(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय जाहिरात इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध जाहिरात गुरू पियुष पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ यशस्वी जाहिरात उद्योगाचे नेतृत्व केले आहे. गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. पियुष यांनी ओगिल्वी इंडियामध्ये बराच काळ काम केले आणि १९८२ मध्ये ते सामील झाले. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी इंग्रजी जाहिरातींमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच त्यांना नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.
911 Nashville फेम अभिनेत्रीचे वयाच्या २३ व्या वर्षी निधन, १० वर्षांपासून ‘या’ आजाराशी सुरु होती झुंज
उद्योजक सोहेल सेठ यांनी पांडे यांच्या निधनाची पुष्टी केली. त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि एका पोस्टमध्ये लिहिले की, त्यांच्या प्रिय मित्राच्या, पियुष पांडेसारख्या प्रतिभावान व्यक्तीच्या निधनाने त्यांना खूप दुःख झाले आहे आणि त्यांचे मन दुखावले आहे. त्यांच्या निधनाने ते खूप निराश झाले आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, भारताने केवळ एक महान जाहिरात उद्योजकच नाही तर एक खरा देशभक्त आणि खरोखरच एक अद्भुत माणूसही गमावला आहे.
पियुष पांडे यांचं जयपूर होत प्रेम
पियुष पांडे हे मूळचे राजस्थानातील जयपूरचे होते. त्यांचा जन्म १९५५ मध्ये झाला. ते नऊ भावंडांपैकी एक होते. त्यांना सात बहिणी आणि दोन भाऊ होते. पियुष यांचे वडील बँकेत काम करत होते. पियुष यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळणार घालवली. यानंतर त्यांनी एशियन पेंट्ससाठी “हर खुशी मे रंग लाये”, कॅडबरीसाठी “कुछ खास है” आणि फेविकॉल आणि हच सारख्या ब्रँडसाठी जाहिराती तयार करण्यास सुरुवात केली.
‘ग्रेटर कलेश फॅमिली ड्रामा’ मधून मराठी अभिनेत्री अक्षया नाईकच बॉलीवूड मध्ये पदार्पण!
त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी लिहिली घोषणा
पियुष पांडे यांनी अनेक राजकीय घोषणाही लिहिल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी प्रचार घोषवाक्यही लिहिले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सरकारसाठी “अबकी बार मोदी सरकार” हे घोषवाक्य लिहिले. भारतीय जाहिरातींच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठीही ते ओळखले जातात. त्यांनी अनेक मोहिमा तयार केल्या ज्या लोकांना भावल्या. आता पियुष पांडे यांच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि मोठमोठे कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.






