कल्याण:अहमदाबाद कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये (Ahmedabad Kolhapur Express) प्रवास करताना प्रवासा दरम्यान एक प्रवासी झोपला होता. या झोपलेल्या प्रवाशाकडचे 13 तोळे दागिने आणि मोबाईल घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच (Kalyan Crime Branch) पोलिसांनी या चोराला बेड्या ठोकल्या आहेत. सुभान अहमद असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून इतरही चोरीस गेलेले तीन मोबाईल (Mobile Theft) पोलिसांनी हस्तगत केले आहे. सुभान अहमद हा सराईत चोरटा (Theft) असल्याची माहिती मिळाली आहे. (Kalyan Crime News)
[read_also content=”ब्रिटनमध्ये सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब, डिफ्युज करताना मोठा स्फोट, सुदैवाने जिवीतहानी नाही! https://www.navarashtra.com/world/world-war-ii-bomb-found-in-britain-large-explosion-while-defusing-luckily-no-casualties-nrps-368993.html”]
कल्याणमध्ये (Kalyan) राहणारे एक व्यावसायिक 30 जानेवारी रोजी अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक एस-5 मधून प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. गाडीत ते दोघेही झोपलेले असताना त्याचा फायदा घेत फिर्यादीच्या पत्नीची पर्स अज्ञात इसम चोरी करुन पसार झाला. पत्नीची पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याची तक्रार प्रवाशाने डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात केली. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. वसई स्टेशनला एक इसम चोरीला गेलेली पर्स घेऊन ट्रॅकवर उतरुन दुसऱ्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. रेल्वे क्राईम ब्रँच एसीपी सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुसुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चौगूले, पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण, राजेंद्र दिवटे, जर्नादन पुळेकर, रंजित रासकर, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, महिंद्र कर्डिले, अजित माने, अजिम इनामदार आणि सोनाली पाटील यांच्या पथकाने तपास करीत चोरट्याला भायखळा येथून अटक केली. सुभान अहमद त्याचे नाव आहे. त्याने चोरलेली पर्स हस्तगत केली आहे. त्यासोबत अन्य गुन्ह्यातील तीन मोबाईलही तपास पथकाने हस्तगत केले आहे.
आजकाल कल्याण- डोंबिवली परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय ट्रेनमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र पोलीस या चोरांना पकडण्यात यशस्वी ठरत आहेत. मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.