Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार
18 Oct 2025 03:00 PM (IST)
राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मत महिलेच्या गळ्याला रुमाल बांधलेला होत आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मृत महिलेचं नाव सपना मीना आहे. सपनाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून यासंदर्भात तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी याच प्रकरणातील आरोपीचा शोध ८ दिवसात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
18 Oct 2025 02:50 PM (IST)
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर यांच्यासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. हे प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं लवकरच मुंबईच्या पाली हिल परिसरातील त्यांच्या नव्या आलिशान बंगल्यात वास्तव्याला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घराचे बांधकाम सुरू होते, आणि आता अखेर या घराचा गृहप्रवेश दिवाळीत होणार असल्याची माहिती या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. पाली हिल परिसरात उभा असलेला हा सहा मजली बंगला सुमारे २५० कोटी रुपये किंमतीचा आहे असे सांगितले जाते.
18 Oct 2025 02:40 PM (IST)
“जातगणनेची मागणी ही नवीन नाही, गेली ३५ वर्षे आम्ही ती सातत्याने करत आहोत. दिल्लीतील रामलीला मैदानावरूनही मी जातगणनेची मागणी केली होती.” अशा प्रतिक्रीया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना,छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जातगणनेच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
18 Oct 2025 02:30 PM (IST)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे व्हिडिओ गेल्या काही काळाता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कधीही कुठेही लोक आजकाल भांडणे करत आहे. सामान्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या लोकांची भांडणे पाहायला मिळत आहे. नुकतेच वंदे भारताच्या कर्मचाऱ्यांच्या भांडणाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी सरकारी कर्मचारी असे असतील तर लोकांना योग्य सुविधा कशा मिळणार असे म्हटले आहे.
18 Oct 2025 02:20 PM (IST)
राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एक नोव्हेंबरपासून राजधानीत प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ‘एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन’ने (CAQM) शुक्रवारी हा निर्णय घेतला. सर्व सीमा बिंदूंवर कडक देखरेखीचे आदेश दिले जेणेकरून कोणतेही वाहन नियमांचे उल्लंघन करणार नाही याची खात्री करता येईल.
18 Oct 2025 02:10 PM (IST)
शिरुर तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने गावातील एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
18 Oct 2025 02:00 PM (IST)
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम शनिवार (दि.१८) सुरू करण्यात आले. या कामासाठी नियुक्त प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रक्रियेसाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
18 Oct 2025 01:50 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफ संदर्भात आणखी एक आदेश जारी केला आहे. १ नोव्हेंबरपासून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या मध्यम आणि जड ट्रक आणि त्यांच्या सुट्या भागांवर २५% कर लागू करण्याचा आदेश दिला आहे. तसेच बसेसवरही १०% शुल्क (Tarrif) लागू केले जाणार आहे.
18 Oct 2025 01:45 PM (IST)
भारतीय रेल्वेने यावर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवून प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य दिले आहे. या गाड्या प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत करतील, विशेषतः जेव्हा रस्ते वाहतूक वाढते. सणासुदीच्या काळात गाड्यांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी, रेल्वे विविध मार्गांवर अनेक गाड्या चालवत आहे.
18 Oct 2025 01:40 PM (IST)
“साधु संत येती घरा तोची दिवळी दसरा” अशी ओळ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहे. यावरुन हे सिद्ध होतं की दिवाळीचा सण हा अनेक वर्ष जुना आहे. संत तुकाराम महाराजअसो किंवा त्यांच्या पुढील पिढी म्हणजे छत्रपती शिवजी महाराज असो या काळात मुघल, डच यांनी अनोनात रयतेवर अमानुष अत्याचार केले. मात्र असं असलं तरी छत्रपती शिवरायांच्या काळात रयतेला सणवार साजरं करण्यासाठी परकीय सत्तांकडून अभय मिळालं होतं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दिवाळी फक्त सणाचा एक भाग नव्हता तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या आनंदाचा आणि पराक्रमाचा उत्सव यावेळी केला जात असे.
18 Oct 2025 01:37 PM (IST)
शिरुर तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने गावातील एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा प्रदीप रणदिवे (वय ६०, रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) या आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर दुचाकी नेण्यासाठी डबर टाकून उंचवटा तयार करत होत्या. त्याचवेळी उपसरपंच संगीता शांताराम सावंत (रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक) या तेथे आल्या आणि त्यांनी प्रज्ञा रणदिवे यांना “येथे डबर टाकू नका” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान, प्रज्ञा रणदिवे या घरात गेल्यानंतर उपसरपंच सावंत यांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पुन्हा शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत प्रज्ञा रणदिवे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून उपसरपंच संगीता शांताराम सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे करत आहेत.
18 Oct 2025 01:30 PM (IST)
पुण्यात जैन समाजाच्या ट्रस्टच्या साडेचार हजार कोटी जागेचे जे प्रकरण समोर आले आहे ते कोण लोक आहेत? ते सगळे बाहेरचे लोक आहेत. साडेतीन ते चार हजार कोटींचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्री आणि नागपूर पर्यंत गेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढेल. जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. एका ट्रस्टच्या भूखंडाचा घोटाळा हा किती गंभीर आहे. तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकलं आहे, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले आहेत, मुख्यमंत्री यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे. हे लवकरच कळणार आहे. ” असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
18 Oct 2025 01:23 PM (IST)
ऋषभ शेट्टी आणि होम्बले फिल्म्स यांचा ‘कांतारा: चैप्टर 1’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्याच दिवशी त्याने यशाचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. संपूर्ण देशभरातून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिक्रियेनंतर हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही मनावर राज्य करत आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘कांतारा: चैप्टर 1’ सतत विक्रम मोडत आहे. या यशानंतर दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी बिहारमधील पटना येथे स्थित मुंडेश्वरी मंदिरात जाऊन चित्रपटाच्या यशाबद्दल देवाचे आभार मानले.
18 Oct 2025 10:55 AM (IST)
JioFinance ने दिवाळीच्या सणानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर सुरु केली आहे. जिओनी सुरू केलेल्या ऑफरला Jio Gold 24k Days असं नाव देण्यात आला आहे. कंपनी या ऑफरअंतर्गत जिओ फायनान्स आणि माय जिओ ॲपवरून डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड देणार आहे. जिओने घोषणा केली आहे की, कंपनी या ग्राहकांना दोन टक्के एक्स्ट्रा गोल्ड ऑफर करणार आहे. त्यामुळे कंपनीने सुरू केलेली ही ऑफर ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
18 Oct 2025 10:42 AM (IST)
रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना सांगितले की, त्यांचा एकत्रित नफा वार्षिक आधारावर ₹१६,५६३ कोटींवरून ₹१८,१६५ कोटींवर पोहोचला आहे. तथापि, त्यांचा एकत्रित नफा तिमाही आधारावर ₹२६,९९४ कोटींवरून ₹१८,१६५ कोटींवर पोहोचला आहे. महसूल ₹२.३२ लाख कोटींवरून ₹२.५५ लाख कोटींवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ₹२.३२ लाख कोटींवरून ₹२.५५ लाख कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर ₹३९,०५८ कोटींवरून ₹४५,८८५ कोटींवर पोहोचला आहे. वार्षिक आधारावर त्यांचे EBITDA मार्जिन १६.९% वरून १८% वर पोहोचले आहे.
18 Oct 2025 10:36 AM (IST)
उरगुनला परतल्यानंतर, एका मेळाव्यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.” नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० तिरंगी मालिका होणार होती. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आता या स्पर्धेतून माघार घेतली आहे. याची घोषणा करताना एसीबीने म्हटले आहे की, “या दुःखद घटनेनंतर आणि पीडितांना आदर म्हणून, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या पाकिस्तानसोबतच्या आगामी टी-२० तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
18 Oct 2025 10:36 AM (IST)
पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ आज एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अमृतसरहून सहरसा येथे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अंबालापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरहिंद स्थानकाजवळ ट्रेन येताच ही घटना घडली. प्रवाशांना एका रेल्वे डब्यातून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. चालकाने सतर्क राहून तातडीने ट्रेन थांबवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट हे संभाव्य कारण मानले जात आहे.
18 Oct 2025 10:28 AM (IST)
अकोला शहरात दोन गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली. यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोन गट आमने- सामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास पोलिसांनी बैदपुरा येथील गोमास विक्रीच्या संशयित दुकानावर छापा टाकला. या कारवाईनंतर परिसरात दोन गट जमा झाले आणि त्यांच्यात तणाव वाढला. या गोंधळात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच , दुसर्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
18 Oct 2025 10:21 AM (IST)
भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून पाच जणांची फसवणूक करण्यात आली. या पाच जणांना सेंट्रल रेल्वेचे नोकरी लागल्याचे बनावट जॉईन पत्र देऊन नाशिकरोडच्या दोघांनी सुमारे 50 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फसवणूक झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
18 Oct 2025 10:14 AM (IST)
इसरोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीचे अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार [apps.shar.gov.in](https://apps.shar.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आहात तर निश्चित करण्यात आलेली मुदत तपासून घेण्यात यावी.
18 Oct 2025 09:52 AM (IST)
Bigg Boss 19 Promo : बिग बॉसचा हा आठवडा घरातील सदस्यांसाठी खूपच तणावपूर्ण होता. अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांच्यातील भांडणाने सर्वांनाच धक्का बसला. आता सलमान खान वीकेंड का वारमध्ये अमाल मलिकच्या कृतीबद्दल त्याला फटकारणार आहे. एवढेच नाही तर अमाल मलिकचे वडील देखील सलमानसोबत स्टेजवर दिसतील. ते त्यांच्या मुलाला सल्ला देण्यासाठी देखील येतील. वीकेंड का वारच्या नवीन प्रोमोमध्ये, अमाल मलिकचे वडील डब्बू मलिक त्यांच्या मुलावर रागावलेले आणि भावनिक झालेले दिसत आहेत.
18 Oct 2025 09:42 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी परिसरातीलच तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना नागसेननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता घडली आहे. जखमी तरुणाचा नाव अक्षय शिरसाट (वय २८) असे आहे.
18 Oct 2025 09:32 AM (IST)
भारतात 18 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,278 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,171 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,959 रुपये आहे. भारतात 18 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,710 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,780 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,590 रुपये आहे. भारतात आज 18 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 184.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,84,900 रुपये आहे.
18 Oct 2025 09:22 AM (IST)
दोन दिवसांच्या संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली. पाकिस्तानने आता युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे आणि अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे, ज्यामध्ये तीन अफगाण क्रिकेटपटू ठार झाले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतः सोशल मीडिया पोस्टमध्ये या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खेळाडूंच्या मृत्यूने आता क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. या तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.
18 Oct 2025 09:07 AM (IST)
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणताना दिसत आहेत. या दोन्ही देशांत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. असे असताना आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भूमीवर हवाई हल्ला केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने क्रिकेटपट्टूंवर हवेतून बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये तीन अफगाण खेळाडू मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.
18 Oct 2025 09:05 AM (IST)
गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन दिवाळीत देखील काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
18 Oct 2025 09:01 AM (IST)
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणताना दिसत आहेत. या दोन्ही देशांत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. असे असताना आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भूमीवर हवाई हल्ला केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने क्रिकेटपट्टूंवर हवेतून बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये तीन अफगाण खेळाडू मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.
18 Oct 2025 08:45 AM (IST)
मुंबई: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल. तर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. 2026-27 पासून पुढे इयत्ता चौथी इयत्ता सातवी मध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
18 Oct 2025 08:38 AM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा जनभागीदारी अभियान मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि ‘आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्हा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
18 Oct 2025 07:54 AM (IST)
कालच्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
18 Oct 2025 07:37 AM (IST)
India Weather Update: गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन दिवाळीत देखील काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज कोणता इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
18 Oct 2025 07:30 AM (IST)
सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जागतिक आर्थिक आव्हाने आणि किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेता लोक गुंतवणूकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. सध्या गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. सोन्याची नाणी आणि बार यांची विक्री जास्त असण्याची अपेक्षा आहे, तसेच हलक्या दिसणाऱ्या दागिन्यांची विक्रीही जास्त असेल.
18 Oct 2025 07:16 AM (IST)
पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक फक्त त्या कारच्या मायलेज आणि फीचर्सकडे लक्ष देत होते. मात्र, आजही स्थिती बदलली आहे. आजच्या ग्राहकाला त्याच्या कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स देखील हवे आहेत. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या नवीन कारमध्ये स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर म्हणून एअरबॅग्स समाविष्ट करत आहे. त्यात आता GST कमी झाल्यानंतर, भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतील अनेक बजेट कार आणखी परवडणाऱ्या झाल्या आहेत.
18 Oct 2025 07:16 AM (IST)
राज्यात पुन्हा एकदा ओबीसी-मराठा वाद वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच सरकारने हैदराबाद गॅझेटचा देखील जीआर काढला आहे. मात्र ओबीसी समाजाने याला विरोध केला आहे. काल झालेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Marathi Breaking news live updates: राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. काल बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. यामधून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्याला जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राज्यात आज पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.