कल्याण : कल्याण ग्रामीणमधील बैठकीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी त्यांनी नाव न घेता खंत व्यक्त करून दाखवली आहे. बैठकीमध्ये राजू पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षापासून मी पाण्यासाठी भांडतोय. १४० एमएलटी पाणी कोटा जो आपल्या हक्काचा आहे, त्यासाठी भांडतोय, दुर्दैवाने सांगतो इथल्या एकाही लोकप्रतिनीधीने मला साथ दिली नाही. आत्ता सर्व व्यवस्थित झाले आहे. लवकर पाणी समस्या सुटणार आहे. पाणी समस्येबाबत त्यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री रविंद्र चव्हाण याच्या असहकार्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.
[read_also content=”पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक जाहिरात फलकांवर पालिकेचा हातोडा, आयुक्त मंगेश चितळे आक्रमक https://www.navarashtra.com/maharashtra/dangerous-billboards-near-panvel-bus-station-commissioner-mangesh-chitale-aggressive-547212.html”]
कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील समस्यांबाबत नागरीकांसोबत एका बैठकीचे आयोजन पाटीदार सभागृहात करण्यात आले होते. भाजप माजी नगरसेवक रमाकांत पाटील आणि जालिंदर पाटील यांच्या उपस्थितीत नागरीकांसोबत ही बैठक पार पडली या बैठकीला आमदार पाटील उपस्थित होते. नागरीकांनी समस्यांचा पाढा वाचला. त्याबाबत मनसे आमदार पाटील यांनी समस्या का सुटली नाही, हे नागरीकांना समजावून सांगितले. कल्याण ग्रामीणमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, तो काय सुटला नाही. आत्ता कसा सुटणार आहे अशी माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, ठाण्याचे आमदार प्रताप सररनाईक यांनी मिरा भाईंदरसाठी १० एमएलडीची मागणी केली, ती मंजूर करण्यात आली. हे पाणी बारवी धरणातून मिळणार आहे. मी १४० एमएलडी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठी चार वर्षापासून भांडतोय. दुर्दैवाने सांगतो की, स्थानिक एकही लोकप्रतिनिधींना साध दिली नाही. याविषयी मी मागणी केली, आयुक्त आजारी पडले. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली गेली, पाण्याचं राजकारण सुरु होते. आत्ता युती झाली आहे. आत्ता सर्व व्यवस्थीत होईल, येत्या पंधरा दिवसात ही पाणी समस्या सुटणार काहीसा दिलासा मिळणार आहे. जोपर्यंत पाणी समस्या सुटणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असे आश्वासन आमदार पाटील यांनी नागरीकांना दिले आहे.