5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
आतापर्यंतचे सर्व आंदाज मोडीत काढत नैऋत्या मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. एकीकडे आनंदाची बातमी असली तरी काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी चितेंत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात नदी नाले प्रवाहित झाले आहेत. दरम्यान रविवारी (25 मे) सकाळी 11 च्या सुमारास मान्सून महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
संततधारेने पंढरपुरात पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक गावांत मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनने आज पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही व्यापला. कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोव्यात मान्यनने प्रगती केली आणि सकाळी 11 च्या सुमारास तळ कोकणासह काही भागात दाखल झाला आहे. तर पूर्वेकडे पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग मान्यूनने व्यापला आहे. मिझोरामचा काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागातून मान्यून पुढे सरकत आहे. दरम्यान मान्सूनची प्रगती पाहता अवघ्या तीन दिवसात पुणे,मुंबईसह अवघे राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरवर्षी मान्यून २० मेच्या सूमारास अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो. त्यानंतर १ जूनपर्यंत केरळ आणि ६ ते ७ दिवसात महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होतो. 15 ते 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून जातं. मात्र यंदा मान्सून तब्बल १२ दिवस आधी महाराष्ट्राता दाखल झाला आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने अवघ्या 12 तासात केरळमधून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Karjat News :पावसाळा तोंडावर आला तरी रस्ता होईना, खड्ड्यातल्या प्रवासाने वाहनचालकांचं कंबरडं मोडलं
दरम्यान मध्य अरबी समुद्राचा काही भागात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे पुढील ३ दिवसांत मुंबई,पुणेसह अवघा महाराष्ट्र व्यापेल. तर बेंगळुरूसह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या भागात दाखल होईल,.असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.