फोटो सौजन्य- pinterest
मिथुन राशीमध्ये गुरुचे संक्रमण शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता होणार आहे
वृश्चिक राशीमध्ये बुधचे संक्रमण शनिवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता होणार आहे
धनु राशीमध्ये मंगळाचे संक्रमण रविवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 8.27 वाजता होणार आहे
धनु राशीत सूर्याचे संक्रमण मंगळवार, 16 डिसेंबर रोजी पहाटे 4.26 वाजता होणार आहे
धनु राशीत शुक्राचे संक्रमण शनिवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता होणार आहे
धनु राशीत बुधाचे संक्रमण सोमवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी 7.27 वाजता होणार आहे
डिसेंबरमध्ये 5 प्रमुख ग्रहांचे होणाऱ्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर शुभ अशुभ पडणार आहे. त्यापैकी काही राशीच्या लोकांना या काळात लाभ होणार आहे.
डिसेंबरमध्ये होणारे ग्रहांचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाच्या संधी देखील मिळतील. व्यवसायिकांना अपेक्षित यश मिळेल. या महिन्यात मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षितत यश मिळेल. बेरोजगारांना चांगली बातमी मिळू शकते.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नवविवाहित जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरी करणाऱ्यांना आनंद मिळेल. तुमच्या सध्याच्या नोकरीत पगारवाढीचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.
डिसेंबरमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा राहील. या महिन्यात तुम्हाला संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदीचा फायदा होईल. तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक केले जाईल, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढू शकतो. या काळात तुम्ही पूजा आणि इतर धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करता येईल. या महिन्यात तुम्ही कोणतीही कामे हाती घ्याल, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तर तुम्हाला यश मिळेल.
डिसेंबरमध्ये तूळ राशीच्या लोकांवर ग्रहांचा शुभ प्रभाव राहील. व्यावसायिकांना मोठा करार मिळू शकेल किंवा त्यांचा व्यवसाय वाढू शकेल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त महत्त्वाची कामे साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुमच्या बॉसची साथ मिळेल. कोणीतरी तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात सल्ला किंवा मदत देऊ शकेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
डिसेंबरमध्ये ग्रहांच्या होणाऱ्या संक्रमणाचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल. यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुने, अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. करिअरच्या दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल राहील. तुम्ही पैसे आणि नफा मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह संक्रमण करणार आहे
Ans: या संक्रमणाचा मेष, सिंह, कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार
Ans: तूळ, मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल






