नागपूर : सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे, तर आजचा नववा दिवस आहे. उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं, उद्या सूप वाजणार आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळं सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे, त्यामुळं राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक आज सायंकाळी ६.०० वाजता, दोन्ही सभागृहाच्या कामकाजानंतर होणार आहे.
[read_also content=”31 डिसेंबर साजरा करताय? मग बनावट दारुपासून सावधान… पोलिसांची आहे करडी नजर; वाचा काय आहे कारण? https://www.navarashtra.com/maharashtra/celebrating-year-ending-then-beware-of-fake-liquor-the-police-have-a-gray-eye-read-what-is-the-reason-357732.html”]
दरम्यान, मंत्रिमंडळ सभागृह, पहिला मजला, विधान भवन, नागपूर येथे बैठक होणार असून, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच संबंधित अधिकारी ह्या बैठकीला हजर राहणार आहेत. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, सध्या सीमावाद प्रश्नावर ठराव मांडण्यात आला आहे, तिथल्या बांधवासाठी सरकारनं योजना जाहीर केल्या आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची, यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच शेतकरी व राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असून, मुख्यमंत्री काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.