नीतीश कुमार हे राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार असून बिहारच्या राजकारणामध्ये बदल होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
तब्बल दोन दशके बिहारच्या राजकारणाची सुत्रे हाती घेतलेले नीतीश कुमार यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत त्यांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे बिहारसह सर्त्रत्र त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा आहे. लवकरच ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून राज्यसभेचे सदस्य म्हणून नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
नीतीश कुमार हे आज राज्यसभेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिल रोजी ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. त्यांच्यानंतर बिहारची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यानंतर 16 एप्रिल रोजी बिहारमध्ये नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि नवे मंत्रिमंडळ स्थापन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव धोक्यात…! CIA कडे २२ दिवसांची मुदत मागितल्याचा दावा
बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
बिहारमध्ये अनेक दशके मुख्यमंत्री राहिलेले नीतीश कुमार यांनी बिहारचा कारभार भाजपच्या हाती सुपूर्द केल्याचे स्पष्य झाले आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री भाजपचेच असतील हे आता जवळपास निश्चित झाल्यामुळे, अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये सम्राट चौधरी, नित्यानंद राय, डॉ. दिलीप जयस्वाल, रेणू देवी आणि जनक राम यांचा समावेश आहे. याचबरोबर पक्ष
एका नवीन चेहऱ्यावरही विश्वास ठेवू शकतो, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात.
२० वर्षांनंतर बदलणारे चित्र
२००५ पासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नीतीश कुमार यांच्या जाण्याने बिहारच्या राजकारणात एका युगाचा अंत होत आहे, असे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्याने अनेक बदल आणि आव्हाने बिहारसमोर येणार आहेत.. आता, त्यांच्या केंद्रातील प्रवेशामुळे राज्यात नवीन नेतृत्वशैलीसह एक नवीन सरकार कार्यरत होईल.
हे देखील वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा दौऱ्यावर, MGAHV दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार, तयारीला जोर
एनडीएची रणनीती आणि पुढील वाटचाल
एनडीएसाठी हा बदल धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. नीतीश कुमार यांचा अनुभव केंद्रात उपयुक्त ठरेल, तर बिहारमधील भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार संघटना मजबूत करण्याच्या दिशेने काम करेल. सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भाजप मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करते आणि नवीन सरकार कोणती प्राथमिकता ठरवते. येणारे दिवस बिहारच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात.






