “धर्मेंद्रजी एक दिग्गज नायक होते आणि त्यांचा ‘शोले’ हा चित्रपट सर्वकालीन क्लासिक आहे. त्यांनी संपूर्ण उपखंडात एक महान वारसा सोडला आणि तो पाकिस्तानमध्येही खूप प्रसिद्ध होता. त्यांना माझी श्रद्धांजली,” असे लतीफ म्हणाले.
Marathi Breaking news live updates- सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने संतुलित दृष्टिकोन स्वीकारत म्हटले आहे की, राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कोणतीही कालमर्यादा लादता येणार नाही. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कृती न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत, परंतु जर विलंब झाला तर ते हस्तक्षेप करू शकतात. जेव्हा विधेयक कायदा बनते तेव्हाच न्यायालयीन पुनरावलोकन उद्भवते.






