देहूरोड : साईनगर, मामुर्डी येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर देहूरोड पोलीस व गोरक्षांनी रविवारी छापा टाकून गोमांस विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. या कारवाईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच या कामगिरीबद्दल देहूरोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
मनसेच्या शिष्टमंडळाने आज, मंगळवारी देहूरोड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची भेट घेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अवैध कत्तलखाना आणि गोमांस विक्री प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, मनविसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे, युवा नेते भरत बोडके, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, माथाडी सेनेचे विनोद भंडारी, सचिन शिंगाडे, रस्ते साधन सुविधा विभागाचे तालुका अध्यक्ष किरण गवळी, तसेच डॉमनिक दास, प्रतीक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-मनसेने केली ‘ही’ मागणी
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची अशा प्रकारे बेकायदेशीर कत्तल केली जाते. मागच्या तीन वर्षात जवळपास शंभरच्यावर जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हा अवैध कत्तलखाना चालविणाऱ्याचा त्या गुरे चोरणाऱ्या टोळीशी काही संबंध आहे का, ते तपासण्याची मागणीही मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे.
[blockquote content=”देहूरोडच्या महिला पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध कत्तलखान्यावर झालेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई झाली तो भाग सील करावा, अशी आमची मागणी आहे.” pic=”” name=”-मोझेस दास, माजी उपतालुकाध्यक्ष, मनसे मावळ.”]