कंदकुर्तमधील डॉ केशव हेडगेवार स्मृती स्थळाचे काम अंतिम टप्प्यात मोहन भागवत लोकार्पण करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : धर्माबादपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील कंदकुर्ती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार यांचे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात येत असलेल्या दोन मजली ‘केशव स्मृतीस्थळाचे’ काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ११ एप्रिल रोजी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या उपस्थितीत या स्मृतीस्थळाचे लोकार्पण होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त तयारीला वेग आला असून, सायंकाळी ५.३० वाजता भागवत यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला संघाचे सुमारे ३ हजार स्वयंसेवक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्या अनुषंगाने व्यापक नियोजन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : ब्रेनवॉश,धर्मांतर अन् लैंगिक शोषण… ! नाशिकच्या नामांकित कंपनीत ‘लव्ह जिहाद’चा पर्दाफाश
हेडगेवार यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
या स्मृतीस्थळाचे बांधकाम डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाले होते. सुमारे १०८० चौरस यार्ड जागेवर उभारण्यात येत असलेले हे दोन मजली स्मारक विविध वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. खालच्या मजल्यावर हेडगेवार यांची सुमारे ६ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात येणार आहे, तर वरच्या मजल्यावर भारत मातेची मूर्ती आणि हेडगेवार यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनप्रवासाचे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या चरित्रावरील ग्रंथांचाही समावेश असेल, स्मृतीस्थळाचे व्यवस्थापक गोविंदराव देवला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकार्पणानंतरही पुढील सुमारे सहा महिने काम सुरू राहणार आहे. याशिवाय येत्या दसरा सणापर्यंत हेडगेवार योच्या जन्मशताब्दी वषॉनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : नीतीश कुमार घेणार राज्यसभेची शपथ; बिहारच्या राजकारणातील हुक्कमी एक्का गाजवणार दिल्ली
रेणुकादेवी मंदिरातील दानपेटी उघडली…
माहूरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थान मंदिरातील विविध ठिकाणी ठेवलेल्या एकूण ११ दानपेट्या मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी उघडण्यात आल्या. सभामंडपातील ४, महालक्ष्मी माता १. तुळजाभवानी माता १, मंदिर परिसरातील २ तसेच परशुराम मंदिराकडे ३ अशा एकूण ११ दानपेट्यांचा समावेश होता. तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे आणि सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. दानपेट्यांमधील रोख रकमेचे मोजमाप करताना विविध नोटांचा समावेश होता. दानपेट्यांमधून २० लाख ६३ हजार ४७० रुपये रोख रक्कम प्राप्त झाली. तसेच भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पारख सुशील टाक यांनी केली. यामध्ये सोन्याचे एकूण वजन ४१ ग्रॅम ७४० मिली, सोन्याच्या नथा १५ नग, चांदीचे वजन १ किलो ४७१ ग्रॅम, परशुराम पाळण्यातील चांदी ७६५ मि. दरम्यान, ११ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत देणगी विभागातून १६ लाख ७० हजार १८० रुपये, तर ऑनलाईन माध्यमातून १४ लाख ५० हजार ३९० रुपये प्राप्त झाले.






