Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका

Marathi breaking live marathi- तसेच पश्चिम बंगालसह निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये दर महिन्याला किमान तीन दिवस गृहमंत्री शहा दौऱ्यावर असतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2025 | 07:05 PM
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news updates- बिहार विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर आता पश्चिम बंगालसह इतर पाच राज्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, भाजपकडून तयारीही केली जात आहे. या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असेल, असे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री शहा या महिन्याच्या अखेरीस पश्चिम बंगालच्या दौऱ्याने त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील, अशीही माहिती दिली जात आहे.

 

 

 

The liveblog has ended.
  • 03 Dec 2025 07:01 PM (IST)

    03 Dec 2025 07:01 PM (IST)

    IND vs SA T20 series : टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन, वाचा कुणाला लागली लॉटरी?

    Squad announced for T20 series against South Africa :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर या दोन संघामध्ये पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी संघातील सर्वात मोठी बातमी म्हणजे हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल या स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

  • 03 Dec 2025 06:52 PM (IST)

    03 Dec 2025 06:52 PM (IST)

    गुंतवणुकीत मोठा विक्रम! HDFC पेन्शनच्या AUM मध्ये विक्रमी २००% वाढ; १,५०,००० कोटींचा टप्पा केला पार

    मुंबई, नोव्हेंबर २१, २०२५: भारतातील नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) अंतर्गत सर्वात मोठा खाजगी क्षेत्र पेन्शन फंड म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या एचडीएफसी पेन्शनने (HDFC Pension) एका मोठ्या कामगिरीची घोषणा केली आहे. कंपनीने १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट’ (AUM) मध्ये ₹१,५०,००० कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा पार केला आहे.

  • 03 Dec 2025 06:33 PM (IST)

    03 Dec 2025 06:33 PM (IST)

    'SET' पेपर फुटी प्रकरणी Pune विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह; केवळ बदली नव्हे, तर..., मागणी काय?

    पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (एसपीपीयू) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पेपर फुटी प्रकरणानी आरोपींकडून झालेल्या थेट कबुलीजबाबानंतर विद्यापीठाच्या सेट विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करून पेपर फोडण्यात आल्याची कबुली समोर आल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती अधिक गंभीर बनली असून संपूर्ण प्रशासनालाच जबाबदार धरण्यात येत आहे. यावेळी सेट पेपर फुटीप्रकरण : केवळ बदली नव्हे, सखोल चौकशीची गरज असे राहुल ससाणे यांनी संगीतले आहे.

  • 03 Dec 2025 06:19 PM (IST)

    03 Dec 2025 06:19 PM (IST)

    Bengaluru एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द; देशातील अनेक विमानतळांवर...

    देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे  एअरपोर्टसवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले. चेक -इन सिस्टिम प्रभावित झाल्याने अनेक विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला. बंगळुरू एअरपोर्टवरून तब्बल 42 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान कालच बंगळुरू एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे हा सायबर अटॅक तर नाही ना, असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.

  • 03 Dec 2025 05:55 PM (IST)

    03 Dec 2025 05:55 PM (IST)

    EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Body Elections) उत्साह आहे.पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदान देखील पार पडले आहे मात्र निकाल लांबणीवर पडला. न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र मतदान करताना देखील मतदान केंद्रावर अनेक प्रकार झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी घोषणा, वाद झाले तर पुण्यामध्ये (Pune News) चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

  • 03 Dec 2025 05:33 PM (IST)

    03 Dec 2025 05:33 PM (IST)

    रायपुरमध्ये भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर ३५८ धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने १०५ धावा तर विराट कोहलीने १०२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

  • 03 Dec 2025 05:03 PM (IST)

    03 Dec 2025 05:03 PM (IST)

    Dharmendra यांच्या अस्थी गंगेत विसर्जित

    २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककाळा पसरली आहे. ३ डिसेंबर रोजी दिवंगत अभिनेत्याच्या अस्थींचे विसर्जन हरिद्वारमध्ये करण्यात आले. त्यांच्या अस्थींचे विसर्जन हर की पौडी येथे करण्यात आले. विसर्जनाच्या वेळी धर्मेंद्रचे कुटुंब उपस्थित होते. त्यांचा नातू करण देओलने त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले.

  • 03 Dec 2025 04:55 PM (IST)

    03 Dec 2025 04:55 PM (IST)

    एकदा चार्ज करा आणि चालवतच राहा! Maruti E Vitara ची रेंज आली समोर, डिलिव्हरी कधीपासून सुरु? जाणून घ्या

    भारतात इलेक्ट्रिक कारसाठी अनुकूल वातावरण बनताना दिसत आहे. चार्जिंग स्टेशन आणि ग्राहकांचा EV ला असणारा पाठिंबा अनेक कार उत्पादक कंपन्यांना इलेक्ट्रिक कार ऑफर करण्यास प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेच तर आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.

  • 03 Dec 2025 04:50 PM (IST)

    03 Dec 2025 04:50 PM (IST)

    प्रथिनांनी भरपूर, सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय… घरच्या घरी बनवा टेस्टी ‘अंडा चीज पराठा’

    भारतीय घरांमध्ये पराठे हा नाश्ता आणि डब्यासाठीचा नेहमीचा, पण अत्यंत आवडता पर्याय असतो. आलू पराठा, पनीर पराठा, गोभी पराठा असे अनेक प्रकार आपण खातो; पण थोडं फ्युजन करून काहीतरी हटके बनवायचं असेल तर एग चीज पराठा हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि चव यांचा परफेक्ट मेळ साधला जातो. पराठ्याची पारंपरिक चव आणि अंड्याची सॉफ्ट टेक्स्चर याला आकर्षक बनवते, त्यातच चीज घातल्यामुळे एक अप्रतिम क्रीमी टच मिळतो. हा पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा झटपट पण पौष्टिक नाश्त्यासाठी अगदी योग्य आहे. सर्वात खास म्हणजे हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि जास्त साहित्यही लागत नाही. गरमागरम गॅसवरून उतरलेला अंडा चीज पराठा चटणी किंवा केचपसोबत खाल्ला तर याची चव आणखीन बहारदार बनेल. ही एक डिश आहे जी लहानच काय तर मोठेही आवडीने खाऊ शकतात. लगेच नोट करून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

  • 03 Dec 2025 04:45 PM (IST)

    03 Dec 2025 04:45 PM (IST)

    14 किंवा 15 डिसेंबर कधी आहे सफला एकादशी, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व

    दर महिन्यामध्ये दोन एकादशीचे व्रत पाळले जाते आणि वर्षभरात 24 एकादशीचे व्रत असतात. हे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहेत. या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. पौष महिन्यात सफला एकादशीचे व्रत केले जाते. दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत पाळले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व कार्यांमध्ये यश मिळते. या उपवासाच्या परिणामामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळते आणि एखाद्याच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात. शास्त्रांनुसार, सफला एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांना हजारो वर्षांच्या तपश्चर्येइतके फळ मिळते. शिवाय, ते पाळल्याने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते. कधी आहे सफला एकादशी आणि पूजेसाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या

  • 03 Dec 2025 04:40 PM (IST)

    03 Dec 2025 04:40 PM (IST)

    पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला

    पाकिस्तानच्या (Pakistan) राजकीय वर्तुळात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बिलाल बिन साकिब यांनी पंतप्रधान कार्यालयातून राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मे २०२५ मध्ये बिलाल यांची पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना मंत्रिपदासमान दर्जा देण्यात आला होता. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी अचानक हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पाकिस्तानात ‘नक्की चाललंय काय?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • 03 Dec 2025 04:35 PM (IST)

    03 Dec 2025 04:35 PM (IST)

    पक्ष्यांनाही ‘टक्कल’ पडते? पुण्यातील संशोधकांचा राष्ट्रीय स्तरावरचा शोधनिबंध प्रसिद्ध

    माणसांमध्ये टक्कल पडणे सामान्य मानले जाते. मात्र पक्ष्यांनाही टक्कल पडू शकते, या अनोख्या विषयावर पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीन भारतीय पक्ष्यांमध्ये आढळलेल्या पिसेगळतीची नोंद करणारा शोधनिबंध नुकताच राष्ट्रीय विज्ञानपत्रिका ‘न्यूजलेटर फॉर बर्डवॉचर्स’ मध्ये प्रकाशित झाला आहे. हा अभ्यास अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे पक्षी अभ्यासक उमेश वाघेला आणि राजेंद्र कांबळे यांनी केला आहे.

  • 03 Dec 2025 04:30 PM (IST)

    03 Dec 2025 04:30 PM (IST)

    पत्नीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह! पती सक्षम नसल्याने पत्नीला दिले सिगारेटचे चटके; पुण्यातील घटना

    दोन नवविवाहित जोडप्यांमध्ये हेल्दी शाररिक संबंध असणे आज काळाची गरज बनली आहे. अनेकांना उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी संसारात मुद्दा बनू शकतात. तुम्हाला नवल वाटेल मात्र पुण्यात एक धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. ज्याने तुम्हाला माणूस म्हणून वेदना होतील. त्याच कारण असं की बायकोने रात्रीच्या वेळी शारीरिक संबंधांसाठी आग्रह धरला मात्र नवऱ्याला वारंवार ते सहन झाल नाही. त्याचा राग मनात धरून त्याने बायकोच्या मांडीवर सिगारेटची चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Dec 2025 04:25 PM (IST)

    03 Dec 2025 04:25 PM (IST)

    महागाई वाढली, पण शिष्यवृत्तीचं काय? कमी रकमेमुळे विद्यार्थ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत

    प्राथमिक शिक्षण घेताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण व शैक्षणिक साहित्य घेताना आर्थिक ताण सहन करावा लागू नये, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, १८ वर्षाच्या कालावधीत शिष्यवृत्तीत वाढ न केल्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मागासवर्गीय मुली व मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होणे, त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृती योजना लागू केली होती.

  • 03 Dec 2025 04:20 PM (IST)

    03 Dec 2025 04:20 PM (IST)

    १७ वर्षांनंतर थिएटरमध्ये येतोय बॉलीवुडचा सर्वात मोठा चित्रपट; ३ तास ३२ मिनिटांचा एक्शन-थ्रिलरचा डोस

    बॉलिवूडसाठी 2025 हे वर्ष खूप यशस्वी ठरत आहे. या वर्षी ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट थिएटरमध्ये आले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. आता, २०२५ चा शेवटचा महिना बॉलिवूडसाठी खूप चांगला ठरू शकतो. येत्या काही दिवसांत, एक बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे ज्याला १७ वर्षांतील सर्वात लांब चित्रपट म्हटले जाते. १७ वर्षांपूर्वी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या “जोधा अकबर” नंतर हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात लांब चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि सस्पेन्सचा डबल डोस देण्यात येईल. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो रणवीर सिंगचा सर्वात अपेक्षित चित्रपट “धुरंधर” आहे.

  • 03 Dec 2025 04:15 PM (IST)

    03 Dec 2025 04:15 PM (IST)

    SBI मध्ये भरती… पैसे कमवा लाखात! वाचा माहिती, आताच करा अर्ज

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2025 संदर्भात मोठी अधिसूचना जाहीर केली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या या नोटिफिकेशननुसार एकूण 996 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

  • 03 Dec 2025 04:10 PM (IST)

    03 Dec 2025 04:10 PM (IST)

    महाराष्ट्र सरकार ‘राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट 2026’ मध्ये भागीदार

    महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते. या सहकार्याचा उद्देश उच्च-क्षमता असलेल्या स्टार्टअप्स, जागतिक उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणून तंत्रज्ञान-चालित विकासाला चालना देणे आणि उदयोन्मुख उपक्रमांसाठी नवीन संधी उघडणे आहे.

  • 03 Dec 2025 04:05 PM (IST)

    03 Dec 2025 04:05 PM (IST)

    Pune property Tax: शहरातील १६६७ मिळकतदारांकडे ७६३७ कोटींची थकबाकी

     पुणे महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांकडून मिळकत कराची वसुली करण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील फक्त १६६७मिळकतदारांनी सुमारे ७ हजार ७३७ कोटी रुपयांचा मिळकत कर थकविला आहे.

     

  • 03 Dec 2025 03:50 PM (IST)

    03 Dec 2025 03:50 PM (IST)

    Mumbai News: ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत

    मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंगचा महत्वाचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ डिसेंबर रोजी होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. गेट नंबर ३ प्रवेश, प्रिन्सेस डॉक, वॉटर फ्रंट एरिया, माझगाव येथे आज(3 डिसेंबर) बुधवारी सकाळी प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 03 Dec 2025 03:40 PM (IST)

    03 Dec 2025 03:40 PM (IST)

    कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा समतोल बिघडला!

    अकोला (ब्युरो): अकोला (Akola) जिल्ह्यातील पुरुष नसबंदीची संख्या गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने कमी होताना दिसत आहे, ज्यामुळे आरोग्य विभागाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा समतोल बिघडला आहे. या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अत्यंत कमी असल्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DAO) कार्यालयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

    वाचा सविस्तर 

  • 03 Dec 2025 03:28 PM (IST)

    03 Dec 2025 03:28 PM (IST)

    महाराष्ट्र सरकार ‘राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट 2026’ मध्ये भागीदार

    Maharashtra-Rajasthan Partnership: महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते. या सहकार्याचा उद्देश उच्च-क्षमता असलेल्या स्टार्टअप्स, जागतिक उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणून तंत्रज्ञान-चालित विकासाला चालना देणे आणि उदयोन्मुख उपक्रमांसाठी नवीन संधी उघडणे आहे.

    वाचा सविस्तर 

  • 03 Dec 2025 03:15 PM (IST)

    03 Dec 2025 03:15 PM (IST)

    शहरातील १६६७ मिळकतदारांकडे ७६३७ कोटींची थकबाकी

    Pune property Tax:  पुणे महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांकडून मिळकत कराची वसुली करण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील फक्त १६६७मिळकतदारांनी सुमारे ७ हजार ७३७ कोटी रुपयांचा मिळकत कर थकविला आहे.

    सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही माहिती माहिती अधिकारातून पुढे आणली आहे. महापालिकेने नुकतीच जाहीर केलेली अभय योजना ही महापालिकेच्या अर्थसंकल्पाला तोटा करणारी असून, त्या ऐवजी बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेने पुन्हा एकदा अभय योजना आणली आहे. आधी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यांना ही योजना सुरू करतांना वगळले होते. मात्र थकबाकीदारांना अभय देण्याविरोधात संघटना संतप्त आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 03 Dec 2025 02:55 PM (IST)

    03 Dec 2025 02:55 PM (IST)

    महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’

    सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे.

  • 03 Dec 2025 02:50 PM (IST)

    03 Dec 2025 02:50 PM (IST)

    India-Pakistan युद्धाला इस्लामी कट्टरपंथी Asim Munir जबाबदार

    पाकिस्तानच्या (Pakistan) राजकीय आणि लष्करी वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडवून देणारे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या बहीण अलीमा खान यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देशाचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुनीर यांच्या विचारसरणीला “कट्टर” ठरवत, त्यांच्या भूमिकेमुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण होत असल्याचा दावा केला आहे.

  • 03 Dec 2025 02:44 PM (IST)

    03 Dec 2025 02:44 PM (IST)

    भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री

    आजपासून भारतात रे-बॅन मेटा (जेन २) एआय ग्‍लासेस् उपलब्‍ध असणार आहेत, ज्‍यामध्‍ये सर्वोत्तम व्हिडिओ कॅप्‍चर क्षमता, सुधारित बॅटरी लाइफ, अपग्रेडेड मेटा एआय अनुभव आणि उत्‍साहवर्धक स्‍टाइल्‍स आहेत, ज्‍यामध्‍ये आयकॉनिक डिझाइनसह दैनंदिन उपयुक्‍तता आहे. हे कलेक्‍शन देशभरात Ray-Ban India वर आणि आघाडीच्‍या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्‍ध असेल, ज्‍यांची किंमत ३९,९०० रूपयांपासून सुरू होते.

  • 03 Dec 2025 02:38 PM (IST)

    03 Dec 2025 02:38 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Local Body Elections) राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काल (दि. 02 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर निकाल पुढे ढकलण्यात आले आहेत. यानंतर आता राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

  • 03 Dec 2025 02:31 PM (IST)

    03 Dec 2025 02:31 PM (IST)

    राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेला होणार ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार

    महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session ) नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे. मात्र हे अधिवेशन फक्त ८ दिवस चालेल अशी माहिती समोर आली आहे. अधिवेशनादरम्यान अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • 03 Dec 2025 02:14 PM (IST)

    03 Dec 2025 02:14 PM (IST)

    Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा

    बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान केवळ चित्रपटांमध्येच काम करत नाही तर त्यांची निर्मितीही करतो. तो शेवटचा 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसला होता. आता त्याने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्सने बनवला आहे. या चित्रपटाचे नाव 'हॅप्पी पटेल' आहे. आमिर खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली आहे.

  • 03 Dec 2025 02:02 PM (IST)

    03 Dec 2025 02:02 PM (IST)

    भारती आणि हर्षने साजरी केली लग्नाची 8th Anniversary

    लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचे घर लवकरच एका छोट्या पाहुण्याच्या हास्याने भरून जाणार आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया त्यांच्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज भारती सिंग आणि हर्ष यांच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस आहे आणि दोघांनीही हा खास क्षण अतिशय भव्य पद्धतीने साजरा केला. भारती सिंग आणि हर्ष यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मॅटरनिटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 03 Dec 2025 01:55 PM (IST)

    03 Dec 2025 01:55 PM (IST)

    टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलसमोर हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे. तर विरोधी संघ हा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

  • 03 Dec 2025 01:48 PM (IST)

    03 Dec 2025 01:48 PM (IST)

    राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. मात्र निकालावरुन राज्यामध्ये नाराजी पसरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राजकीय नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा देखील समावेश होता. यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत टीकाकार नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

  • 03 Dec 2025 01:40 PM (IST)

    03 Dec 2025 01:40 PM (IST)

    चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे

    चीनने (China) ७ ऑगस्ट २०२५ रोजी देशाच्या परदेशी प्रवेश–निर्गमन नियमांमध्ये बदल करून, एक नविन वीजा प्रकार, “K visa” लागू करण्याचा निर्णय घेतला. हा बदल १ ऑक्टोबर २०२۵ पासून लागू झाला आहे. या वीजेमार्फत चीन आता जगभरातून युवा वैज्ञानिक, अभियंते, संशोधक व तांत्रिक तज्ञांना आकर्षित करणार आहे.

  • 03 Dec 2025 01:35 PM (IST)

    03 Dec 2025 01:35 PM (IST)

    लग्न मोडल्यानंतर प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहचला पलाश मुच्छल

    गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे २३ नोव्हेंबर रोजी होणारे लग्न स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे ढकलण्यात आले. गायक पलाश मुच्छल यांना या घटनेचा धक्का त्याला बसला आणि त्याला देखील चिंतेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. या सर्व तणावादरम्यान, एका रेडिट वापरकर्त्याने दावा केला की पलाश मुच्छल वृंदावन येथील प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात त्यांचा ताण कमी करण्यासाठी गेला होता.

  • 03 Dec 2025 01:28 PM (IST)

    03 Dec 2025 01:28 PM (IST)

    Kriti Sanonच्या बहिणीचं लग्न; नुपूर सेनन –स्टेबिन बेन लवकरच अडकणार लग्नबंधनात?

    कृति सेनन बहीण नुपूर सेनन लवकरच गायक स्टेबिन बेनसोबत लग्नबंधणात अडकणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे ८ आणि ९ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न उदयपूरमधील प्रसिद्ध फेअरमाँट पॅलेस येथे होणार आहे, जे भारतातील सर्वात सुंदर आणि आलिशान लग्नस्थळांपैकी एक मानले जाते.

  • 03 Dec 2025 01:20 PM (IST)

    03 Dec 2025 01:20 PM (IST)

    अमेरिकन विद्यापीठातून शिक्षण घेणे का फायद्याचे? जगाला दिशा देण्यासाठी उच्च शिक्षणपद्धत!

    अमेरिकन विद्यापीठ जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धत मानली जाते. या शिक्षण पद्धत मधून अनेक मोठे नेते तसेच विचारवंतांनी अभ्यासाचे धडे घेतले आहेत आणि पुढे लोकांना जीवनाचे धडे दिले आहेत. संशोधन, शैक्षणिक उत्कृष्टता आणि पारंपरिक विद्ववता या गुणांमुळे अमेरिकन शिक्षण पद्धत तरुणांना विशेष प्रिय आहे. येथे शिकणाऱ्या तरुणांना भविष्यात उत्तम दर्जाच्या पगाराची नोकरीही मिळते. अमेरिकन विद्यापीठ या शिक्षण पद्धतने अनेक नोबेल पुरस्कारित, जागतिक नेते, शास्त्रज्ञ, उद्योजक घडवले आहेत.

  • 03 Dec 2025 01:09 PM (IST)

    03 Dec 2025 01:09 PM (IST)

    मुंबईची हवा प्रदूषित! AQI 104 वाढीमागे कोण? तज्ज्ञांनी उघड केला मोठा खुलासा !

    Mumbai AQI: मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 104 वर पोहोचला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. तज्ज्ञांनी यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बांधकाम कामे आणि हवामानातील बदल यांना जबाबदार ठरवले आहे.रविवारी मुंबईचा सरासरी AQI 104 इतका नोंदवला गेला, तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) सारख्या काही भागांत तो ‘गंभीर’ श्रेणीत होता. IIT आणि IMD च्या तज्ज्ञांनी या वाढीचे मुख्य कारण म्हणून शहरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम प्रकल्प, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि हिवाळ्यातील हवामान बदल यांकडे बोट दाखवले आहे.

  • 03 Dec 2025 12:55 PM (IST)

    03 Dec 2025 12:55 PM (IST)

    सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात

    सातारा येथे एक मोठा अपघात झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली कोसळली, ज्यामध्ये ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

  • 03 Dec 2025 12:45 PM (IST)

    03 Dec 2025 12:45 PM (IST)

    बीडमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे

    बीडमध्ये गेल्या महिनाभर चाललेल्या ऊस शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तोडगा निघाला. 3000 रूपये भावाच्या मागणीवर कारखानदारांनी 2775 रु. प्रति टन भाव मान्य केला. वाहतूक-तोडणी बंद पडलेल्या सर्व ठिकाणी कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

  • 03 Dec 2025 12:35 PM (IST)

    03 Dec 2025 12:35 PM (IST)

    पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन तिघांनी एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली आहे.

  • 03 Dec 2025 12:25 PM (IST)

    03 Dec 2025 12:25 PM (IST)

    गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे

    गौरी पालवे हिच्या मृत्यू झाल्याची बातमी अनंत गर्जेला समजताच त्याने आपलं डोकं भिंतीवर आपटलं होत. यामुळेच त्याला जखम झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे.

  • 03 Dec 2025 12:15 PM (IST)

    03 Dec 2025 12:15 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar:सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!

    कोर्टात नोटरी लावून लग्न केलेली नवरी सासरी जाताना अर्ध्या रस्त्यात फरार झाली. मुलाकडून 3 लाख रुपये घेऊन विश्वासघात केला. फसवणूक का केली? कोणासोबत पळाली? यामुळे कुटुंब हादरले असून पोलिसांत तक्रार दाखल.

  • 03 Dec 2025 12:05 PM (IST)

    03 Dec 2025 12:05 PM (IST)

    दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार

    दहिसरमध्ये मद्यपी पित्याने झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा ब्लेडने गळा चिरून खून केला आणि पत्नीवरही वार केला. सततच्या वाद-विवाद, संशय आणि दारूच्या नशेमुळे घडलेली ही संतापजनक घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली.

  • 03 Dec 2025 12:05 PM (IST)

    03 Dec 2025 12:05 PM (IST)

    ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन

    सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी पन्नालाल सुराणा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

  • 03 Dec 2025 11:55 AM (IST)

    03 Dec 2025 11:55 AM (IST)

    नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती - राजनाथ सिंह

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना बाबरी मशीद आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.  पंडित जवाहरलाल नेहरुंना जनतेच्या पैशाने पुन्हा बाबरी मशीद बनवायची होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. म्हणूनच बाबरी मशीद पुन्हा उभी राहू शकली नाही असं राजनाथ सिंह म्हणाले. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  • 03 Dec 2025 11:45 AM (IST)

    03 Dec 2025 11:45 AM (IST)

    वैदिक साधक देवव्रतचे योगी आदित्यनाथांनी केले कौतुक

    महाराष्ट्रातील १९ वर्षीय तरुण वैदिक साधक देवव्रत महेश रेखे यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतुक केले. योगींनी लिहिले आहे की, त्यांनी अतुलनीय साधना आणि उल्लेखनीय स्मरणशक्तीद्वारे २००० वैदिक मंत्रांचे स्मरण करून मिळवलेली अभूतपूर्व कामगिरी संपूर्ण आध्यात्मिक जगासाठी एक नवीन प्रेरणास्थान आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिन शाखेचे "दंडकर्म पारायण" ५० दिवस अखंड, शुद्ध आणि पूर्ण शिस्तीने पूर्ण करणे म्हणजे आपल्या प्राचीन गुरु परंपरेच्या वैभवाचे पुनरुज्जीवन आहे. पवित्र काशीच्या दिव्य भूमीवर हा वैदिक विधी पूर्ण झाला हे माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांच्या कुटुंबाचे, आचार्यांचे, संतांचे, ऋषींचे आणि ज्यांच्या पाठिंब्याने ही तपश्चर्या यशस्वी झाली त्या सर्व संस्थांचे मनापासून अभिनंदन करतो. देवव्रत जी, तुमचे मनापासून अभिनंदन, तुमची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनो अशी आशा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी लिहिले.

    महाराष्ट्र के 19 वर्षीय युवा वैदिक साधक श्री देवव्रत महेश रेखे जी ने अद्वितीय साधना और अद्भुत स्मरण शक्ति से 2000 वैदिक मंत्रों को कंठस्थ करते हुए जो अभूतपूर्व उपलब्धि अर्जित की है, वह पूरे आध्यात्मिक जगत के लिए प्रेरणा का नव-दीप है।

    शुक्ल यजुर्वेद की माध्यन्दिन शाखा के… pic.twitter.com/7QseMbDnuW

    — Yogi Adityanath (@myogiadityanath) December 2, 2025

  • 03 Dec 2025 11:35 AM (IST)

    03 Dec 2025 11:35 AM (IST)

    प्रदूषणासारख्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली पाहिजे: प्रियंका गांधी वड्रा

    काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या, "प्रदूषणासारख्या इतर मुद्द्यांवरही आपण चर्चा केली पाहिजे. आपण इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली पाहिजे."

    #WATCH | दिल्ली: कांग्रेस सांसद प्रियंका गांधी वाड्रा ने कहा, "हमें प्रदूषण जैसी दूसरी चीज़ों पर भी चर्चा करनी चाहिए। हमें कई दूसरे ज़रूरी मुद्दों पर भी चर्चा करनी चाहिए।" pic.twitter.com/VVEgH6o9oK

    — ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2025

  • 03 Dec 2025 11:25 AM (IST)

    03 Dec 2025 11:25 AM (IST)

    प्राजक्ता गायकवाडची नंदीवरुन एन्ट्री होतीये ट्रोल

    अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिच्या रिसेप्शनच्या एन्ट्रीची सर्वत्र चर्चा होत आहे. प्राजक्ता आणि तिचा पती शंभूराज यांनी भल्या मोठ्या नंदीवरुन एन्ट्री केली. मात्र यावेळी महादेवाचे रुप घेतलेल्या व्यक्तीला खाली नाचवल्यामुळे जोरदार ट्रोल केले जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

  • 03 Dec 2025 11:15 AM (IST)

    03 Dec 2025 11:15 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल पुढे ढकल्याने नाराजी

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडत आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार काल (दि.02 डिसेंबर) रोजी मतदान आणि 03 डिसेंबर रोजी निकाल लागणार होता. मात्र आता येत्या 21 तारखेला मतमोजणी होणार असल्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त होत आहे.

  • 03 Dec 2025 11:05 AM (IST)

    03 Dec 2025 11:05 AM (IST)

    भारतीय हॉकीपटू ‘मेजर ध्यानचंद यांची पुण्यतिथी

    भारतीय हॉकी क्षेत्रातील एक उत्तुंग खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. त्यांच्या महान योगदानाबद्दल, त्यांचा जन्मदिवस, २९ ऑगस्ट, भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1989 मध्ये ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचे निधन झाले.

  • 03 Dec 2025 09:50 AM (IST)

    03 Dec 2025 09:50 AM (IST)

    125cc सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढली; बजाज पल्सर NS125 विरुद्ध Hero Xtreme 125R

    भारतीय दुचाकी बाजारपेठेत 125cc सेगमेंट कायम लोकप्रिय असून उत्कृष्ट मायलेज, कमी देखभाल आणि स्टायलिश डिझाइनमुळे ग्राहकांकडून मोठी पसंती मिळते. याच सेगमेंटमध्ये आता बजाज पल्सर NS125 आणि Hero Xtreme 125R या दोन बाईकची जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.

    बजाजने अलीकडेच अद्ययावत वैशिष्ट्यांसह पल्सर NS125 लॉन्च केली आहे, तर Hero Xtreme 125R आधीच तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेली बाईक आहे. दोन्ही बाईक 125cc इंजिनसह येत असल्या तरी डिझाइन, वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्समध्ये लक्षणीय फरक दिसून येतो.

    पल्सर NS125 चे डिझाइन NS160 आणि NS200 प्रमाणेच स्पोर्टी आणि आक्रमक ठेवण्यात आले असून मस्क्युलर फ्यूल टँक, शार्प ग्राफिक्स आणि स्ट्रीटफायटर लुकचे हेडलॅम्प हे तिचे आकर्षण आहे. दुसरीकडे, Hero Xtreme 125R मध्ये कॉम्पॅक्ट फ्रंट प्रोफाइल, एलईडी हेडलाइट्स आणि आधुनिक डिझाइन भाषा असून तरुण ग्राहकांना लक्ष्य केले आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international sports crime weather reports business entertainment maharashtra election parliament breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
1

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा
2

Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

Breaking News Updates Today: अमेरिका-इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला, भारतीय विद्यार्थ्यांची सरकारकडे मदतीची मागणी
3

Breaking News Updates Today: अमेरिका-इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला, भारतीय विद्यार्थ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

Maharashtra Breaking News Updates Today: क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन
4

Maharashtra Breaking News Updates Today: क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.