संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया (फोटो-सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
बीड: सध्या बीडमधील सरपपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात मुख्य संशय असणारा वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याल केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडची चौकशी सुरू आहे. मात्र वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान वाल्मीक कराडला कोठडी झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टिवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे. मुंडे म्हणाले, “विजय वडेट्टिवार हे बोलण्यात हुशार आहेत. बीडची घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेतील दोषीना असतील त्यांना फाशी व्हावी हीच आमची भूमिका आहे. या घटनेची माझा काहीच संबंध नाही. सध्या कोणाचाही राजीनामा मागायचा असे सुरू आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय असेल त्याबाबत अजित पवार निर्णय घेतील. विजय वडेट्टिवार यांच्या टीकेवर देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे. मुंडे म्हणाले, “विजय वडेट्टिवार हे बोलण्यात फार हुशार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना फासावर चढवणे हाच आमचा उद्देश आहे. या प्रकरणात मी फास्ट ट्रॅकची मागणी पहिल्यांदा केली होती.”
वाल्मिक कराडनंतर आता ‘हा’ आरोपी सीआयडीच्या निशाण्यावर
आरोपी सुदर्शन घुलेचा सीआयडीने तपास सुरू केला आहे. सुदर्शन घुले हादेखील या हत्याकांडातला मुख्य आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदारही पसार झाले आहेत. वाल्मिक कराडसोबतच त्याच्या दोन साथीदारांचा सीआयडीकडून गेल्या 22 दिवसांपासून त्याचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर आता सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर आहेच. घुले सापडल्यास या प्रकरणातील आणखी काही खुलासेही समोर येतील, अशी शक्यता आहे.
22 दिवसांनी शरण आलेल्या वाल्मीकचा ‘या’ तीन राज्यांमध्ये मोठा प्रवास
तब्बल 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा शरण आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मीक कराड शरण आला मात्र 22 दिवस तो कुठे होता. पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तो नक्की कुठे होता याबद्दल काही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडनंतर आता ‘हा’ आरोपी सीआयडीच्या निशाण्यावर
सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे समोर येत आहे. मग तो पुण्यात आला. या तीनही राज्यात स्वतःच्या कारने तो फिरला असे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो काल पुण्यात स्वतःच्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये गेला आणि शरण आला. आता संतोष देशमुख प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र वाल्मीक कराड हा शरण आल्याने त्याची संपत्ती जप्त करूनये अशी मागणी वाल्मीक कराडचे वकील कोर्टसमोर करण्याची शक्यता आहे.