धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर... (फोटो- सोशल मिडिया)
शिर्डी: शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यकक्ष, मंत्री, आमदार उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त केल्यानंतर आता येणारया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच पक्षाची पुढील वाटचाल याबाबत या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
शिर्डी येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिबिरातून बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “मी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात सोबत उभा राहिलो. अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालो. संपूर्ण राज्य फिरलो. मात्र आता बीड जिल्ह्यातील एक हत्या प्रकरणाच्या माध्यमातून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे नेते माझ्यावर टीका करत आहेत, याचे वाईट वाटते.”
पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “माझ्या कठीण काळामध्ये देखील संपूर्ण पक्ष आणि अजित पवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आज मला निराधार आणि बिनबुडाचे कितीही आणि कसले आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरी काही फायदा होणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे. अजित पवारांनी बीडचे पालकत्व स्वीकारले याचा आनंद आहे. बीड जिल्ह्यात झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्दैवी आणि संतापजनक आहे.”
पालकमंत्रीपदाचा पत्ता कट होताच मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांना बीड व कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले नाही. त्यावरून आता मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये स्थान न मिळलयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हंटले आहे ते पाहुयात.
“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025
त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.”