अमरावती : शहराच्या सौंदर्यात भर घालून शहराचे वैभव वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द असणारे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या संकल्पनेतून (‘बेटी बचाव-बेटी पढाव) लेक वाचवा – लेक शिकवा’ (Save Girl – Teach Girl ) असा संदेश देणारे ३० लक्ष रुपयांच्या निधीतून (30 lakhs of fund) साकारण्यात आलेल्या राजपेठ पोलीस स्टेशन (Rajpeth Police Station) जवळील आकर्षक शिल्पाकृतीचे अनावरण (Unveiling of the sculpture) संपन्न झाले.
शहरातील चौकाचौकात अशी आकर्षक शिल्पे उभारून शहराच्या सौंदर्यात भर घालणे व शहरातील नागरिकांना आनंदात्मक प्रेरणा मिळावी, यासाठी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी संदर्भाचा वारसा जोपासण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार रवी राणा यांनी केले.
नाविण्यपूर्ण संकल्पना राबवून शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचा संकल्प करणारे आमदार रवी राणा यांच्या या संकल्पनेचे नागरिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जयंतराव वानखडे, सचिन भेंडे,आशिष गावंडे, अजय मोरया, विनोद गुहे,अनिल मिश्रा सुरज मिश्रा, अजय जैस्वाल, राकेश बडगुजर, नाना सावरकर, सुनिता सावरकर, वैभव वानखड, बाळू इंगोल, वीरेंद्र उपाध्ये महेश मूलचंदानी, विशाल निघोट, अश्विन उके, अवि काळे ,अजय बोबडे, खुश उपाध्ये, राजेश दातखोरे, मनोज ढवळे, शुभम उंबरकर, राहुल काळे, योगेश बनसोड, नितीन मस्के आदींची उपस्थिती होती.