"राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारठ", मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा मागे घेतला
MNS leader Avinash Jadhav news Marathi: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असता. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकट्याने विजय मिळवता आला नाही. अविनाश जाधव यांनी ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याच अविनाश जाधव यांचा पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पण राज ठाकरेंनी तो राजीनामा स्वीकारला नाही. अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. अविनाश जाधव यांनी भेटीची सविस्तर माहिती दिली.
ठाणे विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव यांचा भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याकडून पराभव झाला होता. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील निवडणुकीत मनसेच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात 125 उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना एकही जागा मिळवण्यात यश आले नाही.
ठाणे व पालघर जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघरमध्ये एकही जागेवर मनसेला विजयी मिळवता आला नाही. मनसे पक्षाचे नेतेपद, नाविक सेनेचे अध्यक्षपद आहे आणि तिसरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आहे. यातील फक्त ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता मी होतोच. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी बोलावले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे. तूच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.
आत्तापर्यंत मी राज ठाकरेंनी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन केले आहे आणि भविष्यातही मी राज ठाकरेंनी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करेन. राजीनामा वगैरे असे काही नाही. काम करत राहायचे असते. यश मिळायचं असेल तेव्हा मिळेल. असं राज ठाकरेंनी मला सांगितले.अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत ठाणे आणि पालघर किंवा दोन्ही जिल्ह्यात पुन्हा एकदा मनसेला उभारी देणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
अनेकदा लोक मला फोन करतात. संपर्क साधतात. तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की, माझ्या रक्तात राजकारण आहे. त्यामुळे एखादे पद गेल्यामुळे राज ठाकरेंवरील निष्ठा कमी होणार नाही किंवा माझे राज ठाकरेंवरील प्रेम कमी होणार नाही. महाराष्ट्रसैनिक म्हणून त्याच जोशात काम करणार होतो. परंतु, पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितले आहे. पूर्ण ताकदीने लढणार. राज ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विस्तार करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. राजीनामा दिल्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. याबाबत चर्चा केली. मला दिलेल्या पाठिंब्याबाबत सर्वांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. राज ठाकरे यांची ताकद वाढवली पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा होती. आतापासून पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहे, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेचे विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी निवडणूक उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्याकडून योग्य ती मदत व सहकार्य मिळाल्याचा आरोप केला आहे. पालघरमध्ये उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव, विपुल पटेल यांच्यासह बहुतांश तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याच भेटीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी पराभवाची मीमांसा करताना आपली गाऱ्हाणी मांडली. अविनाश जाधव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या भेटीची माहिती अविनाश जाधव यांच्यापर्यंत आल्यानंतर पक्षातून कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सर्वच पार्श्वभूमीवर, काम करताना माझ्याकडून कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, अशी आर्जव अविनाश जाधव यांनी पत्रातून राज ठाकरे यांच्याकडे करत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.