चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर वारंवार पोटात वेदना होणे, खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन न होणे, गॅस इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
Fatty Liver च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पेयांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावी. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. यासोबतच लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी करून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
लिव्हरच्या आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी अतिशय गुणकारी ठरते. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल असतात, ज्यामुळे लिव्हर फायब्रोसिसचा धोका कमी होतो.
पोषक घटकांनी समृद्ध असलेला बीटचा रस शरीर सुधारण्यासाठी मदत करतो. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटालेन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित बीटचा रस प्यावा.
पालक, सेलरी आणि इतर पोषण घटकांपासून बनवलेला ग्रीन ज्यूस शरीरासाठी अतिशय प्रभावी आहे. रोज सकाळी उठल्यानंतर ग्रीन ज्यूस प्यावा. यामुळे शरीर डिटॉक्स होते.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. त्यामुळे शरीर स्वच्छ करण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे.