मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागाच्या वतीने आज शनिवारसह रविवार रात्री विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला आहे. भायखळा-माटुंगा या अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाणार आहे. ठाणे येथून रात्री १०.५८ ते ११.१५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
डाउन मेल/एक्सप्रेस ट्रेन १२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस (Janshatabdi Express) भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवली आहे. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुहेरी थांबा घेईल आणि रोहा येथे निर्धारित वेळेपेक्षा १० ते १२ मिनिटे उशिराने पोहणार आहे.
अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (Amrutsar Express), भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस (Konark Express), हावडा -मुंबई मेल (Hawdah Express) माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.
अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द
पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.