मुंबई : उकाड्यापासून हैराण नागरिकांसाना दिलासा देणारी बातमी आहे. अंदमानमध्ये मान्सून सोमवारी दाखल झाला असून येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यासह 13 जिल्ह्याना यलो अलर्टस देण्यात आला आहे.
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात 8ते 10 जूनऐवजी 2 ते3 जूनला येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह (Marathwada)विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.