इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आमदार सुनील शेळके यांनी प्रश्न मांडला (फोटो सौजन्य - विधानसभा)
Sunil Shelke Political News : वडगाव मावळ : राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अनेक विषयांवरुन चर्चासत्रे रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पहिल्या दिवसांपासून खडाजंगी रंगली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावी अशी भूमिका विरेधकांनी घेतली आहे. तर शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्याने त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
वडगाव मावळमधील इंद्रायणी तांदूळ अत्यंत लोकप्रिय आहे. संपूर्ण राज्यभरातून मावळ भागातील इंद्रायणी तांदळाची मागणी असते. मावळमध्ये सुमारे १२,८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करत आमदार सुनील शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली. सुनील शेळके यांनी इंद्रायणी तांदळाच्या बियाणाxबाबत आवाज उठवला आहे यामुळे मावळमधील शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विधीमंडळामध्ये मावळमधील शेतकऱ्यांबाबत बियाणांचा प्रश्न मांडताना सुनील शेळके म्हणाले की, “राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हे त्यांचा हक्क आहे. यासाठी सशक्त यंत्रणा उभारायला हवी,” अशी ठाम भूमिका आमदार सुनील शेळके यांनी मांडली.
🛑 आज अधिवेशनात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे 🛑
📍 इंद्रायणी तांदूळ बियाण्यांचा तुटवडा:
मावळ तालुक्यात सुमारे १२८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदुळाची लागवड केली जात असुन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या इंद्रायणी भाताच्या उच्च प्रतीच्या बियाण्यांची मागणी कृषी… pic.twitter.com/CZjQ1bMwod— Sunil Shelke (@shelkesunilanna) July 2, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विधीमंडळामध्ये त्यांनी पुढे अशी मागणी केली की, “बियाण्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कार्यवाही केली जावी. स्थानिक कृषी संस्था आणि सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करावा. जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व विश्वासार्ह बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करता येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करत, “शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं हीच खरी जबाबदारी आहे,” असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनात मांडले आहे.