Photo Credit- Social Media संतोष देशमुखांच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेने थेट बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आता या घटनेला जवळपास महीना उलटून गेला आहे. आता पप्रकरणात आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. तर वाल्मीक कराडवर देखील आरोप केले जात आहे. तसेच वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 1 4 जानेवारी रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. त्याच्यावर हत्येचे कलम 302 लावावे. नाहीतर हे आरोपी उद्या माझी हत्या करतील. वाल्मीक कराडवर मोक्का लागला नाही तर आम्ही उद्यापासून टॉवरवर जाऊन आंदोलन करणार आहोत, असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान वाल्मीक कराडवर मोक्का न लावल्यास सर्व ग्रामस्थ मकर संक्रांतीपासून अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला जाळून घेत आत्मदहन आंदोलन करणार आहे. असा सूचक इशारा ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
संतोष देशमुखानंतर परळीत आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू
केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अद्याप ताजे असून बीड आणि परळी जिल्ह्यांत तणावग्रस्त परिस्थिती आहे. अशातच परळी तालुक्यातून आणखी एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. परळी तालुक्यात मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एका टिप्परने दुचाकीस्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. सौंदाना गावाचे सरपंच असलेल्या अभिमन्यू क्षीरसागर यांच्या या अपघाती मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा खरंच अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सध्या टिप्पर चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने आधीच बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापले आहे. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. लोकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा: Sarpanch Accident News : संतोष देशमुखानंतर परळीत आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ गुन्हा दाखल; पण वाल्मिक कराडला दिलासा
देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मात्र मकोका लावण्यात आलेला नाही. तपास यंत्रणांनी स्पष्ट केले की कराड हा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नाही. तसेच या हत्येशी कराडचा कोणताही थेट संबंध असल्याचे सिद्ध करता आलेले नाही.