सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती, महाविकास आघाडी,मनसे आणि अन्य पक्षाच्या सभा, मेळावे, रॅली काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करित आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसबा मतदार संघात सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. फडणविसांच्या टीकेला धंगेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मला एक नाटक बोलले, त्यांनी माझी सगळी नाटकं बघितली, पोर्श कार प्रकरणात मी घेतलेल्या भुमिकामुळे आरोपीला शिक्षा झाली, आणि यांचे आमदार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, याला जर देवेंद्र फडणवीस नाटक समजत असतील तर हे चंचल नाटक आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पण मी भूमिका घेतली ते जरी नाटक वाटत असेल तर चांगला नाटक आहे. देवेंद्र फडणवीस पुण्याच्या विकाससंदर्भात काही बोलले नाहीत, त्यांनी फक्त माझ्यावर टीका केली. गुन्हेगारी वाढली त्यासंदर्भात देखील फडणवीस काही बोलले नाहीत, युवा तरुण बेरोजगार झाले आहेत त्यासंदर्भात देखील काय देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत. अशी टीका धंगेकरांनी फडणवीस यांच्यावर केली.
पुढे बोलताना धंगेकर म्हणाले, निवडणुका येतील जातील पण पुणे सुरक्षित राहील पाहिजे हे ही आमची भूमिका आहे. आपण 70 वर्षात पाहिलं आहे काँग्रेसने सर्व समावेशक राजकारण केलं आहे, पण या पाच वर्षात जातीवर राजकारण केलं जात आहे. तुम्ही पाहिलं तर माझा निधीच पळवला, मी अनेक विकासकाम कसब्यात करणार होतो, पण निधी काढून नेल्यावर काम कसा करणार, असंही यावेळी धंगेकरांनी सांगितलं.
हे सुद्धा वाचा : “सत्कारापेक्षा पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात”; जयंत पाटलांच्या तत्परतेने उपस्थितांची जिंकली मने
दीपक माणकर यांच्याबद्दल बोलतांना धंगेकर म्हणाले की, दीपक मानकर यांचा इतिहास मला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी आधी स्वतःकडे बघावं, कोणत्या बिल्डरने किती खंडणी घेतली, जेलला का जावं लागलं, मी बोलायला लागलो तर सगळं काढेल, ही दुसरी वेळ आहे. तुम्ही जेलमध्ये कशे राहिला, ससून मध्ये कशे रडला, त्यामुळे त्यांनी जपून बोलव, त्यांची सत्ता जाणार आहे. त्यांनी बोलू नये नाहीतर धंगेकर हे उत्तर द्याला तयार आहे. असा इशारा धंगेकरांनी दिला.