Maharashtra Breaking News
24 Oct 2025 12:00 PM (IST)
आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी एका व्होल्वो बसला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही व्होल्वो बस ४० जणांना घेऊन हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती अशी माहिती सांगितली जात आहे.
24 Oct 2025 11:50 AM (IST)
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडेने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. डॉ. मुंडे या एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादामुळे चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
24 Oct 2025 11:40 AM (IST)
दिवाळीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये मदयविक्रीने उच्चांग गाठला आहे. दिवाळीत १५ दिवसांत दिल्लीकरांनी तब्बल ६०० कोटी रुपयांची दारू रिचवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही १५ टक्के वाढ आहे. यामुळे सर्वच चर्चा रंगली आङे.
24 Oct 2025 11:30 AM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. भंडारा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप नेते व मंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वलन्सवर टाकले आहेत. तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
24 Oct 2025 11:20 AM (IST)
बिहारमध्ये महागठबंधनने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्याबाबत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी टीका केली. ते म्हणाले की, "महागठबंधनला मुस्लिमांच्या कल्याणाची काळजी नाही. ते फक्त मतांसाठी आहेत. जर कोणी खरोखर मुस्लिम हिताचे पालनपोषण करत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. रेशन असो, घरे असो किंवा रस्ते असो, सर्व काही मोदी सरकारने दिले आहे. आज मुस्लिमांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे..." खेसारी लाल यादव यांनी रवी किशन यांच्यावरील टिप्पणीला उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाले ती, "तो माझा धाकटा भाऊ आहे आणि मी नेहमीच त्याचा आदर करेन. पण राजकारणात प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो, जो आदरास पात्र आहे. आसारामशी केलेली तुलना पूर्णपणे निराधार आहे."
24 Oct 2025 11:10 AM (IST)
भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढण्यासाठी आणि ख्रिश्चन सणांचा प्रभाव कमी करण्यासाठी वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच दसरा साजरा करण्यात आला. 1909 मध्ये आजच्या दिवशी सावरकर यांनी क्कीन्सरोड डॉल येथे दसरा सोहळ्याचे आयोजन केले. यामध्ये ब्रिटीश विद्यार्थ्यांना येण्यास मज्जाव घालण्यात आला. या सोहळ्यासाठी 100 हून अधिक परदेशामध्ये राहणारे भारतीय लोक जमले होते. हॉलमध्ये भारतीय पद्धतीने जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आल्या होत्या. धुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. मध्यभागी ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर ठळक अक्षरात वंदे मातरम असे लिहिण्यात आले होते. राष्ट्रगीताच्या स्वराने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली होती. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी खास या कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. अली अझीझ हे आफ्रिकेतील त्यांचे सहकारी सोबत होते.
24 Oct 2025 11:00 AM (IST)
जैन समुदायाच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा संघर्ष सुरूच राहील. जर माझी अडचण होत असेल तर मला पक्षातून काढून टाकावे, असे आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सत्ताधारी महायुती आघाडीत राहून धंगेकर यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. यामुळे भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
24 Oct 2025 10:50 AM (IST)
प्रोमोमध्ये, तान्या आणि नीलम त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमाल मधेच बोलण्यास सुरुवात करतो. तान्या म्हणते, “उगाच मध्ये बावळू नकोस. मी तुझ्याशी बोलत नाही आहे.” संतापलेला अमाल म्हणतो, “मी तिथे येईन, मला थांबव. तुला माझ्याशी भांडायचे आहे. चल, माझ्याशी भांड.” अमाल आणि तान्यामधील हा वाद पाहून कुटुंबातील इतर सदस्यांना धक्का बसला आहे. काही जण तर अमालशी सहमत असल्याचेही दिसून येत आहे.
24 Oct 2025 10:42 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारख्यान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयंत पाटील यांच्या कारखान्याचे नाव राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे होते. पण काल रात्री कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
24 Oct 2025 10:30 AM (IST)
लहान मुलांचे जग हे मस्तीच्या विश्वात रंगलेलं असतं. इथे ते कधी स्वत:च्या जीवीलाही धोका निर्माण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मुलीने खेळतीना चुकून आपल्या नाकात पेन्सिल घुसवली, ज्यानंतर तिच्या नाकपुड्या पूर्णपणे बंद झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. मुलीच्या आईने मुलीला पाहताच ती अस्वस्थ असल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिच्या नाकातून रक्तस्त्रावही होत होता. आईला भिती वाटली आणि तिने तातडीने मुलीला डाॅक्टरांकडे नेले. काळजीपूर्वक पाहताच तिच्या नाकात काहीतरी अडकल्याचे त्यांच्या ध्यानात आले, ज्यानंतर डाॅक्टरांनी फार सफाईने मुलीच्या नाकात अडकलेली पेन्सिल बाहेर काढली. ही घटना पालकांना लहान मुलांवर बारकाईने लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
24 Oct 2025 10:20 AM (IST)
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
24 Oct 2025 10:10 AM (IST)
केना द्विवेदीने लिहिले, “तू तो माणूस आहेस जो खरोखर महिलांचा आदर करतो, प्रत्येक स्त्रीला “मॅडम” म्हणून संबोधतो, तुझ्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करतो आणि जग तुझ्यासोबत वाईट झाले तरीही शांत राहतोस. जेव्हा मी नाराज होऊन विचारते, “तू काही बोलत का नाही?”, तेव्हाही तू मला नेहमीच आठवण करून देतो की कधीकधी, वेळ सर्वकाही बरे करते आणि शांतता सर्वात जास्त बोलते.” असे लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
24 Oct 2025 10:03 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप नावाचा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे युजर्स ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन एक्सेस करू शकणार आहेत. हा फ्री फायर मॅक्समधील एक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी असलेली डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत आणि स्पिन करावं लागणर आहे. प्रत्येक स्पिनेवेळी तुम्हाला या ईव्हेंटमधील एक रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. 7 वेळा स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना गेममध्ये मिळणार ग्रँड प्राईज क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
24 Oct 2025 10:02 AM (IST)
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने २० प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रात्री उशिरा घडली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसची दुचाकीशी टक्कर झाली आणि त्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. आग इतकी भयानक होती की, प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, अनेक प्रवासी झोपेतच अडकले आणि कोळसा झाले.
24 Oct 2025 09:59 AM (IST)
दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर मधील मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दिनांक 22 ला सकाळी दाखल केले होते. मात्र प्रसूती दरम्यान केवळ एक परिचरिका उपलब्ध होती.त्या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बाल मृत्यू घडल्याने मोखाडा तालुक्यात खळबल उडाली आहे आणि आरोग्य यंत्रनेचे लक्तरे वेशिवर टांगली गेली आहेत. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
24 Oct 2025 09:53 AM (IST)
२०१६ च्या रोमँटिक ड्रामा “सनम तेरी कसम” द्वारे हर्षवर्धन राणेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या दिवाळीत, तो सोनम बाजवासोबत “एक दीवाने की दीवानीयत” द्वारे मोठ्या पडद्यावर परतला. मनोरंजक गोष्ट म्हणजे, या चित्रपटाला आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या “थामा” कडून जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली आहे, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. मोठ्या आणि जोरदार मार्केटिंग असलेल्या चित्रपटासोबत स्क्रीन स्पेस शेअर करूनही, “एक दीवाने की दीवानीयत” देखील चांगली कमाई करत आहे. दमदार ओपनिंगनंतर, त्याने दुसऱ्या दिवशीही चांगले कलेक्शन केले. “एक दीवाने की दीवानीयत”ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे जाणून घेऊयात.
24 Oct 2025 09:48 AM (IST)
जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि संकेतांचा विचार केला तर आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक दिशेने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,०२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४६ अंकांनी जास्त होता.
24 Oct 2025 09:42 AM (IST)
भारतात 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,507 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,464 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,380 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,800 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 158.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,58,900 रुपये होता.
24 Oct 2025 09:35 AM (IST)
कुरनूल : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादहून बंगळुरूला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
24 Oct 2025 09:25 AM (IST)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील घोटाळा उघडकीस आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. महिला आणि बालविकास विभागातील सूत्रांचा हवाला देत काही अहवालात १२४३१ पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.
24 Oct 2025 09:15 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधील १८ वर्षीय कॅडेटचा जलतरण सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव कॅडेट आदित्य डी. यादव असे असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नियमित प्रशिक्षणादरम्यान आदित्य यादव जलतरण सराव करत असताना बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
24 Oct 2025 09:10 AM (IST)
राज्यातून मान्सून माघारी गेल्यानंतरही पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
24 Oct 2025 09:04 AM (IST)
पुढील वर्षी भारताच्या आर्थिक चित्रात मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी तयारी सुरू केली असून, देशातील लोकांचे उत्पन्न आणि खर्च मोजण्याची पद्धत आता नव्याने आखली जाणार आहे. या बदलाचा एक भाग म्हणून देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब दर्शवणारे प्रमुख आकडे — जसे की जीडीपी, महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक — अद्यतनित केले जाणार आहेत. यासोबतच, अर्थव्यवस्थेतील वेगाने वाढणाऱ्या सेवा क्षेत्राच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक नवीन निर्देशांक देखील सादर करण्याची तयारी सुरू आहे.
24 Oct 2025 09:00 AM (IST)
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश करत मोठी झेप घेतली आहे. नवी मुंबईतील २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर डकवर्थ-लुईस नियमांनुसार ५३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने सेमीफायनलसाठी पात्र ठरणारी चौथी आणि शेवटची टीम म्हणून आपले स्थान पक्कं केले. भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघांनीही उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमध्ये याच तीन संघांकडून भारताला सलग पराभवांचा सामना करावा लागला होता. आता क्रीडाप्रेमींच्या मनात एकच प्रश्न आहे — सेमीफायनलमध्ये भारताची भिडंत कोणाशी होणार? हे निश्चित होताच पुन्हा एकदा रोमांचक लढतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Marathi Breaking news live updates- तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर आता ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून, “राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही” असा इशारा दिला होता. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात रंगली आहे.






