तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा पुन्हा कहर
नागपूर : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजांची चिंता वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना घडल्या आहेत. यामध्ये आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अवकाळी पावसाबाबत झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली आहे.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाबाबत राज्य सरकारने बैठक घेतली. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री हे खरीपची बैठक घेत आहेत. खताचा तुटवडा कृषी साहित्य विक्री दुकानात कुठे तुटवडा आहे का किंवा शेतकऱ्यांना कोणती अडचण असतील याचा एकूण आढावा घेणे सुरू आहे. विकेल ते पिकेल ही संकल्पना राबवून महाराष्ट्रातील उत्पादन कसा वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण कसा करता येईल. पिक विमा योजनेसह सर्व योजनेचा आढावा घेण्यात आला,” अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “सध्या मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची योजना आपण आणली आहे. पिक विमा योजना पूर्वीप्रमाणे करून त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी आढावा घेतला. तेव्हा लक्षात आलं की सुमारे दहा हजार पाचशे कोटीचा निधी विमा कंपनीकडे गेलेला आहे. आता पिक विम्याच्या स्वरूपात जाणारे सर्व पैसे यातील बहुतांश रक्कम भांडवली गुंतवणुकीची योजना केली आहे. आणि पहिला अर्ज करेल त्याला पहिली मंजुरी अशी प्राधान्याची योजना तयार करून शेतीमध्ये क्रांती कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे,” अशी ग्वाही राज्यमंत्री आशिष जसस्वाल यांनी दिली आहे.
पंचनामा करून नियमानुसार मदत
राज्यामध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात मोठे नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत आशिष जसस्वाल यांना विचारले असता ते म्हणाले की, “परवा सुद्धा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. Sdrf ndrf चे निकष आहेत. त्यानुसार पंचनामा करून नियमानुसार जे मदत आहे ते करत असतो,” अशी माहिती ग्वाही राज्यमंत्री आशिष जसस्वाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जोरदार पाऊस
अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी मुंबईतील काही भागांत पाऊस होताना दिसत आहे. कुर्ला, घाटकोपर या भागांमध्ये पाऊस होत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे.