मुंबई : शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड करत राज्यात सत्तांतर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांचे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. दरम्यान, अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत राडा घालत आहेत, तसेच शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) यांच्यात सुद्धा राडे होताना दिसत आहेत.
अखेरीस शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यास” राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या …
आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा …
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 3, 2022
दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी होत आहे. यावर राजकारण होताना दिसत आहे. यावरच आता मनसेनं (MNS) सुद्धा उडी घेतली आहे.
[read_also content=”बापरे…! ‘एवढी’ मोठी रक्कम सापडली रेल्वे प्रवाशाकडे, ऐकून व्हाल थक्क https://www.navarashtra.com/article/you-shocked-to-hear-that-such-a-huge-amount-was-found-with-railway-passenger-332355/”]
मनसे नेते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale) यांनी ट्विट करत शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. “अखेरीस शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यास” राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या… आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा…तसेच शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…” अशा प्रकारे ट्विट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्यामुळं मनसेच्या टिकेला शिवसेना कसं उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.