मोर्शी : मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूचे (Swine flu) रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील वरुड – मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार भुयार यांच्यावर गेल्या ६ दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या ६ दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार घेत असलेल्या आमदार भुयार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) झाला आहे. व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. तसेच सर्वांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच आमदार देवेंद्र भुयार यांनीही जिल्ह्यातील सततच्या व मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. आमदार देवेंद्र भुयार यांच्याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना (Swine flu preventive measures) सुरू आहेत.
– डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी
स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. जुलै महिन्यात राज्यात आतापर्यंत २३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे जिल्हा आरोग्य विभागाचे (District Health Department) म्हणणे आहे.